नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 18:30 IST2026-04-23T18:28:07+5:302026-04-23T18:30:05+5:30

Nagpur Crime: दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका हॉटेल व्यावसायिकाची हत्या करण्यात आली. आरोपींनी हत्या करून मृतदेह पोत्यात टाकला आणि ते पोते नाल्यात फेकून दिले. ही घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली. 

Nagpur shaken! Missing hotel owner's body found in a sack in a drain, identified by 'Hari Om' tattoo | नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख

नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख

Nagpur Crime News: नागपूर शहरात सदरमधील एका हॉटेल व्यावसायिकाची अज्ञात आरोपींनी हत्या केली व त्याचा मृतदेह पोत्यात भरून नारा घाटाच्या मागील भागातील नाल्यात फेकला. संबंधित मृत दोन दिवसांपासून बेपत्ता होता व कुटुंबीयांकडून शोधाशोध सुरू होती. जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 

राहुल सुनील साहू (३८, झिंगाबाई टाकळी) असे मृताचे नाव आहे. ते छावणी परिसरात हॅप्पी स्प्रिंग नावाचे हॉटेल चालवत होते. २० एप्रिल रोजी ते हॉटेल कर्मचाऱ्यांना सांगून बाहेर पडले होते. त्यानंतर ते घरी किंवा हॉटेलमध्ये परतलेच नाही. त्यांच्या पत्नीने सर्व मित्रांना फोन करून विचारणा केली व अखेर पोलिस ठाण्यात तक्रार केली.

नाल्यात पडलेल्या पोत्यातून येऊ लागला वास

बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास नारा घाटाच्या मागील बाजूस असलेल्या पुलाच्या खाली असलेल्या नाल्यातील पोत्यातून दुर्गंधी येऊ लागली. याची माहिती तेथील लोकांनी पोलिसांना दिली. जरीपटका पोलिस ठाण्याच्या पथकाने तेथे जाऊन पाहणी केली असता त्यात मृतदेह आढळला.

दोन्ही हातांवर 'हरी ओम' टॅटू

मृतदेहाच्या मान आणि डोक्यावर धारदार शस्त्राच्या खोल जखमा दिसून येत होत्या. त्याच्या दोन्ही हातांवर 'हरी ओम' गोंदलेले होते. पोलिसांनी बेपत्ता झाल्याची तक्रार देणाऱ्या राहुलच्या पत्नीशी संपर्क साधला. तिने मृतदेहाची ओळख पटवली.

सीसीटीव्हीमध्ये दिसले चारचाकी वाहन

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्यात २० एप्रिलच्या रात्री एक चारचाकी वाहन घटनास्थळाजवळ येताना दिसले. पोलिसांनी वाहनाचा शोध सुरू केला असून, राहुल बेपत्ता होण्यापूर्वी ज्यांच्या संपर्कात होता, त्या लोकांची चौकशी करत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुलचे काही जणांसोबत आर्थिक बाबींवरून वाद सुरू होते. त्यातूनच ही घटना झाली आहे का, याचा तपास सुरू आहे.

Web Title : नागपुर में सनसनी: लापता होटल मालिक नाले में मृत मिला, टैटू से हुई पहचान

Web Summary : नागपुर के होटल व्यवसायी राहुल साहू की हत्या, शव नाले में फेंका गया। 'हरि ओम' टैटू से पहचान हुई। पुलिस वित्तीय विवादों और सीसीटीवी में संदिग्ध वाहन की जांच कर रही है।

Web Title : Nagpur Shaken: Missing Hotel Owner Found Dead in Drain; Tattoo Identified

Web Summary : Nagpur hotelier Rahul Sahu murdered, body dumped in drain. Identified by 'Hari Om' tattoos. Police investigate financial disputes and a suspicious vehicle seen on CCTV.