ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 13:12 IST2026-04-24T13:11:44+5:302026-04-24T13:12:22+5:30

Zeekr 8X launch details 2026 : ताकद १३८१ HP आणि रेंज १४१६ किमी! झिकर ८एक्स SUV चे ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पाहा किंमत आणि फीचर्स.

Zeekr 8X launch details 2026 : What happened to this electric SUV launch, 10,000 bookings in 30 minutes; See which company is in such demand... | ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...

ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...

चिनी इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी 'झिकर'ने आपली बहुप्रतिक्षित Zeekr 8X ही फ्लॅगशिप SUV अधिकृतपणे लाँच केली आहे. प्री-सेल कालावधीतच ३०,००० हून अधिक ऑर्डर्स मिळवल्यानंतर, प्रत्यक्ष लाँचिंगच्या दिवशी या कारने ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळवला.

परफॉर्मन्स आणि तंत्रज्ञानाचा संगम
या कारच्या 'याओइंग एडिशन'मध्ये (Yaoying Edition) ट्राय-मोटर सिस्टम असून ती १,३८१ HP (१०३० kW) पॉवर जनरेट करते. ही SUV अवघ्या २.९६ सेकंदात ० ते १०० किमी प्रति तास वेग पकडू शकते. एकदा पूर्ण चार्ज आणि इंधन भरल्यानंतर ही कार १,४१६ किमी पर्यंतचा एकत्रित प्रवास करू शकते. केवळ इलेक्ट्रिक मोडवर ती ४१० किमी धावते. ९००V सिस्टममुळे यातील ७० kWh बॅटरी केवळ ९ मिनिटांत २०% वरून ८०% पर्यंत चार्ज होऊ शकते.

यात ड्युअल Nvidia Drive Thor चिप्सवर चालणारी 'कियानली हाओहान G-ASD' ड्रायव्हर असिस्ट सिस्टम देण्यात आली आहे.

किंमत आणि उपलब्धता
सुरुवातीची मर्यादित कालावधीसाठीची किंमत ३,२९,८०० युआन (सुमारे २७.८५ लाख रुपये) आहे. ३,५६,८०० ते ५,००,८०० युआन (सुमारे ३० लाख ते ४२ लाख रुपये). २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीपासून (Q3) ही कार युरोप, ऑस्ट्रेलिया आणि मध्य पूर्वेतील देशांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Web Title : Zeekr 008 SUV लॉन्च: 30 मिनट में 10,000 बुकिंग!

Web Summary : चीनी Zeekr 008 SUV लॉन्च होते ही छाई, 30 मिनट में 10,000 बुकिंग। याओइंग एडिशन 1,381 HP का है, 2.96 सेकंड में 0-100 किमी प्रति घंटे की रफ्तार पकड़ता है। यूरोप, ऑस्ट्रेलिया और मध्य पूर्व में Q3 2026 से उपलब्ध होने की संभावना है।

Web Title : Zeekr 008 SUV Launch: 10,000 Bookings in 30 Minutes!

Web Summary : Chinese Zeekr 008 SUV launched, exceeding expectations with 10,000 bookings in 30 minutes. The Yaoying Edition boasts 1,381 HP, accelerating 0-100 kmph in 2.96 seconds. Availability in Europe, Australia, and the Middle East is expected from Q3 2026.