इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 15:14 IST2026-04-24T15:10:04+5:302026-04-24T15:14:15+5:30

अमेरिकेच्या नौदलाने गुरुवारी हिंदी महासागरात निर्बंध घातलेले इराणकडे जाणारे एक तेलवाहू जहाज अडवले आहे.

Global Tensions Rise: US Navy Intercepts Iran-Bound Tanker; Trump Shares Controversial ‘Hellhole’ Remark on India and China | इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई

इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या नौदलाने गुरुवारी हिंदी महासागरात निर्बंध घातलेले इराणकडे जाणारे एक तेलवाहू जहाज अडवले आहे. या जहाजाचे नाव ‘एम/टी मॅजेस्टिक एक्स’ असे असून, हे जहाज नेमक्या कोणत्या देशाचे आहे, याची माहिती अमेरिकेने दिलेली नाही. पण या जहाजाची तपासणी करण्यासाठी नौदलाचे सैनिक जहाजावर उतरले आहेत. या जहाजातून इराणला आर्थिक मदत पुरवल्याचा अमेरिकेचा संशय असल्याचे अमेरिकेच्या संरक्षण विभागाने स्पष्ट केले. इराणकडे जाणाऱ्या सर्वच जहाजांना जगातील कोणत्याही समुद्रात रोखले जाणार असून, त्यांची सखोल तपासणी केली जाणार असल्याचेही संरक्षण विभागाने सांगितले आहे. हेच जहाज पूर्वी ‘फोनिक्स’ नावाने ओळखले जात होते आणि २०२४ मध्ये तेलतस्करी केल्याच्या संशयावरून अमेरिकेने यावर निर्बंध लादले होते. 

नाकेबंदीबाबत आकडेवारी जाहीर

होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी केल्यापासून अमेरिकेने आतापर्यंत ३१ जहाजांना मार्ग बदलून परत फिरण्याचे किंवा बंदरात परतण्याचे आदेश दिले आहेत. या मोहिमेत १० हजार लष्करी जवान, १०० हून अधिक विमाने आणि १७ युद्धनौका सहभागी आहेत. इराणशी संबंधित अनेक जहाजे नाकेबंदीतून निसटल्याच्या बातम्या काही परदेशी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, अमेरिकेच्या संरक्षण दलाने मंगळवारी या बातम्यांचे अधिकृतपणे खंडन करत   नाकेबंदी कडक असल्याचे स्पष्ट केले. 
हे युद्ध सुरू झाल्यापासून ३०हून अधिक जहाजांवर हल्ले झाले आहेत. 

इराणच्या लष्करी कारवाईचा व्हिडीओ संशयास्पद

होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये बुधवारी ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ दोन मालवाहू जहाजांजवळ पोहोचल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ‘बीबीसी व्हेरिफाय’ने या व्हिडीओची पडताळणी केली असून, हा व्हिडीओ जहाजांवर हल्ला झाल्यानंतर चित्रित करण्यात आल्याचे दिसून येत आहे. दोन मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये सशस्त्र सैनिक ‘एमएससी फ्रान्सिस्का’ आणि ‘इपामिनोंडास’ या दोन जहाजांच्या दिशेने जाताना दिसत आहेत. या दोन्ही जहाजांवर बुधवारी सकाळी गोळीबार झाला. मात्र, व्हिडीओमधील आकाशातून घेतलेली दृश्ये आणि जहाजांची दिशा यांची ‘व्हेसल-ट्रॅकिंग’ डेटाशी तुलना केली असता चित्रीकरणात वेळेची तफावत दिसून आली.

इराणचे परागंदा राजपुत्र रेझा पेहलवी यांच्यावर बर्लिनमध्ये ‘टोमॅटो ज्यूस’ फेकला 

इराणचे परागंदा राजपुत्र रेझा पेहलवी यांच्यावर गुरुवारी बर्लिनमध्ये एका इमारतीतून बाहेर पडताना टोमॅटो ज्यूस फेकण्यात आला. जर्मनीच्या फेडरल न्यूज कॉन्फरन्स इमारतीबाहेर ही घटना घडली. पेहलवी एका पत्रकार परिषदेतून बाहेर पडत होते, ज्यामध्ये त्यांनी अमेरिका आणि इराणमधील युद्धविरामावर टीका केली होती. 

‘भारत-चीन हे नरक’

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर अमेरिकेतील एक कट्टर कार्यकर्ते माइकल सॅवेज यांचे वादग्रस्त विधान शेअर केल्याने वाद झाला. सॅवेज यांनी या पोस्टमध्ये भारत आणि चीनचा उल्लेख ‘हेलहोल’ (नरक) असा करत अमेरिकेत जन्म घेऊन तेथील नागरिकत्वाचा गैरफायदा घेणाऱ्यांवर टीका केली आहे. यावर भारताच्या परराष्ट्र खात्याने अत्यंत सावध प्रतिक्रिया देत, ‘आम्ही वृत्ते पाहिली आहेत, त्यापलीकडे भाष्य करायचे नाही,’ असे म्हटले. तर  भारतातील विरोधी पक्षांनी या विधानाचा ‘भारत-विरोधी’ असा निषेध करत पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्याकडे विरोध नोंदवावा, अशी मागणी केली  आहे.  ते बाहेर येताच त्यांच्यावर हा ज्यूस फेकण्यात आला. त्यांच्या ब्लेझरच्या मागच्या बाजूला आणि मानेवर हा ज्यूस उडाला. मात्र त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. त्यांनी समर्थकांना हात उंचावून अभिवादन केले आणि ते कारमधून निघून गेले. ६५ वर्षीय पेहलवी यांनी अमेरिकेच्या मदतीने इराणची सूत्रे हाती घेण्याची तयारी दाखवली आहे. 

Web Title : हिंद महासागर में अमेरिकी नौसेना ने ईरान का जहाज रोका: कार्रवाई

Web Summary : अमेरिकी नौसेना ने हिंद महासागर में ईरान के तेल टैंकर को रोका, वित्तीय सहायता का संदेह। निरीक्षण कड़े किए गए। ईरान की नौसैनिक गतिविधि से चिंता, बर्लिन में ईरानी राजकुमार पर टमाटर जूस से हमला। ट्रंप ने भारत-चीन पर विवादास्पद टिप्पणी की।

Web Title : US Navy Intercepts Iran-Bound Ship in Indian Ocean: Action Taken

Web Summary : US Navy intercepted an Iranian oil tanker in the Indian Ocean, suspecting financial aid. Inspections are tightened globally. Elsewhere, Iran's naval activity raises concerns, while Iranian prince faced tomato juice attack in Berlin. Trump shared controversial India-China remarks.