भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 17:32 IST2026-04-23T17:30:48+5:302026-04-23T17:32:05+5:30

Rahul Meena Delhi murder case updates : दिल्लीतील आयआरएस अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या राहुल मीणाने अलवरमध्येही बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. जुगाराचे व्यसन आणि सूडापोटी त्याने केलेले हे क्रूर कृत्य.

Horrible...! Rahul meena had also raped his friend's wife the night before; Big revelation in the murder case of IRS officer's daughter | भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा

भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा

दिल्लीतील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या राहुल मीणा याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा भयानक चेहरा समोर आला आहे. केवळ पैशाच्या हव्यासापोटी आणि सूडबुद्धीने त्याने एकाच दिवसात दोन राज्यांत दोन महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. दिल्ली पोलीस जेव्हा आरोपीला पकडण्यासाठी राजस्थानच्या अलवरमध्ये पोहोचले, तेव्हा त्यांना समजले की राहुलने मंगळवारी (२१ एप्रिल २०२६) रात्री १० च्या सुमारास आपल्या एका मित्राच्या पत्नीवर बलात्कार केला होता. पीडित महिलेचा पती एका लग्नाला गेला असताना राहुलने घरात घुसून हा अत्याचार केला. त्यानंतर तो दिल्लीत आला आणि IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर बलात्कार केला. 

पळून जाण्याची धडपड
अलवरमधील गुन्ह्यानंतर राहुलने आपला एक फोन १०,००० रुपयांना विकला आणि ६,००० रुपयांत एक व्हॅन भाड्याने घेतली. तो बुधवारी पहाटे ६:३० च्या सुमारास दिल्लीतील कैलास हिल्समध्ये पोहोचला. महत्वाचे म्हणजे, व्हॅन चालकाला पैसे न देताच तो तिथे उतरून पळाला. तिथून तो आयआरएस अधिकाऱ्याच्या घरी पोहोचला. राहुल याच कुटुंबात १० महिने नोकर म्हणून कामाला होता. त्याला घराची सुरक्षा यंत्रणा आणि गुप्त चावी कुठे लपवली जाते, याची पूर्ण माहिती होती. आई-वडील जिममध्ये गेल्याचा फायदा घेत त्याने घरात प्रवेश केला.

आयआरएस अधिकाऱ्याची मुलगी आयआयटी ग्रॅज्युएट आणि यूपीएससीची तयारी करत होती. त्याने २२ वर्षीय पीडितेवर बलात्कार केला आणि त्यानंतर मोबाईल चार्जरच्या वायरने तिचा गळा आवळून खून केला. गुन्हा केल्यानंतर राहुलने कपडे बदलले आणि रोख रकमेसह मौल्यवान वस्तू घेऊन पसार झाला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी अवघ्या काही तासांत त्याला द्वारका येथील एका हॉटेलमधून बेड्या ठोकल्या.

गुन्ह्यामागील कारणे
राहुलला ऑनलाइन जुगार आणि सट्ट्याचे प्रचंड व्यसन होते, ज्यासाठी त्याने अनेकांकडून पैसे उसने घेतले होते. तसेच सुमारे दोन महिन्यांपूर्वी कुटुंबाने त्याला कामावरून काढून टाकले होते, ज्याचा राग त्याच्या मनात होता.

Web Title : आईआरएस अधिकारी की बेटी की हत्या: आरोपी ने पहले दोस्त की पत्नी से बलात्कार किया।

Web Summary : दिल्ली में एक आईआरएस अधिकारी की बेटी की हत्या के आरोपी राहुल मीणा ने पहले राजस्थान में एक दोस्त की पत्नी से बलात्कार किया। लालच और बदले की भावना से प्रेरित होकर, उसने बाद में बेटी, जो यूपीएससी की तैयारी कर रही थी, की मोबाइल चार्जर वायर से गला घोंटकर हत्या कर दी।

Web Title : IRS Officer's Daughter Murder: Accused Raped Friend's Wife Beforehand.

Web Summary : Rahul Meena, accused of murdering an IRS officer's daughter in Delhi, also raped a friend's wife in Rajasthan the night before. Driven by greed and revenge, he then murdered the daughter, an IIT graduate preparing for UPSC, using a mobile charger wire.