२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 13:27 IST2026-04-23T13:26:02+5:302026-04-23T13:27:18+5:30
तज्ज्ञांच्या मते, ग्लोबल वॉर्मिंगसंदर्भात वेळीच कठोर पावले उचलली गेली नाही, तर २०२६ हे वर्ष किनारपट्टी भागातील शहरांसाठी घातक ठरू शकते. यामुळे भविष्यात उष्णतेच्या लाटा अधिक धोकादायक ठरतील.

२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
बाल्कनच्या नॉस्ट्राडेमस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा वेंगा यांच्या अनेक भाकितांनी आजवर जगाला थक्क केले आहे. आता त्यांनी २०२६ संदर्भात केलेली उष्णतेच्या लाटेसंदर्भातील भविष्यवाणी चर्चेत आली आहे. बाबा वेंगा यांच्या मते, २०२६ मध्ये मानवाला भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार आहे.
सध्या एप्रिल महिन्यातच प्रचंड उष्णता जाणवू लागली आहे. उष्णतेच्या लाटांनी (Heat Wave) लोक त्रस्त झाले आहेत. बाबा वेंगा यांनी काही वर्षांपूर्वीच हवामान बदलामुळे (Climate Change) वाढणारे तापमान आणि नैसर्गिक असंतुलनाचे भाकीत केले होते. २०२६ साठी त्यांनी भीषण उष्णता, दुष्काळ, उष्ण वारे आणि तीव्र पाणीटंचाईचे संकेत दिले आहेत. खरेतर, वाढत्या तापमानामुळे ही भविष्यवाणी आता खरी ठरताना दिसत आहे.
एसी आणि कुलरही होणार फेल? -
वाढत्या उष्णतेमध्ये एसी आणि कुलर फेर होतील, असा थेट दावा कोणत्याही भविष्यवाणीत करण्यात आलेला नसला तरी, जेव्हा तापमान उच्चांक गाठते तेव्हा सामान्य कुलिंग सिस्टीमचा प्रभाव कमी होतो. यामुळे, केवळ भविष्यावाणीवर अवलंबून न राहता वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार करणेही आवश्यक आहे. वैज्ञानिकांच्या मते, अंटार्क्टिकातील हिमनद्या वेगाने वितळताना दिसत आहेत. जो हवामानाच्या दृष्टीने शुभ संकेत नाहीत.
तज्ज्ञांच्या मते, ग्लोबल वॉर्मिंगसंदर्भात वेळीच कठोर पावले उचलली गेली नाही, तर २०२६ हे वर्ष किनारपट्टी भागातील शहरांसाठी घातक ठरू शकते. यामुळे भविष्यात उष्णतेच्या लाटा अधिक धोकादायक ठरतील.