Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > ४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर

४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर

Gold Silver Rate 24 April: लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या चार दिवसांत सराफा बाजारात सोन्याच्या भावात सुमारे १७०० रुपयांची घट झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 14:34 IST2026-04-24T14:32:58+5:302026-04-24T14:34:30+5:30

Gold Silver Rate 24 April: लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या चार दिवसांत सराफा बाजारात सोन्याच्या भावात सुमारे १७०० रुपयांची घट झाली आहे.

Silver became cheaper marathi by rs 9600 in 4 days Gold prices fell by rs 1700 Check today rates quickly 24 april 2026 | ४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर

४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर

Gold Silver Price 24 April: लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या चार दिवसांत सराफा बाजारात सोन्याच्या भावात सुमारे १७०० रुपयांची घट झाली आहे. तर, याच काळात चांदीच्या दरात ९६२३ रुपयांची मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. आज शुक्रवार, २४ एप्रिल रोजी देखील २४ कॅरेट सोन्याचा भाव ३९५ रुपयांनी स्वस्त होऊन १,५०,६६४ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे. चांदीचा भाव आता २,४०,८९० रुपये प्रति किलो इतका झालाय.

IBJA च्या दरांनुसार, सोने आता सराफा बाजारातील त्याच्या १,७६,१२१ रुपयांच्या उच्चांकी (All-time high) पातळीपेक्षा २५,४५७ रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर चांदीच्या भावात उच्चांकी स्तरावरून १,४५,०४३ रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. युद्धाच्या काळातील परिस्थितीचा विचार केला तर सोनं आतापर्यंत ८,४३३ रुपयांनी आणि चांदी २७,०१० रुपयांनी घसरली आहे. IBJA दिवसातून दोनदा दर जाहीर करते; एकदा दुपारी १२ च्या सुमारास आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ च्या सुमारास. 

गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे

२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे दर

IBJA नुसार, आज १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव ३६२ रुपयांनी घसरून १,३८,००८ रुपयांवर आला आहे. यात जीएसटीचा (GST) समावेश नाही. जीएसटीसह हा दर १,४२,१४८ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय. तसंच १८ कॅरेट सोन्याचा दरही आज २९६ रुपयांनी स्वस्त झालाय. आता १० ग्रॅम १८ कॅरेट सोन्याची किंमत जीएसटीशिवाय १,१२,९९८ रुपये झाली आहे. जीएसटीसह याचा भाव १,१६,३८७ रुपये होईल.

१४ आणि २३ कॅरेट सोन्याचे दर

सराफा बाजारात आज २३ कॅरेट सोन्याची किंमत ३९३ रुपयांनी कमी होऊन १,५०,०६१ रुपयांवर आली आहे. तर १४ कॅरेट सोन्याची किंमत २३२ रुपयांनी कमी होऊन ८८,१३८ रुपये प्रति १० ग्रॅम इतकी झाली आहे.

Web Title : सोना-चांदी की कीमतों में गिरावट: आज ही जांचें दरें!

Web Summary : शादी के खरीदारों के लिए अच्छी खबर! सोने की कीमतों में ₹1700, चांदी में चार दिनों में ₹9623 की गिरावट। आज, 24 कैरेट सोना ₹1,50,664 प्रति 10 ग्राम, चांदी ₹2,40,890 प्रति किग्रा है। कीमतें सर्वकालिक उच्च स्तर से नीचे हैं।

Web Title : Gold and silver prices plummet: Check today's rates now!

Web Summary : Good news for wedding shoppers! Gold prices dropped ₹1700, silver ₹9623 in four days. Today, 24-carat gold is ₹1,50,664 per 10 grams, silver ₹2,40,890 per kg. Prices are down from all-time highs.