चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 18:04 IST2026-04-23T18:03:07+5:302026-04-23T18:04:25+5:30
महत्वाचे म्हणजे, या व्हिडिओकडे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी एक प्रकारचे आव्हान म्हणून बघितले जात आहे.

चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
इराणने बुधवारी दोन मालवाहू जहाजे जप्त केली होती, यांपैकी एक जहाज भारताच्या दिशेने येत होते. यानंतर आता इराणने एक नाट्यमय व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांचे कमांडो एका मालवाहू जहाजावर कब्जा करताना दाखवले आहेत. हा व्हिडिओ अगदी हॉलिवूडमधील एखाद्या चित्रपटातील सीन प्रमाणे आहे. चित्रित करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये मुखवटाधारी कमांडो जहाजांचा पाठलाग करून त्यावर ताबा मिळवताना अथवा कब्जा करताना दिसत आहेत. महत्वाचे म्हणजे, या व्हिडिओकडे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी एक प्रकारचे आव्हान म्हणून बघितले जात आहे.
गुजरातकडे येणाऱ्या जहाजावर कब्जा -
महत्वाचे म्हणजे, डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम अनिश्चित काळासाठी वाढवल्यानंतर इराणने तीन जहाजांवर गोळीबार केला. यांपैकी 'पनामा'चा ध्वज असलेले 'MSC Francesca' आणि 'लायबेरिया'चा ध्वज असलेले 'Epaminondas' ही दोन जहाजे इराणी कमांडोजनी ताब्यात घेतली आहेत. विशेष म्हणजे, 'Epaminondas' हे जहाज दुबईहून गुजरातच्या मुंद्रा बंदराकडे येत होते. यांतर, अमेरिकन अधिकाऱ्यांनी दावा केला की, ही जहाजे जप्त करण्यामागे इराणच्या 'मॉस्किटो फ्लीट'चा हात होता. या लहान, वेगवान बोटी शोधणे कठीण असते. अशा बोटी आयआरजीसी (IRGC) द्वारे चालवल्या जातात, ज्यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील नियंत्रण सोडण्यास नकार दिला आहे.
जहाजाच्या 'ब्रिज'वर इराणी सैनिकांकडून गोळीबार आणि ग्रेनेड हल्ला -
जारी करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये इराणच्या आयआरजीसीचे (IRGC) सैनिक स्पीडबोटीतून मालवाहू जहाजांकडे जाताना दिसत आहेत. मुखवटाधारी सैनिकांनी रायफल्ससह शिडीच्या साहाय्याने जहाजावर चढाई केली. मुंद्राकडे येणाऱ्या 'Epaminondas' जहाजाच्या 'ब्रिज'वर (कमांड सेंटर) इराणच्या सैनिकांनी गोळीबार आणि ग्रेनेड हल्ला केला, यामुळे जहाजाचे नुकसान झाले. सुदैवाने, जहाजावरील कर्मचारी सुरक्षित आहेत.
This is how the Iranian IRCG Navy seized a container vessel that refused to comply with the Iranian-imposed conditions for passage through the Persian Gulf. pic.twitter.com/soTopMOUeZ
— Adamu B. Garba II, Msc, MNIIA, FIDPM (@adamugarba) April 23, 2026
होर्मुझ सामुद्रधुनीच्या नियमांचे उल्लंघन म्हणजे 'रेड लाईन' ओलांडण्यासारखे -
या कारवाईसंदर्भात बोलताना आयआरजीसीने म्हटले आहे की, या जहाजांकडे आवश्यक परवानगी नव्हती आणि त्यांनी 'नेव्हिगेशन सिस्टीम'मध्येही काही छेडछाड केली हाती. यामुळे सागरी सुरक्षा धोक्यात आली होती. एवढेच नाही तर, होर्मुझ सामुद्रधुनीच्या नियमांचे उल्लंघन करणे म्हणजे 'रेड लाईन' ओलांडण्यासारखे असल्याची ताकीदही इराणने दिली आहे. तत्पूर्वी, अमेरिकन सैन्याने अलीकडेच इराणचे 'तौस्का' नावाचे एक मालवाहू जहाज जप्त केले होते.