सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 15:37 IST2026-04-23T15:36:18+5:302026-04-23T15:37:57+5:30
Iran Consulate Hyderabad AI video Trump : हैदराबादमधील इराणी दूतावासाने डोनाल्ड ट्रम्प यांचा एक उपरोधिक AI व्हिडिओ शेअर केला आहे. पाकिस्तानच्या विनंतीवरून सीझफायर वाढवल्याच्या दाव्याची यात खिल्ली उडवण्यात आली असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
इराण आणि अमेरिका यांच्यातील राजनैतिक युद्ध आता 'एआय' आणि सोशल मीडियाच्या रणांगणावर पोहोचले आहे. हैदराबाद येथील इराणी दूतावासाने आपल्या अधिकृत 'X' (ट्विटर) अकाऊंटवर एक व्यंगात्मक व्हिडिओ पोस्ट केला असून, त्याला “सीझफायर कसा वाढवण्यात आला? हा व्हिडिओ इराणमध्ये वेगाने व्हायरल होत आहे” असे कॅप्शन दिले आहे.
काय आहे या AI व्हिडिओमध्ये?
व्हिडिओमध्ये एआय-निर्मित डोनाल्ड ट्रम्प, उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस आणि इतर वरिष्ठ अधिकारी एका टेबलावर चर्चेसाठी इराणच्या प्रतिनिधींची वाट पाहताना दिसत आहेत. मात्र, इराणचे प्रतिनिधी तिथे पोहोचत नाहीत. दरम्यान, ट्रम्प त्यांच्या 'ट्रुथ सोशल'वर पोस्ट करताना दिसतात की, “आम्ही इराणसोबत खूप मोठी आणि चांगली चर्चा करत आहोत.” इराणचे प्रतिनिधी न आल्याने ट्रम्प चिडतात आणि म्हणतात, “जर इराण चर्चेसाठी आला नाही, तर आम्ही त्यांच्यावर बॉम्ब टाकू.”
"शट अप, ट्रम्प!": त्याच वेळी एक सहाय्यक ट्रम्प यांच्या हातात एक चिठ्ठी देतो, ज्यावर “शट अप, ट्रम्प” (गप्प बसा, ट्रम्प) असे लिहिलेले असते.
How was the ceasefire extended?
— Iran In Hyderabad (@IraninHyderabad) April 22, 2026
The video is getting viral in Iran. pic.twitter.com/UCldpWjZMO
पाकिस्तानचा संदर्भ
शेवटी, ट्रम्प मिश्किलपणे म्हणतात, “ठीक आहे, तर मग मी पाकिस्तानच्या विनंतीवरून सीझफायर वाढवत आहे,” आणि हसत तिथून निघून जातात.
या उपरोधामागचे कारण...
डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच घोषणा केली होती की, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करी नेतृत्वाच्या विनंतीवरून ते इराणसोबतचा सीझफायर अनिश्तित काळासाठी वाढवत आहेत. जेणेकरून इराणला शांतता चर्चेसाठी सविस्तर प्रस्ताव तयार करण्यास वेळ मिळेल. मात्र, इराणने अमेरिकेच्या या दाव्यावर अविश्वास दाखवत चर्चेसाठी अद्याप संमती दिलेली नाही.