Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 12:45 IST2026-04-23T09:41:06+5:302026-04-23T12:45:12+5:30
अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्ध, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूतील मतदान, बारामती आणि राहुरी पोटनिवडणूक, आयपीएल स्पर्धा या आणि अशा महाराष्ट्रासह ...

Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्ध, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूतील मतदान, बारामती आणि राहुरी पोटनिवडणूक, आयपीएल स्पर्धा या आणि अशा महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...
LIVE
23 Apr, 26 : 12:49 PM
भोंदू अशोक खरातचं प्रकृतीविषयी रडगाणं
पीडित महिलांचे शोषण करणारा भोंदू अशोक खरात महागड्या कारशिवाय प्रवास करत नसे. आलिशान राहणीमान, स्वतःवर पैशांची उधळपट्टी असं आरामदायी जीवन जगणारा अशोक खरात आता एसआयटीच्या ताब्यात असताना रोजच वैद्यकीय तक्रारी करतोय. गेल्या पाच दिवसात दोन वेळेस खरातच्या छातीत कळा आल्याने त्याची तातडीने वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वाचा सविस्तर
23 Apr, 26 : 12:44 PM
"चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
अमेरिका-इराण यांच्यातील शांतता चर्चेबद्दल अजूनही स्पष्टता आलेली नाही. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी यावर भाष्य करताना म्हटले आहे की, इराण चर्चेचे स्वागतच करतो, पण धमक्या यात अडथळा बनू लागल्या आहेत.
अमेरिकेकडून दुसऱ्या फेरीतील चर्चेसाठी इराणने पुढे येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी हे विधान केले आहे.
"इराण चर्चा आणि कराराचे स्वागतच करतो आणि पुढेही करतच राहील. शब्द न पाळणे, नाकेबंदी करणे आणि धमक्या देणे हे सगळे चर्चेमध्ये अडथळे आणत आहे. तुमचा (अमेरिका) कधीही न संपणारा दुटप्पीपणा, दावे आणि काम यातील फरक जग बघत आहे", अशा शब्दात इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्रम्प यांना सुनावले.
23 Apr, 26 : 12:43 PM
अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका सिरोहीचा अचानक मृत्यू झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्री राहत्या घरी अचानक बेशुद्ध पडली आणि २१ एप्रिल रोजी तिचा मृत्यू झाला. ती केवळ ३० वर्षांची होती. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ एप्रिल रोजी ज्या दिवशी दिव्यांकाचा मृत्यू झाला, त्या दिवशी ती पूर्णपणे नॉर्मल होती. तिची प्रकृतीही ठीक होती. तिने आपल्या भावासोबत जेवणही केलं होतं. दिव्यांकाने त्यावेळी आपली तब्येत थोडी ठीक नसल्याचं आणि अस्वस्थ वाटत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर तिचा भाऊ कामासाठी बाहेर गेला आणि त्याने दिव्यांकाला घराचा दरवाजा बंद करण्यास सांगितलं. वाचा सविस्तर
23 Apr, 26 : 12:22 PM
रत्नागिरी : खेड तालुक्यात रासायनिक सांडपाण्याचा धक्का; पिवळ्या पाण्यामुळे १६ ग्रामस्थ आजारी
खेड तालुक्यातील पिरलोटे येथील दत्तवाडी, विठ्ठलवाडी आणि गावठाणवाडी येथील नळांना रासायनिक सांडपाणी मिश्रित पिवळ्या रंगाचे पाणी आल्याने ग्रामस्थांच्या संताप अनावर झाला. यामुळे १६ जणांची प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी पिरलोटे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं.
23 Apr, 26 : 12:00 PM
बारामती विधानसभा पोटनिवडणूक : सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान झाले
बारामती विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक-२०२६ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला उत्साहात सुरुवात झाली असून, सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान झाले आहे. सकाळच्या सत्रात मतदारांचा कल चांगला पाहायला मिळत असून, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे.
