"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 15:02 IST2026-04-24T15:01:52+5:302026-04-24T15:02:34+5:30

कानपूरमधील वकील प्रियांशु श्रीवास्तव यांनी पाचव्या मजल्यावरून उडी मारून आपलं जीवन संपवलं.

kanpur lawyer priyanshu Srivastava end life from court building emotional note | "वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...

"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...

कानपूरमधील वकील प्रियांशु श्रीवास्तव यांनी पाचव्या मजल्यावरून उडी मारून आपलं जीवन संपवलं. प्रियांशु यांनी हे टोकाचं पाऊल त्यांचे वडील राजेंद्र कुमार श्रीवास्तव यांची वागणूक आणि मानसिक छळाला कंटाळून उचलल्याचं समोर आलं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी प्रियांशु यांनी व्हॉट्सॲपवर दोन पानांची 'स्टेटस नोट' शेअर केली होती. या नोटमध्ये त्यांनी बालपणातील कटू आठवणी आणि वर्तमानात होत असलेल्या जाचाचा सविस्तर उल्लेख केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून व्हॉट्सॲप स्टेटस हा तपासाचा मुख्य आधार मानला जात आहे.

प्रियांशु यांनी सुसाइड नोटमध्ये वडिलांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी लिहिलं की, "लहानपणी फ्रिजमधील आंब्याचा रस प्यायल्यामुळे वडिलांनी मला विवस्त्र करून घराबाहेर काढलं होतं. हायस्कूलमध्ये कमी गुण मिळाल्यावरही माझ्याशी अशीच वागणूक देण्याची धमकी देण्यात आली होती." वडील त्यांच्यावर सतत नजर ठेवून असायचे, ज्यामुळे त्यांना परिसरात अपमानित वाटायचं. नोटमध्ये त्यांनी लिहिलं की, "देव माझ्या वडिलांसारखे वडील कोणालाही देऊ नये" आणि शेवटी अशी इच्छा व्यक्त केली की वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये.

२५ वर्षीय प्रियांशु स्वतः वकील होते आणि वडिलांच्या चेंबरमध्येच काम करत होते. नोटमध्ये त्यांनी स्वतःची ओळख नसल्याचं दुःख व्यक्त केलं. त्यांनी लिहिलं की, "माझं स्वतःचं ना कोणतं चेंबर आहे ना कार्यालय, मी दिवसभर वडिलांसाठीच काम करतो." आपली काहीच किंमत नाही असं त्यांना वाटत होतं. प्रियांशु यांच्या मते, ते कोणत्याही चुकीच्या संगतीत नव्हते, तरीही वडिलांच्या विनाकारण कडक शिस्तीने त्यांना मृत्यूच्या वाटेवर ढकलले.

घटनेनंतर बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि न्यायाधीश घटनास्थळी पोहोचले. डीसीपी (पूर्व) सत्यजीत गुप्ता यांनी सांगितले की, सुसाइड नोटचं हस्ताक्षर आणि डिजिटल पुराव्यांची तपासणी केली जात आहे. दुसरीकडे मुलाच्या मृत्यूमुळे वकील वडील पूर्णपणे खचले असून काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत. कानपूर न्यायालयातील हजारो वकिलांमध्ये ही सुसाइड नोट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. हा केवळ कौटुंबिक वाद होता की त्यामागे इतर काही कारणं होती, याचा तपास पोलीस करत आहेत.

Web Title : वकील ने की आत्महत्या, पिता पर लगाया आरोप: दुखद अंत

Web Summary : कानपुर के वकील प्रियांशु श्रीवास्तव ने आत्महत्या कर ली, सुसाइड नोट में माता-पिता के दुर्व्यवहार का हवाला दिया। उन्होंने अपने पिता पर दुर्व्यवहार का आरोप लगाया और इच्छा व्यक्त की कि वह उनके शरीर को न छुएं। पुलिस मामले की जांच कर रही है, सुसाइड नोट पर ध्यान केंद्रित कर रही है।

Web Title : Lawyer Commits Suicide, Blaming Father in Note: A Tragic End

Web Summary : Kanpur lawyer Priyanshu Srivastava tragically ended his life, citing parental abuse in a suicide note. He accused his father of mistreatment and expressed a wish to not have him touch his body. Police are investigating the case, focusing on the note as key evidence.