इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 12:17 IST2026-04-24T11:53:25+5:302026-04-24T12:17:01+5:30
मुंबईतील इराणच्या महावाणिज्य दूतावासाने भारताच्या निसर्गरम्य ठिकाणांचा एक व्हिडीओ शेअर करत ट्रम्प यांच्यासाठी 'सांस्कृतिक शुद्धीकरणाची' गरज असल्याचे म्हटले आहे.

इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
भारताला 'नरक' संबोधणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादात आता इराणने उडी घेतली असून, मुंबई आणि हैदराबादमधील इराणी दूतावासांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. "कधीतरी भारतात या, इथली संस्कृती बघा आणि मगच बोला," अशा शब्दांत इराणने ट्रम्प यांना सुनावले आहे.
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
मुंबईतील इराणच्या महावाणिज्य दूतावासाने भारताच्या निसर्गरम्य ठिकाणांचा एक व्हिडीओ शेअर करत ट्रम्प यांच्यासाठी 'सांस्कृतिक शुद्धीकरणाची' गरज असल्याचे म्हटले आहे. तर, हैदराबादमधील दूतावासाने ट्रम्प यांच्या युद्धखोर वृत्तीवर टीका करत, "खरा नरक तर ती जागा आहे जिथे इराणची संस्कृती नष्ट करण्याची धमकी दिली जाते," असे म्हटले आहे.
इराणचा टोला
इराणच्या दूतवासाने या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "कदाचित कोणीतरी ट्रम्प यांच्यासाठी एकतर्फी सांस्कृतिक शुद्धीकरणाची व्यवस्था करायला हवी. त्यामुळे त्यांची वायफळ बडबड कमी होऊ शकेल. कधीतरी भारतात या, भारत बघा आणि मग बोला."
दरम्यान, हैदराबाद दूतावासानेही टीका केली आहे. त्यांनी लिहिले, "चीन आणि भारत हे संस्कृतीचे उगमस्थान आहेत. खरा नरक तर ती जागा आहे, तिथे युद्धखोर राष्ट्राध्यक्षाने इराणची संस्कृती नष्ट करण्याची धमकी दिली.
अमेरिकेने गुरुवारी स्पष्टीकरण जारी करून हे प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न केला. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा विश्वास आहे की भारत हा त्यांच्या एका चांगल्या मित्राच्या नेतृत्वाखालील एक महान देश आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकी दूतावासाच्या प्रवक्त्याने सांगितले, "राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे की भारत हा त्यांच्या एका अत्यंत चांगल्या मित्राच्या नेतृत्वाखालील एक महान देश आहे."
भारताने ती पोस्ट अज्ञानी आणि अनुचित असल्याचे म्हटले आहे. "आम्ही त्या टिप्पण्या, तसेच त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकी दूतावासाने जारी केलेले निवेदन पाहिले आहे," असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले. "या टिप्पण्या स्पष्टपणे अज्ञानी, अनुचित आणि आक्षेपार्ह आहेत. त्या निश्चितपणे भारत-अमेरिका संबंधांचे वास्तव दर्शवत नाहीत, जे संबंध दीर्घकाळापासून परस्पर आदर हितांवर आधारित आहेत."
Maybe someone should book a one-way cultural detox for Mr. #Trump, it might just reduce the random bakwaas 😏
— Iran in Mumbai (@IRANinMumbai) April 23, 2026
Kabhi #India aa ke dekho, phir bolna. pic.twitter.com/kkocLZ31XX