कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 18:00 IST2026-04-23T17:59:37+5:302026-04-23T18:00:19+5:30

Karnataka SSLC Result 2026 Marathi controversy : कर्नाटक सरकारने एसएसएलसी (१० वी) निकालाच्या ऑनलाईन पोर्टलवरून 'मराठी' शब्द वगळल्याने सीमाभागात तणाव निर्माण झाला आहे.

Karnataka SSLC Result 2026 Marathi controversy : Karnataka government's conspiracy to eliminate Marathi! The word 'Marathi' missing from the 10th results; Anger in the border areas | कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप

कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप

कर्नाटक सरकारने १० वीचा निकाल जाहीर करताना आपल्या अधिकृत संकेतस्थळावर विषयांच्या रकान्यात 'मराठी' या शब्दाचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला आहे. सीमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत क्लेशदायक बाब असून, या प्रकारामागे मराठी भाषा संपवण्याचा कर्नाटक सरकारचा छुपा अजेंडा असल्याचा संशय सीमाभागातील नेत्यांनी व्यक्त केला आहे.

नेमका प्रकार काय?
कर्नाटक एसएसएलसी परीक्षा २०२६ चा निकाल आज, २३ एप्रिल रोजी सकाळी घोषित करण्यात आला. निकालाच्या ऑनलाईन पोर्टलवर आणि विषयांच्या सूचीमध्ये 'मराठी' शब्दाऐवजी रिकामी जागा ठेवण्यात आली होती. तसेच इतर भाषेचे विषयाचे त्या त्या मार्कांसमोर नाव होते.  

जाणीवपूर्वक कृती
अनेक वर्षांपासून सीमाभागातील ८६५ गावांमध्ये मराठी भाषेवर गदा आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता निकालासारख्या महत्त्वाच्या दस्तऐवजातून 'मराठी' शब्द वगळणे हा त्याच षडयंत्राचा भाग असल्याचे मानले जात आहे. या संतापजनक प्रकारानंतर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमाभागातील मराठी नेत्यांनी कर्नाटक सरकारचा तीव्र निषेध केला आहे.

"कर्नाटक सरकार सातत्याने मराठी भाषेवर अन्याय करत आहे. निकालातून मराठी शब्द वगळणे ही बाब सहन करण्यापलीकडे आहे. सीमाभागातील मराठी अस्मिता पुसून टाकण्याचा हा प्रयत्न असून, आम्ही याविरोधात कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई लढू."
— शुभम शेळके, सीमाभाग नेते (महाराष्ट्र एकीकरण समिती)

Web Title : कर्नाटक सरकार की साजिश: 10वीं के परिणाम से मराठी गायब!

Web Summary : कर्नाटक सरकार ने 10वीं के परिणामों से 'मराठी' शब्द हटाया, सीमावर्ती क्षेत्रों में आक्रोश। नेताओं को भाषा खत्म करने की साजिश का संदेह है। महाराष्ट्र एकीकरण समिति ने कड़ा विरोध जताया।

Web Title : Karnataka Government's Conspiracy: Marathi Omitted from 10th Result!

Web Summary : Karnataka government omitted 'Marathi' from 10th results, sparking outrage in border areas. Leaders suspect a conspiracy to eliminate the language. Maharashtra Ekikaran Samiti strongly protests this act.