डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 18:55 IST2026-04-23T18:54:45+5:302026-04-23T18:55:55+5:30
MEA on Donald Trump: अमेरिकेने भारताबाबत केलेल्या वादग्रस्त टिप्पणीने नवा वाद पेटला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
MEA on Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनबाबत केलेल्या वादग्रस्त ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताने सावध भूमिका घेतली आहे. गुरुवार (२३ एप्रिल २०२६) रोजी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या वक्तव्यावर थेट प्रतिक्रिया देणे टाळले.
VIDEO | On US president Donald Trump's social media post mentioning India and China as 'hellhole', MEA Spokesperson Randhir Jaiswal (@MEAIndia) says, "We have seen some reports. That's where I leave it."
— Press Trust of India (@PTI_News) April 23, 2026
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7)#Delhipic.twitter.com/I70F7pfCl9
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले, 'आम्ही काही अहवाल पाहिले आहेत. मी एवढेच सांगू शकतो,' असे ते म्हणाले. यावरून भारताने या मुद्द्यावर सध्या अधिकृत भूमिका न घेण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते.
वादाची सुरुवात कशी झाली?
हा वाद तेव्हा उफाळला, जेव्हा ट्रम्प यांनी त्यांच्या Truth Social या प्लॅटफॉर्मवर एका संभाषणाचा ट्रान्सक्रिप्ट शेअर केला. हे संभाषण अमेरिकेतील कंझर्व्हेटिव्ह टॉक शो होस्ट मायकल सॅवेज यांच्या कार्यक्रमातील होते.
या चर्चेत जन्मसिद्ध नागरिकत्व या मुद्द्यावर बोलताना सॅव्हेज यांनी दावा केला की, काही लोक गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात अमेरिकेत येतात, जेणेकरून त्यांच्या मुलांना आपोआप अमेरिकन नागरिकत्व मिळेल. त्यानंतर ते भारत, चीन आणि इतर काही देशांमधून आपल्या कुटुंबियांना अमेरिकेत बोलावतात. याच संदर्भात ‘हेलहोल’ हा शब्द वापरण्यात आला.
जागतिक स्तरावर प्रतिक्रिया
या वक्तव्यावर इराणनेही प्रतिक्रिया दिली आहे. हैदराबाद येथील इराणच्या वाणिज्य दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत भारत आणि चीनच्या समर्थनार्थ वक्तव्य केले. इराणच्या वाणिज्य दूतावासाने म्हटले, भारत आणि चीन हे संस्कृतीचे पाळणे आहेत. ‘हेलहोल’ ती जागा आहे, जिथे 'युद्धगुन्हेगार राष्ट्राध्यक्ष' इराणच्या संस्कृतीला नष्ट करण्याची धमकी देतात. याद्वारे त्यांनी ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला.