मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 11:38 IST2026-04-24T11:37:50+5:302026-04-24T11:38:23+5:30

Rahul Meena : दिल्लीच्या अमर कॉलनीमध्ये आयआरएस (IRS) अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राहुल मीणाबाबत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

Rahul Meena win 5 lakh rs in online game pledging 12 th marksheet delhi irs officer daughter murder case | मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा

मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा

दिल्लीच्या अमर कॉलनीमध्ये आयआरएस (IRS) अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राहुल मीणाबाबत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. राहुलला असं एक व्यसन होतं, ज्याने एका सुशिक्षित तरुणाला गुन्हेगारीच्या वाटेवर ढकललं. प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे की, ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनाने त्याच्या आयुष्याची दिशाच बदलून टाकली होती. त्याने चक्क आपली मार्कशीट गहाण ठेवून पैसे घेतले आणि त्यानंतर ऑनलाईन गेम खेळला, ज्यामध्ये त्याने पाच लाख रुपये जिंकले होते.

राहुल मीणा अभ्यासात एक हुशार विद्यार्थी होता. तीन पत्ती’ आणि ‘लूडो’ सारख्या ॲप्सच्या जाळ्यात असा अडकला की हळूहळू त्याच्या आयुष्याची प्राथमिकता बदलत गेली. सुरुवातीला राहुलसाठी ऑनलाईन गेमिंग हे केवळ वेळ घालवण्याचं साधन होतं. मित्रांसोबत खेळणं, पैजा लावणं हे सर्व सामान्य वाटत होतं. पण हळूहळू पैजेची रक्कम वाढत गेली.

दहावी-बारावीची मार्कशीट ठेवली गहाण

कुटुंबियांच्या माहितीनुसार, राहुलने आधी थोडी रक्कम गमावली, त्यानंतर उधार घेणं सुरू केलं आणि पुढे स्वतःच्या वस्तू विकून पैसे गोळा करण्यास सुरुवात केली. मोबाईल, बाईक आणि घरातील सामानही त्याने पणाला लावलं. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अधिक पैसे मिळावेत आणि गेममधील आपली हार भरून काढता यावी, यासाठी त्याने आपली दहावी-बारावीची मार्कशीट सुद्धा गहाण ठेवली होती.

ऑनलाईन गेममधून पाच लाख जिंकले

तपासात असंही समोर आलं आहे की, काही दिवसांपूर्वी राहुलने ऑनलाईन गेमच्या माध्यमातून पाच लाख रुपये जिंकले होते. एकदा मोठी रक्कम जिंकल्यानंतर त्याला वाटलं की त्याला हा खेळ समजला आहे आणि तो सतत पैसे कमवू शकतो. मित्रांच्या सांगण्यावरून त्याने त्यांच्या आयडी आणि फोनवरूनही गेम खेळण्यास सुरुवात केली. या काळात तो मोठी रक्कम हरला आणि त्यानंतर त्याच्यावर पैसे परत करण्यासाठी दबाव वाढू लागला.

आयआरएस अधिकाऱ्याच्या घरी कामाची संधी

राहुल मीणाला दिल्लीत एका आयआरएस अधिकाऱ्याच्या घरी कामाची संधी मिळाली होती. ही नोकरी त्याला त्याच्या नातेवाईकांमार्फत मिळाली होती. आठ महिने तो तिथे काम करत होता. पण नोकरी दरम्यानही त्याची सवय बदलली नाही. दिवसभर मोबाईलवर गेम खेळणं आणि त्यात पैसे लावणं हेच तो करत होता. त्याने आजूबाजूच्या दुकानदारांकडून आणि लोकांकडून उधार घेणं सुरू केलं होतं. जेव्हा पैसे परत केले नाहीत, तेव्हा वाद वाढू लागले. अखेर तक्रारीनंतर त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. पैशांच्या दबावामुळे राहुलने दिल्लीला जाऊन चोरी करण्याचा प्लॅन केल्याचं तपासात उघड झालं आहे.

Web Title : मार्कशीट गिरवी रखकर ₹5 लाख जीते: राहुल मीणा के बारे में चौंकाने वाले खुलासे

Web Summary : राहुल मीणा की ऑनलाइन गेमिंग की लत ने उसे अपराध की ओर धकेल दिया। उसने अपनी मार्कशीट गिरवी रखकर ₹5 लाख जीते। बाद में, नुकसान बढ़ा, आईआरएस की नौकरी छूटने के बाद कर्ज बढ़ता गया, जिससे वह चोरी करने पर मजबूर हो गया।

Web Title : Marksheet Pawned, ₹5 Lakh Won: Shocking Revelations About Rahul Meena

Web Summary : Rahul Meena's online gaming addiction led him to crime. He pawned his marksheets and won ₹5 lakh. Later, losses mounted, debts piled up after IRS job loss, pushing him to theft.