काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 18:44 IST2026-04-23T18:43:51+5:302026-04-23T18:44:19+5:30

उत्तराखंडमधील चंबा-कोटी रोडवर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

major road accident on uttarakhands chamba koti road bus plunges into gorge 8 dead | काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू

काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू

उत्तराखंडमधील चंबा-कोटी रोडवर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी नैलजवळ बस दरीत कोसळल्याने हा अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच चंबा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात गुरुवारी दुपारी घडला असून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात समोर आलं आहे की, अपघातग्रस्त वाहनातून एकूण १० जण प्रवास करत होते. मृतांची ओळख पटवण्याचं काम  सुरू आहे.

या भीषण अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी 'X' (ट्विटर) वर पोस्ट करून दुःख व्यक्त केलं आहे. टिहरी गढवाल जिल्ह्यातील चंबा क्षेत्रातील नैल-कोटी कॉलनी मार्गावर झालेल्या या अपघाताबाबत त्यांनी शोक व्यक्त केला. "ईश्वर मृतांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. जिल्हा प्रशासनाला जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत" असं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.

उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांत अशा प्रकारच्या अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. काही महिन्यांपूर्वी अल्मोडा जिल्ह्यातही असाच एक भीषण अपघात झाला होता. एक प्रवासी बस अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळली होती, ज्यामध्ये अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता.

Web Title : उत्तराखंड में हादसा: बस खाई में गिरी, आठ की मौत

Web Summary : उत्तराखंड के चंबा-कोटी मार्ग पर एक दुखद बस दुर्घटना में आठ लोगों की जान चली गई। बस नैल के पास एक खाई में गिर गई। बचाव कार्य जारी है, और घायल यात्रियों को अस्पताल में भर्ती कराया गया है। मुख्यमंत्री धामी ने दुख व्यक्त किया और घायलों के उचित इलाज का आदेश दिया। उत्तराखंड में हाल ही में ऐसी दुर्घटनाएँ हुई हैं।

Web Title : Tragedy in Uttarakhand: Bus Plunges into Valley, Eight Killed

Web Summary : A tragic bus accident on the Chamba-Koti road in Uttarakhand has claimed eight lives. The bus plunged into a valley near Nail. Rescue operations are underway, with injured passengers hospitalized. Chief Minister Dhami expressed grief and ordered proper treatment for the injured. Similar accidents have occurred recently in Uttarakhand.