Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे

Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे

Gautam Adani News: अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आता १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत. अंबानींकडून आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान हिसकावून घेतल्यानंतर, जगातील अब्जाधीशांमध्ये अदानींचा दबदबा वेगाने वाढत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 14:02 IST2026-04-24T14:00:23+5:302026-04-24T14:02:30+5:30

Gautam Adani News: अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आता १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत. अंबानींकडून आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान हिसकावून घेतल्यानंतर, जगातील अब्जाधीशांमध्ये अदानींचा दबदबा वेगाने वाढत आहे.

Gautam Adani News joins the 100 billion dollars club leaves Mukesh Ambani behind | Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे

Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे

Gautam Adani News: अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आता १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत. अंबानींकडून आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान हिसकावून घेतल्यानंतर, जगातील अब्जाधीशांमध्ये अदानींचा दबदबा वेगाने वाढत आहे. नेटवर्थच्या बाबतीत अदानींनी आता बिल गेट्स यांना मागे टाकले असून ते अंबानींच्या तुलनेत बरेच पुढे गेलेत.

'ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्स'मध्ये अदानी १७ व्या स्थानावर पोहोचलेत, तर अंबानी २० व्या स्थानावर आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती १०६ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे, तर मुकेश अंबानींची संपत्ती ९०.२ अब्ज डॉलर राहिली आहे. गुरुवारी अदानींच्या संपत्तीत ७.१६ अब्ज डॉलरची मोठी वाढ झाली. त्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत अदानी अव्वल स्थानी राहिले. दुसरीकडे, गुरुवारी अंबानींच्या संपत्तीत १.११ अब्ज डॉलरची घट नोंदवण्यात आली.

शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००

१०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये कोण कोण?

१०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये एकूण १८ अब्जाधीश आहेत, ज्यांची संपत्ती १०० अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, यामध्ये बिल गेट्स, कार्लोस स्लिम, अमानिको ऑर्टेगा, एलिस वॉल्टन, रॉब वॉल्टन, वॉरेन बफेट, स्टीव बाल्मर, जिम वॉल्टन, बर्नार्ड अरनाल्ट, जेनसेन हुआंग, माइकल डेल, लैरी एलिसन, मार्क जुकरबर्ग, जेफ बेजोस, सर्गी ब्रिन, लैरी पेज आणि एलन मस्क यांचा समावेश आहे.

गुरुवारी सर्वाधिक नुकसान सोसणारे अब्जाधीश

गुरुवारी सर्वाधिक संपत्ती गमावणाऱ्या अब्जाधीशांमध्ये लॅरी एलिसन आघाडीवर होते; त्यांनी ११.५ अब्ज डॉलर गमावले. आता त्यांची संपत्ती २२७ अब्ज डॉलर राहिली आहे. इलॉन मस्क यांनाही ९.८९ अब्ज डॉलरचा झटका बसला असून त्यांचं नेटवर्थ आता ६४५ अब्ज डॉलर आहे. याशिवाय स्टीव्ह बाल्मर यांना ५.४६ अब्ज डॉलर आणि मार्क जुकरबर्ग यांना ५.२९ अब्ज डॉलरचं नुकसान झालंय. या अब्जाधीशांच्या संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे त्यांच्या नेटवर्थवर परिणाम झाला आहे.

जगातील टॉप-१० श्रीमंतांची यादी

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्समध्ये इलॉन मस्क पहिल्या (६४५ अब्ज डॉलर) क्रमांकावर आहेत.

  • लॅरी पेज: २८९ अब्ज डॉलर
  • जेफ बेजोस: २७४ अब्ज डॉलर
  • सर्गी ब्रिन: २६९ अब्ज डॉलर
  • मार्क जुकरबर्ग: २३३ अब्ज डॉलर
  • लॅरी एलिसन: २२७ अब्ज डॉलर
  • मायकेल डेल: १७९ अब्ज डॉलर
  • जेनसेन हुआंग: १६५ अब्ज डॉलर
  • बर्नार्ड अरनाल्ट: १६० अब्ज डॉलर
  • जिम वॉल्टन: १५७ अब्ज डॉलर

Web Title : गौतम अडानी ने मुकेश अंबानी को पछाड़ा, 100 अरब डॉलर के क्लब में शामिल

Web Summary : गौतम अडानी 100 अरब डॉलर के क्लब में शामिल हुए, एशिया के सबसे अमीर व्यक्ति के रूप में मुकेश अंबानी को पीछे छोड़ा। अडानी की संपत्ति 106 अरब डॉलर तक पहुंची, जो बिल गेट्स से अधिक है। वह ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्स में 17वें स्थान पर हैं, जबकि अंबानी 90.2 अरब डॉलर के साथ 20वें स्थान पर हैं।

Web Title : Gautam Adani Surpasses Mukesh Ambani, Joins $100 Billion Club

Web Summary : Gautam Adani entered the $100 billion club, surpassing Mukesh Ambani as Asia's richest. Adani's net worth reached $106 billion, exceeding Bill Gates. He now ranks 17th on the Bloomberg Billionaires Index, while Ambani is 20th with $90.2 billion.