क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 15:36 IST2026-04-24T15:35:04+5:302026-04-24T15:36:02+5:30

दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या निर्घृण हत्या प्रकरणाच्या तपासात समोर आलेल्या तथ्यांनी पोलिसांनाही हादरवून सोडलं आहे.

i did not want to kill i just wanted money police investigation reveals accused rahul meena | क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..."

क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..."

दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या निर्घृण हत्या प्रकरणाच्या तपासात समोर आलेल्या तथ्यांनी पोलिसांनाही हादरवून सोडलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल मीणा याला अटक केल्यानंतर त्याचं वागणं पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. तसेच चौकशीदरम्यान राहुलच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चात्ताप दिसून आला नाही.

हत्येनंतर घराच्या फरशीवर सर्वत्र रक्ताचे डाग होते, ज्यावरून या गुन्ह्यातील क्रूरतेचा अंदाज लावला जाऊ शकतो. एवढं होऊनही आरोपी अत्यंत सामान्यपणे इमारतीतून बाहेर पडला. तपासात असं समोर आलं आहे की, सर्व काही सुरळीत असल्याचं दाखवण्यासाठी त्याने आपला मोबाईल स्विच ऑफ केला आणि कोणाशी तरी फोनवर बोलण्याचं नाटक करत तो बाहेर निघून गेला.

मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा

"माझ्यासाठी देवासारखे होते, खूप चांगले होते"

आरोपी म्हणाला, "चोरी केल्याचा पश्चात्ताप नाही, पण ती मरायला नको होती... आता जे झालं ते झालं." जेव्हा पोलिसांनी त्याला विचारलं की, तुला आपल्या कृत्याची भीती वाटत नाही का? तेव्हा त्याने उत्तर दिलं की, "मी पैसे घेण्याच्या उद्देशाने आलो होतो आणि मला कोणत्याही परिस्थितीत पैसे हवे होते." आरोपीने कबूल केलं की, तो तरुणीच्या कुटुंबासोबत गेल्या ७-८ महिन्यांपासून काम करत होता. जेव्हा त्याला विचारण्यात आलं की, तुला त्यांच्याबद्दल वाईट वाटलं नाही का? तेव्हा तो म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी देवासारखे होते, खूप चांगले होते... पण मला पैसे हवे होते."

मुलीकडे पैशांची मागणी

आरोपी सुमारे एक तास घरात थांबला होता. त्याने आधी मुलीकडे पैशांची मागणी केली. तिने नकार देताच त्याने तिच्या डोक्यात लॅम्पसारखी जड वस्तू मारली. रक्तस्त्राव सुरू होताच ती बेशुद्ध झाली. त्यानंतर त्याने बेशुद्ध मुलीवर बलात्कार केला. तिला पायऱ्यांवरून ओढत खोलीत नेले आणि तिच्या रक्ताने माखलेल्या बोटांनी लॉकर उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु 'बायोमेट्रिक्स'ने काम केलं नाही. कदाचित शरीरातील रक्ताभिसरण थांबल्यामुळे किंवा रक्ताच्या डागांमुळे तिचे ठसे मॅच झाले नसावेत. तोपर्यंत मुलीचा मृत्यू झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे.
 

Web Title : दिल्ली हत्या: आरोपी को पश्चाताप नहीं, बोला-पीड़ित परिवार 'भगवान' थे।

Web Summary : दिल्ली में आईआरएस अधिकारी की बेटी की हत्या के आरोपी को कोई पछतावा नहीं है। उसने अपराध कबूल करते हुए कहा कि उसे पैसे की जरूरत थी, भले ही उसने परिवार की दयालुता को स्वीकार किया। पैसे देने से इनकार करने पर उसने पीड़िता के साथ यौन उत्पीड़न किया।

Web Title : Delhi Murder: No Remorse, Accused Claims Victim's Family Were 'Gods'.

Web Summary : Accused in the Delhi IRS officer's daughter murder showed no remorse. He confessed to the crime, stating he needed money despite acknowledging the family's kindness. He sexually assaulted the victim after she refused to give him money.