23 Apr, 26 : 11:58 AM
आमदार भास्करराव जाधव यांनी केली चिपळूणमधील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी
शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांनी मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण येथील बहादुरशेख नाका येथील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. दोन वर्षांपूर्वी बहादूरशेख नाका येथे या उड्डाणपुलाचा एक मोठा भाग गर्डरसह कोसळला होता. या पार्श्वभूमीवर पुन्हा अशी दुर्घटना घडू नये म्हणून कोणती काळजी घेण्यात आली आहे आणि उपाययोजना करण्यात आल्या आहेत तसेच या पुलाच्या कामासाठी वापरण्यात येत असलेल्या साहित्याचा दर्जा या सगळ्याची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली. येत्या पावसाळ्यापूर्वी हा उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना देखील त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली.
23 Apr, 26 : 11:49 AM
सकाळी ११ वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये तब्बल ४१ टक्के मतदान, तर तामिळनाडूत ३७ टक्के मतदान
विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी ११ वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये तब्बल ४१ टक्के मतदान, तर तामिळनाडूत ३७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला
23 Apr, 26 : 11:43 AM
हिंगोली : माजी आमदार बळीराम पाटील कोटकर यांचे निधन
हिंगोली : हिंगोली जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बळीराम पाटील कोटकर यांचे निधन झाले आहे. त्यांनी १९९० ते १९९९ या काळात सलग दोन वेळा हिंगोली विधानसभेचे प्रतिनिधित्व करत भारतीय जनता पक्षाचा गड मजबूत केला होता.
23 Apr, 26 : 11:36 AM
राहुरीत ११ वाजेपर्यंत १८.२२ टक्के मतदान
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सकाळी ११ वाजेपर्यंत १८.२२ टक्के मतदान पार पडले.
23 Apr, 26 : 11:23 AM
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सकाळी नऊ वाजेपर्यंत साडेसहा टक्के मतदान
अहिल्यानगरमधील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सकाळी नऊ वाजेपर्यंत साडेसहा टक्के मतदानाची नोंद झाली
23 Apr, 26 : 11:20 AM
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत नऊ वाजेपर्यंत साडेसहा टक्के मतदान
अहिल्यानगर येथील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत असून सकाळी नऊ वाजेपर्यंत साडेसहा टक्के मतदान झालं आहे.
23 Apr, 26 : 11:19 AM
पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार? सरकारने दिले स्पष्टीकरण
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. "पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार असल्याच्या काही बातम्या सध्या पसरत आहेत. मात्र, केंद्र सरकार असा कोणताही दरवाढीचा विचार करत नाहीये. अशा बातम्या केवळ नागरिकांमध्ये भीती आणि गोंधळ निर्माण करण्यासाठी पसरवल्या जात आहेत. त्या पूर्णपणे खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत. उलट, गेल्या ४ वर्षांत पेट्रोल-डिझेलच्या किमती न वाढलेला भारत हा एकमेव देश आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात किमती वाढूनही भारतीय नागरिकांना त्याचा फटका बसू नये, यासाठी भारत सरकार आणि सरकारी तेल कंपन्यांनी सातत्याने ठोस पावले उचलली आहेत."
23 Apr, 26 : 10:39 AM
पनवेलमध्ये प्रदूषण नियंत्रणाचा फज्जा; यंत्रणा कागदावरच
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात काही दिवसांपूर्वी बांधकाम प्रकल्पांवर वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण व पर्यावरणीय नियमांच्या उल्लंघनाबाबत व्यापक तपासणी करून कारवाई करण्यात आली होती. आतापर्यंत एकूण ३८ बांधकाम स्थळांवर पालिकेतर्फे कारवाई करण्यात आली आहे, तर शेकडो बांधकाम प्रकल्पांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
23 Apr, 26 : 10:29 AM
बारामतीत पहिल्या दोन तासात ८.१% मतदान
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी सात ते नऊ या दोन तासात ८.०१ टक्का इतके मतदान झाले आहे. या निवडणुकीसाठी ३ लाख ८४ ,हजार ५७९ मतदार आहेत पहिल्या दोन तासात ३० हजार ७९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.उन्हाची तीव्रता असल्याने मतदानाचा टक्का वाढण्यासाठी जय पवार मतदान केंद्रांवर बूथप्रमुखांच्या भेटी घेत आहेत.
