जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 11:57 IST2026-04-23T11:56:14+5:302026-04-23T11:57:57+5:30
चार खंडांमध्ये रिफायनरीमध्ये अपघात झाले, त्यात मिसाइल नव्हते, ड्रोन नव्हते. हे अपघात अशावेळी घडले जेव्हा मध्य पूर्वेतील युद्धामुळे जग इतर पुरवठादाराच्या शोधात आहे.

जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
नवी दिल्ली - पश्चिम आशियातील संकटात मागील ५७ दिवसांपासून भारत, अमेरिका, पाकिस्तानसह जगात कच्च्या तेलावर प्रक्रिया करणाऱ्या ११ रिफायनरीत अचानक आग लागणे, विस्फोट होणे यासारख्या घटना घडल्या आहेत. त्यातील एक राजस्थानच्या बालोतरा येतील पाचपद्रा रिफायनरी प्रकल्पात अलीकडेच आगीची घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी या रिफायनरीचं २१ एप्रिलला उद्घाटन करणार होते. परंतु या कार्यक्रमाच्या एक दिवस आधीच २० एप्रिलला इथं आग लागली. ज्यामुळे पंतप्रधान मोदींचा दौरा टळला. या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे. सोशल मीडियात अनेक एक्सपर्ट या घटनांच्या टायमिंगवरून प्रश्न उपस्थित करत आहेत.
भारतासह जगातील रिफायनरींना धोका?
रिफायनरीवरील सर्वात ताजी घटना पाकिस्तानच्या नॅशनल रिफायनरी लिमिटेडची जोडलेली आहे. बलुचिस्तानमधील पाकिस्तानच्या नॅशनल रिफायनरी लिमिटेडच्या दारिगवान येथील प्रकल्पावर एका अज्ञात बंदूकधाऱ्याने हल्ला केला. त्यानंतर सुरक्षा दलांनी हा प्रकल्प सुरक्षित करण्यासाठी मोहीम सुरू केली असे कंपनीने बुधवारी सांगितले. २८ फेब्रुवारीपासून अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध युद्ध पुकारले आहे, ज्यामुळे जगभरात ऊर्जेचे संकट निर्माण झाले आहे. त्यात रिफायनरी दुर्घटनांचं टायमिंगही समजून घ्यायला हवे असं सोशल मीडियावर अमेरिका-इराण युद्धावर बारकाईने लक्ष ठेवून असलेल्या एका तज्ज्ञाने म्हटले आहे.
🇮🇳🛢️ ANOTHER Oil Refinery on Fire. Is Someone Doing This on Purpose?
— Ryan Rozbiani (@RyanRozbiani) April 20, 2026
Since February 28, the same day Israel and the U.S. started the war on Iran and triggered a global energy crisis:
- Ecuador's largest refinery caught fire for the THIRD time in nine months
- Australia's Viva… pic.twitter.com/g9EHuRVs0Q
रिफायनरीच्या घटनांचा असा आहे 'घटनाक्रम'
इक्वेडोरच्या सर्वात मोठ्या रिफायनरीला गेल्या नऊ महिन्यांत तिसऱ्यांदा आग लागली.
ऑस्ट्रेलियाच्या विवा एनर्जी जिलॉंगमध्ये स्फोट झाला, ज्यामुळे देशाच्या १०% इंधन पुरवठ्याला धोका निर्माण झाला.
रशियाच्या निझनेकामस्कनेफ्तेखिम प्लांटमध्ये स्फोट झाला, ज्यात तीन जणांचा मृत्यू झाला.
भारताच्या ओएनजीसी मुंबई हाय ऑफशोअर आगीत १० कामगारांचा मृत्यू झाला.
अमेरिकेतील टेक्सासमधील व्हॅलेरो पोर्ट आर्थर रिफायनरीमधून १,५७,००० पाउंड रसायने गळती झाली, ज्यामुळे १० दिवस आकाशात धुराचे लोट पसरले.
भारतात पंतप्रधान मोदी राजस्थानमधील पाचपद्रा रिफायनरीचे उद्घाटन करणार होते, त्याच वेळी तिथे आग लागली.
11 refinery fires since February 28. half the internet thinks it's coordinated sabotage.
— The Infrastructure Thesis (@InfraThesis) April 22, 2026
The Russian ones are Ukrainian drone strikes. the rest is simpler. the Geelong refinery in Australia is from the 1950s and admitted they deferred maintenance in March to keep throughput up.… https://t.co/Vu2IYz7HYU
ना मिसाइल, ना ड्रोन...फक्त तेल रिफायनरीत अपघात
चार खंडांमध्ये रिफायनरीमध्ये अपघात झाले, त्यात मिसाइल नव्हते, ड्रोन नव्हते. हे अपघात अशावेळी घडले जेव्हा मध्य पूर्वेतील युद्धामुळे जग इतर पुरवठादाराच्या शोधात आहे. जागतिक ऊर्जा बाजारांवर दबाव वाढवण्यासाठी रचलेला हा एक गुप्त हल्ला आहे. देशांना युद्धात सहभागी होण्यास नकार देण्यास भाग पाडले जात आहे असं तज्ज्ञांनी म्हटलं. यातून प्रत्येक वस्तूच्या किंमती वाढतील आणि सरकारकडे पर्याय राहणार नाही. अमेरिका रेकॉर्ड ब्रेक तेल आणि गॅस विक्री करत आहे. योगायोग ही एक गोष्ट आहे. ४५ दिवसांच्या आत चार खंडांतील सहा तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर अशा घटना घडणे, हा एक प्रकारचा पॅटर्न आहे.
हा एक सुनियोजित कट?
दरम्यान, २८ फेब्रुवारीपासून ११ रिफायनरींना आग लागली आहे. त्यामुळे हा एक सुनियोजित कट असल्याची चर्चा आहे असं एका संशोधन आणि विश्लेषण साइटने पोस्ट केले आहे. रशियातील आगी युक्रेनियन ड्रोन हल्ल्यांमुळे लागल्याचे म्हटले जात आहे. भारतात, टेक्सासमध्ये आणि रोमानियामध्येही अशीच परिस्थिती आहे. जेव्हा होर्मुझच्या सामुद्रधुनीची दररोज ६ मिलियन बॅरलची क्षमता कमी होते, तेव्हा प्रत्येक उर्वरित रिफायनरी तिच्या निर्धारित मर्यादेपलीकडे काम करते. केवळ मार्च महिन्यात जागतिक तेलसाठा ८५ मिलियन बॅरलने कमी झाला आहे.