अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 15:10 IST2026-04-24T15:05:54+5:302026-04-24T15:10:13+5:30

America Iran War: इराण सर्व बाजूने कोंडी करण्याचा आणि वाटाघाटी करण्यासाठी भाग पाडण्याचा होर्मुझ हा एकमेव मार्ग आहे, असे डोनाल्ड ट्रम्प यांना वाटत असून, यासाठी मोठे निर्णय घेतले जात आहेत.

america is preparing to big move will create a dilemma for iran donald trump take 4 big decision regarding strait of hormuz in 24 hours | अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!

अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!

America Iran War: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमध्ये सध्या नेतृत्वावरून मोठा गोंधळ सुरू असल्याचाही दावा केला. इराणला आपला नेता कोण आहे हे समजणे कठीण जात आहे. तेथील कट्टरपंथी आणि मवाळ गटांमधील अंतर्गत संघर्ष टोकाला पोहोचला आहे. युद्ध संपवण्यासाठी इराणने एक 'एकत्रित प्रस्ताव' द्यावा, यासाठी आपण शस्त्रसंधी वाढवल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. यातच गेल्या २४ तासांत अमेरिकेने इराणच्या होर्मुझ सामुद्रधुनीबाबत ४ महत्त्वाचे निर्णय घेतले असून, यामुळे इराणची कोंडी होऊ शकते, असे म्हटले जात आहे. 

होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वांत महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. जगातील सुमारे २० टक्के तेल या सामुद्रधुनीतून जाते. या मार्गावर नियंत्रण ठेवण्याचा तेलाच्या पुरवठ्यावर महत्त्वपूर्ण परिणाम होतो. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आपले संपूर्ण प्रयत्न होर्मुझच्या सामुद्रधुनीवर केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. 

होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!

गेल्या २४ तासांत डोनाल्ड ट्रम्प यांनी चार मोठी पावले उचलली असून, इराणवर आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या तीव्र दबाव आणण्याची तयारी सुरू केल्याचे म्हटले जात आहे. हे निर्णय अशा वेळी आले आहेत, जेव्हा अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविरामासाठी चर्चा सुरू आहे, परंतु तणाव कायम आहे. इराणसोबत संपूर्ण करार होईपर्यंत हा दबाव सुरूच राहील, अशी भूमिका ट्रम्प यांनी घेतली आहे. 

- हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या इराणच्या छोट्या नौका दिसताच त्या गोळ्या घालून नष्ट करा असे आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या नौदलाला दिले आहेत. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये अमेरिकेचे लष्कर होर्मुझच्या जलमार्गातील सुरुंग हटवण्याचे प्रयत्न अधिक वेगाने करत असल्याचाही दावा ही त्यांनी केला.

- डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या नौदलाला होर्मुझच्या सामुद्रधुनीत पेरलेले सुरुंग जलदगतीने हटवण्याचे आदेश दिले आहेत. इराणने सुरुंग पेरल्यामुळे या जलमार्गातून जाणे अवघड झाले होते. अमेरिकेची सुरुंगशोधक जहाजे पूर्वीपेक्षा तिप्पट वेगाने काम करत आहेत. हे काम कोणत्याही व्यत्ययाशिवाय आणि आणखी जास्त वेगाने सुरू राहिले पाहिजे, असे निर्देश ट्रम्प यांनी दिले आहेत.

- अमेरिकेला केवळ स्वतःच्या अटींवर होर्मुझची सामुद्रधुनी शक्य तितक्या लवकर सुरक्षित करून पुन्हा खुली करायची आहे. सुरुंग हटवल्यामुळे जागतिक तेल वाहतूक पुन्हा सुरू होऊ शकेल, पण त्याचा फायदा इराणला मिळू दिला जाणार नाही. सुरुंग पेरून संपूर्ण परिसर बंद करण्याच्या इराणच्या रणनीतीला हाणून पाडण्याचा हा एक प्रयत्न आहे.

- तिसरा निर्णय हा अमेरिकेची नौदल नाकेबंदी आणखी मजबूत करण्याचा आहे. अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील इराणी बंदरे आणि भागांवर आधीच नाकेबंदी लादली आहे. इराणी बंदरांमधून तेल किंवा माल घेऊन येणाऱ्या किंवा जाणाऱ्या कोणत्याही जहाजाला थांबवले जात आहे. ट्रम्प यांनी आता ही नाकेबंदी तिप्पट करण्याचे आदेश दिले आहेत. इराणची तेल निर्यात जवळजवळ थांबली आहे. इराणसोबत संपूर्ण करार होत नाही, तोपर्यंत ही नाकेबंदी सुरूच राहील. यामुळे इराणला दररोज लाखो डॉलर्सचे नुकसान होत आहे.

- चौथा आणि सर्वांत गंभीर निर्णय म्हणजे इराणचे तेल उत्पादन पूर्णपणे थांबवणे. अमेरिका आता इराणच्या तेल उत्पादन सुविधांवर दबाव वाढवण्याची योजना आखत आहे. इराणला तेल विकून पैसे कमवण्यापासून रोखणे, हे ट्रम्प यांचे उद्दिष्ट आहे. 

- इराण हा जगातील सर्वांत मोठ्या तेल उत्पादक देशांपैकी एक आहे. तेल उत्पादन आणि निर्यात थांबली, तर इराणच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होईल. अमेरिकेचा असा विश्वास आहे की, इराणला वाटाघाटी करायला भाग पाडण्याचा आर्थिक दबाव हा एकमेव मार्ग आहे. यामुळे जगभरात तेलाच्या किमती वाढू शकतात, ज्याचा परिणाम सामान्य लोकांवरही होईल.

दरम्यान, तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प यांनी यापूर्वी व्हेनेझुएला आणि क्युबावर ज्याप्रमाणे नौदल नाकेबंदी केली होती, त्या तुलनेत इराणचे आव्हान वेगळे आहे. इराणच्या रणनीतीमुळे अमेरिकेत महागाई वाढली आहे. येत्या निवडणुकांत पेट्रोलच्या किमती ट्रम्प यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या अडचणीच्या ठरू शकतात.

 

Web Title : अमेरिका का ईरान पर शिकंजा: आर या पार की तैयारी

Web Summary : अमेरिका ने होर्मुज में नौसेना तैनात कर ईरान पर दबाव बढ़ाया। ट्रम्प ने ईरानी नौकाओं को नष्ट करने, बारूदी सुरंग हटाने, नाकाबंदी मजबूत करने और ईरानी तेल उत्पादन रोकने का आदेश दिया, जिससे वैश्विक मूल्य वृद्धि का खतरा है।

Web Title : US Prepares for Showdown: Tightening the Noose Around Iran

Web Summary : US escalates pressure on Iran, deploying naval force in Hormuz. Trump orders destruction of Iranian boats, mine removal, stronger blockade, and aims to halt Iranian oil production, risking global price hikes.