९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 12:51 IST2026-04-24T12:50:25+5:302026-04-24T12:51:24+5:30

घटनेच्या १२ तासांत दिल्ली पोलिस राहुलपर्यंत कशी पोहचली, तो अलवरहून दिल्लीला कसा आला, घटनेच्या आदल्या रात्री त्याने काय केले आणि अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करून तो कुठे गेला यासारख्या विविध प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येत आहेत

2 rapes and 1 murder in 9 hours, first rape of friend wife then...; Accused Rahul meena truth revealed | ९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड

९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड

राजस्थानच्या अलवर येथे १९ वर्षीय मुलाने आधी मित्राच्या बायकोवर बळजबरीने बलात्कार केला. त्यानंतर तिथून फरार होऊन २२ एप्रिलला सकाळी दिल्लीत आला. दिल्लीत तो एका IRS अधिकाऱ्याच्या घरात घुसला आणि तिथे २२ वर्षीय युवतीवर बलात्कार करून तिची हत्या केली. हत्येच्या आदल्यादिवशी अन् हत्येनंतर आरोपी राहुलला पोलिसांना कसं पकडले याचा खुलासा झाला आहे. 

अवघ्या ९ तासांत आरोपी युवकाने ही कृत्य केलीत. अलवरहून दिल्लीपर्यंतची या निर्दयी आरोपीची कहाणी ऐकून कुणाचाही थरकाप उडेल. दिल्लीच्या उच्चभ्रू वस्तीतील अमर कॉलनी, जिथे आयआरएस अधिकारी दिनेश गुप्ता यांचे घर होते. या घरात सकाळी ६ वाजून २८ मिनिटांनी आरोपी शिरला. पिवळा शर्ट, काळी पँट आणि बूट घातलेले. आरोपी सातत्याने कुणाशी तरी फोनवर बोलत होता. हा आरोपी होता राहुल मीणा, ज्याचे वय केवळ १९ वर्ष आहे. या आरोपीने अधिकाऱ्याच्या मुलीसोबत बळजबरी केली आणि फोन चार्जरच्या वायरीने तिचा गळा दाबला. तिच्या डोक्यात जड वस्तूने मारहाण केली. त्यानंतर घरातून अडीच लाख घेऊन पसार झाला. 

परंतु घटनेच्या १२ तासांत दिल्ली पोलिस राहुलपर्यंत कशी पोहचली, तो अलवरहून दिल्लीला कसा आला, घटनेच्या आदल्या रात्री त्याने काय केले आणि अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करून तो कुठे गेला यासारख्या विविध प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येत आहेत. १२ वी पर्यंत शिक्षण घेतलेला राहुल अभ्यासात हुशार होता. दहावीत त्याला चांगले मार्क्स मिळाले होते. बारावीत त्याला ९० टक्के मार्क्स मिळाले होते. मात्र त्यानंतर अचानक राहुलला ऑनलाइन गेमिंगचा छंद लागला. तो ऑनलाइन लुडो खेळायचा. याच लुडोसाठी त्याने घरातील सामान, १० वी, १२ वीची मार्कशीट आणि त्याचा मोबाइलही गहाण ठेवला होता. अलीकडेच त्याने ऑनलाइन गेमिंगमधून ५ लाख जिंकले होते. 

२० एप्रिलला राहुल गावातील कुणाच्या तरी लग्नात गेला होता. राहुल आणि त्याचा मित्र विष्णू दोघे एकत्र लग्नाला जात होते. विष्णूने राहुलला त्याची बाईक दिली आणि चावी पत्नीला दे असं सांगितले. चावी देण्याच्या बहाण्याने राहुल मित्राच्या घरी गेला. तेव्हा मित्राची पत्नी एकटीच होती. त्यावेळी राहुलने तिच्यासोबत जबरदस्ती केली. मात्र लुडोमध्ये हरलेल्या पैशांमुळे विष्णूने हा खोटा आरोप लावल्याचा दावा राहुलने केला. विष्णूने राहुलला ९० हजार लुडो खेळायला दिले होते, परंतु ते पैसे परत देत नसल्याने विष्णूने हा आरोप केल्याचे आरोपी राहुलच्या बहिणीनेही म्हटलं.

राहुलने विष्णूच्या पत्नीवर बलात्कार करून तिचा मोबाइलही सोबत घेऊन गेला होता. दिल्ली पोलिसांनी हाच मोबाईल नंबर ट्रॅक केला. राहुल नॉर्मल कॉलऐवजी इंटरनेट कॉलिंगचा वापर करत होता. मात्र त्यासाठी त्याला वाय फान कनेक्शन आवश्यक होते. या फोनचे लोकेशन जेव्हा तो एखाद्या कॉलवर बोलत असेल तेव्हाच मिळू शकत होते. २२ एप्रिलला दुपारी राहुलच्या भावाच्या मोबाईलवर वारंवार एक इंटरनेट कॉल येत होता. पोलिसांनी राहुलच्या भावाची चौकशी केली तेव्हा राहुल त्याला कॉल करत असल्याचं समोर आले. या कॉलच्या माध्यमातून पोलिसांनी राहुल कुठे आहे याचा शोध घेतला. त्यानंतर पोलीस पथकाने एका हॉटेलच्या खोलीतून राहुलला अटक केली.  

Web Title : राजस्थान के व्यक्ति ने नौ घंटे में दिल्ली में बलात्कार, हत्या की

Web Summary : राजस्थान के एक 19 वर्षीय युवक ने अपने दोस्त की पत्नी से बलात्कार किया, दिल्ली भाग गया, एक महिला से बलात्कार और हत्या कर दी, और कीमती सामान चुरा लिया। दिल्ली पुलिस ने फोन रिकॉर्ड और इंटरनेट कॉल ट्रेसिंग का उपयोग करके उसे ट्रैक किया, और 12 घंटे के भीतर एक होटल में गिरफ्तार कर लिया।

Web Title : Rajasthan Man Commits Rape, Murder in Delhi Within Nine Hours

Web Summary : A 19-year-old Rajasthan man raped his friend's wife, fled to Delhi, raped and murdered a woman, stealing valuables. Delhi police tracked him down using phone records and internet call tracing, arresting him in a hotel within 12 hours.