Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००

शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००

Shah Rukh Khan Manager News: बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची दीर्घकाळापासूनची मॅनेजर पूजा गुरनानी, तिचे पती हितेश प्रकाश गुरनानी आणि वडील मोहन सियाराम दादलानी यांनी मुंबईतील वांद्रे भागातील कार्टर रोडवर तीन शानदार अपार्टमेंट्स खरेदी केलेत. '

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 12:58 IST2026-04-24T12:56:28+5:302026-04-24T12:58:46+5:30

Shah Rukh Khan Manager News: बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची दीर्घकाळापासूनची मॅनेजर पूजा गुरनानी, तिचे पती हितेश प्रकाश गुरनानी आणि वडील मोहन सियाराम दादलानी यांनी मुंबईतील वांद्रे भागातील कार्टर रोडवर तीन शानदार अपार्टमेंट्स खरेदी केलेत. '

bollywood star Shah Rukh Khan manager Pooja Gurnani buys 3 luxurious flats in Bandra price per square foot is rs 84000 | शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००

शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००

Shah Rukh Khan Manager News: बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची दीर्घकाळापासूनची मॅनेजर पूजा गुरनानी, तिचे पती हितेश प्रकाश गुरनानी आणि वडील मोहन सियाराम दादलानी यांनी मुंबईतील वांद्रे भागातील कार्टर रोडवर तीन शानदार अपार्टमेंट्स खरेदी केलेत. 'CRE मॅट्रिक्स'ने नोंदणी कार्यालयातील कागदपत्रांच्या हवाल्यानं सांगितलं की, या तिन्ही फ्लॅट्सची एकूण किंमत ₹३८.२१ कोटी आहे. हे तिन्ही फ्लॅट 'वरुण' बिल्डिंगमध्ये असून प्रत्येक फ्लॅटची किंमत ₹१२.७३ कोटी आहे. शाहरुख खानची मॅनेजर पूजा गुरनानी ही भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटी मॅनेजरपैकी एक मानली जाते.

हे तिन्ही फ्लॅट्स 'सी-फेस' असून ते 'वरुण' नावाच्या इमारतीत आहेत. या इमारतीचा विकास 'ट्राइक्शा रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड'द्वारे केला जात आहे. प्रत्येक अपार्टमेंटची किंमत ₹१२.७३ कोटी निश्चित करण्यात आली आहे. हे सर्व फ्लॅट १६ व्या आणि १७ व्या मजल्यावर आहेत. या व्यवहारामध्ये एकूण सहा कार पार्किंग क्षेत्रांचाही समावेश आहे. सध्या या इमारतीचे काम सुरू असून, डिसेंबर २०२८ पर्यंत या फ्लॅट्सचा ताबा मिळण्याची शक्यता आहे.

'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?

प्रत्येक फ्लॅटची वैशिष्ट्ये

प्रत्येक फ्लॅटचे कार्पेट एरिया १,५११ चौरस फूट आहे, तर बाल्कनीचं क्षेत्रफळ ८१ चौरस फूट आहे. प्रत्येक फ्लॅटसोबत दोन कार पार्किंग मिळत आहेत, म्हणजेच एकूण सहा पार्किंग उपलब्ध असतील. या तिन्ही युनिट्सची नोंदणी २१ एप्रिल २०२६ रोजी झाली असून, यामुळे एकूण व्यवहाराचं मूल्य ₹३८.२१ कोटी झालंय.

सरकारला ₹२.१६ कोटींहून अधिक कर महसूल

या प्रीमियम व्यवहारामुळे राज्याच्या तिजोरीलाही मोठी कमाई झाली आहे. तिन्ही फ्लॅट्सवर एकूण ₹२.१६ कोटींहून अधिक मुद्रांक शुल्क भरण्यात आलंय. प्रत्येक फ्लॅटवर वैयक्तिक मुद्रांक शुल्क ₹६३.६ लाख ते ₹७६.४ लाख दरम्यान होते. 

₹८४,००० प्रति चौरस फूट किंमत

'बिझनेस स्टँडर्ड'च्या वृत्तानुसार, जर कार्पेट एरियानुसार किंमत पाहिली तर ₹१२.७३ कोटींच्या हिशोबाने हा व्यवहार प्रति चौरस फूट सुमारे ₹८४,००० होतो. हा दर वांद्रे येथील लक्झरी निवासी मार्केटची सर्वोच्च पातळी दर्शवतो, विशेषतः कार्टर रोडसारख्या ठिकाणी आणि अति-श्रीमंत व्यक्ती तसंच सेलिब्रिटींच्या उच्च मागणीसाठी ओळखला जातो.

Web Title : शाहरुख की मैनेजर ने बांद्रा में खरीदे तीन आलीशान फ्लैट

Web Summary : शाहरुख खान की मैनेजर, पूजा गुरनानी ने बांद्रा के कार्टर रोड पर ₹38.21 करोड़ में तीन समुद्र-मुखी आलीशान अपार्टमेंट खरीदे। 'वरुण' बिल्डिंग में स्थित फ्लैटों की कीमत ₹84,000 प्रति वर्ग फुट है और इसमें छह पार्किंग स्थान शामिल हैं। दिसंबर 2028 तक कब्जा मिलने की उम्मीद है।

Web Title : Shah Rukh's Manager Buys Three Luxury Flats in Bandra

Web Summary : Shah Rukh Khan's manager, Pooja Gurnani, purchased three sea-facing luxury apartments in Bandra's Carter Road for ₹38.21 crore. The flats, located in the 'Varun' building, cost ₹84,000 per square foot and include six parking spaces. Possession is expected by December 2028.