Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 12:41 IST2026-04-24T12:40:49+5:302026-04-24T12:41:22+5:30

धारावीतील ‘नॉन स्लम’ म्हणून गणल्या जाणाऱ्या इमारतीमधील रहिवाशांना सुमारे ५०० चौरस फुटांचे घर मिळणार आहे.

Dharavi Redevelopment: 'Non-Slum' Residents to Get 500 Sq Ft Houses; State Government Issues Official Notice | Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर

Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: धारावीतील ‘नॉन स्लम’ म्हणून गणल्या जाणाऱ्या इमारतीमधील रहिवाशांना सुमारे ५०० चौरस फुटांचे घर मिळणार आहे. राज्य सरकारने याबाबत नोटीस प्रसिद्ध केली आहे. धारावीमधील लेबर कॅम्पच्या इमारती, काही हाउसिंग सोसायटी, महापालिका चाळींचा समावेश ‘नॉन स्लम’ म्हणून होतो. अशी सुमारे १० हजार 
बांधकामे आहेत. 

संबंधित बांधकामांना टेंडर डॉक्युमेंटप्रमाणे कमीत कमी ४०५ चौरस फुटांचे घर मिळणार होते. ४०५ चौरस फुटांमध्ये ३०५ चौरस फूट हे मूळ (बेसिक) आणि १०५ चौरस फुटांत फंजिबल चटई क्षेत्र निर्देशांकाचा (एफएसआय) समावेश होता. असे मिळून ४०५ चौरस फुटांचे घर मिळणार होते; पण आता कमीत कमीत ३७० चौरस फूट आणि त्यावर १३० चौरस फूट फंजिबलप्रमाणे नॉन स्लममध्ये गणल्या जाणाऱ्या रहिवाशांना कमीत कमी ५०० चौरस फुटांचे घर मिळणार आहे.  

कार्पेट एरियाचा प्रस्ताव

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५०० चौरस फुटांचा कार्पेट एरियाचा प्रस्ताव आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत संबंधित रहिवाशांना ही घरे मिळणार आहे, असे नोटिशीत म्हटले आहे.

एसआरएसाठीही लागू करा

सर्व एसआरए योजनांनाही हीच तरतूद लागू करण्याची मागणी आहे. सध्या ही सवलत प्रामुख्याने धारावी पुनर्विकास प्रकल्पापुरती मर्यादित असल्याने, इतर झोपडपट्टी पुनर्विकास योजनांतील रहिवाशांनाही समान लाभ मिळावा.

हरकती-सूचना महिनाभरात नोंदवा 

पुनर्वसन घरांचे क्षेत्र वाढवल्याने प्रकल्पांमध्ये रहिवाशांचा सहभाग वाढू शकतो आणि पुनर्विकास प्रक्रियेला गती मिळू शकते. मात्र, यामुळे प्रकल्पांच्या आर्थिक गणितावर, व्यवहार्यतेवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अंमलबजावणी करताना संतुलन राखणे आवश्यक आहे. सरकारकडून याबाबत महिनाभरात नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवल्या असून, निश्चित कालावधीत अभिप्राय सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, असे वॉचडॉग फाउंडेशनचे गॉडफ्रे पिमेंटा यांनी सांगितले. 

आरामदायी निवासस्थाने

वाढीव क्षेत्रामुळे रहिवाशांना अधिक सुसज्ज व आरामदायी निवास उपलब्ध होणार आहे. विशेषतः लहान घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांसाठी ही वाढ मोठा दिलासा देणारी ठरणार आहे.

Web Title : धारावी के गैर-झुग्गी निवासियों को मिलेंगे 500 वर्ग फुट के घर

Web Summary : राज्य सरकार की अधिसूचना के अनुसार, धारावी के 'गैर-झुग्गी' निवासियों को लगभग 500 वर्ग फुट के घर मिलेंगे। इससे लेबर कैंप, हाउसिंग सोसाइटियों और नगरपालिका भवनों में रहने वालों को लाभ होगा। 405 वर्ग फुट से जगह बढ़ाकर, इस कदम का उद्देश्य पुनर्विकास परियोजनाओं में रहने की स्थिति में सुधार करना है। आपत्तियां आमंत्रित हैं।

Web Title : Dharavi Non-Slum Residents to Get 500 Sq Ft Homes

Web Summary : Dharavi's 'non-slum' residents will receive approximately 500 sq ft homes, as per a new state government notice. This benefits those in labor camps, housing societies, and municipal buildings. The move, increasing space from 405 sq ft, aims to improve living conditions in redevelopment projects. Objections are invited.