'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 13:41 IST2026-04-24T13:41:17+5:302026-04-24T13:41:49+5:30

यावेळी गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Jayant Patil-Vishwajit Kadam knew that Vishal Patil would not get a ticket gopichand Padalkar's big revelation | 'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट

'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट

मागील काही दिवसांपासून खासदार विशाल पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पडळकर यांनी सांगली लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून एक खळबळजनक दावा केला आहे. "विशाल पाटील यांना काँग्रेसकडून खासदारकीचे तिकीट मिळणार नाही, हे जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांना आधीच माहीत होतं; त्यांनी हे सर्व ठरवून केलं होतं," असा खळबळजनक गौप्यस्फोट पडळकर यांनी केला आहे.

इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"

यावेळी गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, "विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवतील याची कल्पना या दोघांनाही नव्हती. एकदा विशाल पाटलांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केल्यावर जयंत पाटील आणि विश्वजित कदम हे केवळ शरीराने त्यांच्यासोबत होते, मनाने नाही."

विश्वजित कदमांना खोचक टोला

नुकतेच विश्वजित कदम यांनी '२०२९ ची लोकसभा निवडणूक काँग्रेसच जिंकेल' असे विधान केले होते. यावरून पडळकरांनी त्यांना टोला लगावला. "२०२९ ला खरोखरच विशाल पाटील खासदार व्हावेत, अशी विश्वजित कदम यांची इच्छा आहे का?" असा खोचक प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

'घोडमैदान लांब नाही'

येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इशारा देताना पडळकर म्हणाले, "आता घोडमैदान लांब नाही. आम्ही पण मैदानात असणार आहोत, त्यावेळी बघू काय होतं ते" पडळकरांच्या या विधानामुळे सांगलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Web Title : विशाल पाटिल को टिकट न मिलना जयंत पाटिल, कदम को पता था: पडळकर

Web Summary : गोपीचंद पडळकर का आरोप है कि जयंत पाटिल और विश्वजीत कदम को पता था कि विशाल पाटिल को कांग्रेस का टिकट नहीं मिलेगा। उन्होंने उनकी ईमानदारी पर सवाल उठाते हुए कहा कि उन्होंने पाटिल की स्वतंत्र उम्मीदवारी का केवल नाममात्र समर्थन किया। पडळकर ने कदम की 2029 की चुनाव भविष्यवाणी का भी उपहास किया।

Web Title : Vishal Patil's ticket denial known to Jayant Patil, Kadam: Padalkar

Web Summary : Gopichand Padalkar alleges Jayant Patil and Vishwajit Kadam knew Vishal Patil wouldn't get a Congress ticket. He questions their sincerity, claiming they only nominally supported Patil's independent candidacy. Padalkar also taunted Kadam's 2029 election prediction.