होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 20:01 IST2026-04-23T20:00:15+5:302026-04-23T20:01:51+5:30

आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अत्यंत आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधील (होर्मुझची सामुद्रधुनी) परिस्थितीच्या  पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या नोदलाला थेट कारवाईचा आदेश दिला आहे.

Shoot down boats laying mines in Hormuz on sight Trump's order Will war break out again | होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?

होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?

अमेरिका आणि इराण यांच्यात सध्या युद्धबंदी सुरू आहे. दोन्ही देशांतील दुसऱ्या फेरीच्या चर्चेसंदर्भात सस्पेन्स कायम आहे. यातच, आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अत्यंत आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधील (होर्मुझची सामुद्रधुनी) परिस्थितीच्या  पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या नोदलाला थेट कारवाईचा आदेश दिला आहे. होर्मुझमध्ये एखादी बोट सुरुंग पेरताना दिसली, तर त्याच क्षणी उडवून द्या, असा आदेश ट्रम्प यांनी दिला आहे.

...तर थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर परिणाम -  
महत्वाचे म्हणजे, दोन्ही देशांमध्ये दुसऱ्या फेरीच्या चर्चा सुरू असतानाच ट्रम्प यांनी हा आदेश दिला आहे. जागतिक तेल पुरवठ्याच्या दृष्टीने होर्मुझची सामुद्रधुनीही अत्यंत महत्वाची आहे. यामुळे या भागात कोणतीही लष्करी हालचाल झाल्यास याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर आणि प्रादेशिक स्थिरतेवर होऊ शकतो. यामुळेच या सागरी मार्गांच्या सुरक्षेसंदर्भात जगभरातून चिंता व्यक्त केली जाते.

दरम्यान, पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी अमेरिकेच्या उपराजदूत नॅटली बेकर यांची भेट घेतली आणि इस्लामाबादमध्ये होणाची शक्यता असलेल्या दुसऱ्या फेरीच्या शांतता चर्चेवर चर्चा केली. तसेच, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवण्याच्या घेतलेल्या पुढाकाराचे स्वागत आहे. हे तणाव कमी करण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे, असेही नकवी यांनी म्हटले आहे.

याशिवाय, पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर हेही शांततापूर्ण तोडगा काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. इस्लामाबादमध्ये संभाव्य चर्चेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. आता यावर इराण नेमकी काय प्रतिसाद देतो, हे बघण्यासारखे असेल.

 

Web Title : ट्रम्प का आदेश: होर्मुज में बारूदी सुरंग बिछाने वाली नौकाओं को नष्ट करो; क्या युद्ध बढ़ेगा?

Web Summary : ट्रम्प ने नौसेना को होर्मुज जलडमरूमध्य में बारूदी सुरंग बिछाने वाली किसी भी नौका को नष्ट करने का आदेश दिया, जिससे अमेरिका-ईरान तनाव और शांति वार्ता के बीच संघर्ष के नवीनीकरण की चिंता बढ़ गई है। पाकिस्तान चर्चाओं को सुविधाजनक बना रहा है।

Web Title : Trump's Order: Destroy Boats Laying Mines in Hormuz; War Escalation?

Web Summary : Trump ordered the navy to destroy any boats laying mines in the Strait of Hormuz, raising concerns about renewed conflict amidst ongoing US-Iran tensions and peace talks. Pakistan is facilitating discussions.