23 Apr, 26 : 10:29 AM
बारामतीत पहिल्या दोन तासात ८.१% मतदान
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी सात ते नऊ या दोन तासात ८.०१ टक्का इतके मतदान झाले आहे. या निवडणुकीसाठी ३ लाख ८४ ,हजार ५७९ मतदार आहेत पहिल्या दोन तासात ३० हजार ७९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.उन्हाची तीव्रता असल्याने मतदानाचा टक्का वाढण्यासाठी जय पवार मतदान केंद्रांवर बूथप्रमुखांच्या भेटी घेत आहेत
23 Apr, 26 : 10:25 AM
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हिंसाचार, नवादा येथे अज्ञाताने फेकले क्रूड बॉम्ब, अनेकजण जखमी
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान हिंसाचार झाला आहे, मुर्शिदाबादमधील नवादा येथे अज्ञाताने फेकलेल्या क्रूड बॉम्बचा स्फोट होऊन अनेकजण जखमी झाले आहेत.
23 Apr, 26 : 10:05 AM
सुप्रिया सुळेंनी बजावला मतदानाचा हक्क
VIDEO: बारामती मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीत सुप्रिया सुळेंनी बजावला मतदानाचा हक्क #SupriyaSule#Baramatipic.twitter.com/G2rlx3hAWt
— Lokmat (@lokmat) April 23, 2026
23 Apr, 26 : 09:56 AM
अभिनेते रजनीकांत यांनी चेन्नई येथे बजावला मतदानाचा हक्क
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी अभिनेते रजनीकांत यांनी चेन्नई येथे मतदानाचा हक्क बजावला.
Tamil Nadu polls: Superstar Rajinikanth casts his vote in Chennai
— ANI Digital (@ani_digital) April 23, 2026
Read @ANI Story |https://t.co/WpxyRs3AGu#TamilNaduElections#Rajinikanth#Chennaipic.twitter.com/jJ3YJyKlu1
23 Apr, 26 : 09:54 AM
सुनेत्रा पवार, पार्थ पवार, सुप्रिया सुळे यांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत सकाळपासून मतदानाला सुरुवात
सुनेत्रा पवार, पार्थ पवार, सुप्रिया सुळे यांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत सकाळपासून मतदानाला सुरुवात
23 Apr, 26 : 09:50 AM
२०२९ मध्ये मी बारामतीचा उमेदवार व्हावं ही लोकांची इच्छा- जय पवार
लोकांची इच्छा आहे की २०२९ मध्ये बारामतीचा उमेदवार असावं. पण माझी अपेक्षा आहे की मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहावं. मात्र लोकांची तशी इच्छा आहे, असे जय पवार यांनी म्हटलं.
23 Apr, 26 : 09:48 AM
दादा बोलायला कडक पण मनाने मवाळ होते - रोहित पवार
बारामतीत कायम दादा आणि साहेबांसाठी प्रचार करायचो, दादा बोलायला कडक पण मनाने मवाळ होते. अधिवेशनातही दादांचे आमच्याकडे बारकाइने लक्ष असायचे. दादांसोबतच्या बऱ्याच आठवणी आहेत. आज बारामतीकरांनी मोठ्या संख्येने मतदान करावे असं आवाहन आमदार रोहित पवारांनी केले.
23 Apr, 26 : 09:47 AM
लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा मूलभूत बजावा- सुनेत्रा पवार
आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने या देशाची एक जबाबदार नागरिक म्हणून काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मतदानाचा हक्क बजावला.
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) April 23, 2026
लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी आपला मतदानाचा मूलभूत हक्क बजावावा. pic.twitter.com/6quwtmdNCD
23 Apr, 26 : 09:46 AM
मतदानापूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी अजित पवारांना वाहिली आदरांजली
आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी विद्या प्रतिष्ठान येथे अजितदादांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले, मनापासून आदरांजली वाहिली. pic.twitter.com/Byp5K8IoXA
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) April 23, 2026