Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 14:49 IST2026-04-23T14:48:37+5:302026-04-23T14:49:49+5:30

Monalisa Bhosle : मोनालिसाच्या लग्नावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर तिच्या आई-वडिलांनी सरकारकडे मदत मागितली असून आपल्या मुलीला परत आणण्याची मागणी केली आहे.

Monalisa Bhosle Farman Khan wedding controversy mother father and advocate pratham Dubey reaction | Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले

Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले

महाकुंभमेळ्यादरम्यान चर्चेत आलेल्या मोनालिसाच्या लग्नावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर तिच्या आई-वडिलांनी सरकारकडे मदत मागितली असून आपल्या मुलीला परत आणण्याची मागणी केली आहे. आईने असा आरोप केला की, "आमच्या मुलीला चित्रपट बनवण्याचं आमिष दाखवून फसवून नेण्यात आलं." याच दरम्यान वकील प्रथम दुबे यांनी सांगितलं की, आम्ही राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडे (NCST) तक्रार केली होती. तिला जबरदस्तीने केरळला नेऊन लग्न लावून देण्यात आलं, मात्र ती अल्पवयीन आहे. या प्रकरणात सामील असलेल्या इतर व्यक्तींबाबतही आमच्याकडे माहिती असून ती आम्ही लवकरच समोर आणू असा दावाही वकिलांनी केला आहे.

मीडियाशी बोलताना मोनालिसाची आई भावुक झाली, ढसाढसा रडली. त्या म्हणाल्या, "मोनालिसाचे वडील तिच्यासोबतच असायचे. माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची आम्हाला पुसटशीही कल्पना नव्हती. आम्ही शिकलेले नसल्याने आम्हाला काही समजत नाही. तिच्या वडिलांना बाजूला सारून ते माझ्या मुलीला घेऊन गेले. तिला काहीही माहिती नाही. गेल्या दीड महिन्यापासून ती बेपत्ता आहे, सरकारने तिला परत आणावं, हीच आमची विनंती आहे. तिला केवळ चित्रपट बनवण्याचं खोटं आमिष दाखवण्यात आलं."

 महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...

"आम्हाला मूर्ख बनवलं"

मोनालिसाच्या वडिलांनीही संताप व्यक्त करत आरोप केला की, "त्या लोकांनी आम्हाला मूर्ख बनवलं. आम्ही अडाणी आहोत. आमच्या मुलीला फसवून घेऊन गेले. सरकारने आमची मुलगी आम्हाला परत आणून द्यावी." 

महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?

"मुलगी अल्पवयीन आहे”

वकील प्रथम दुबे म्हणाले, "केरळचे डीजीपी दावा करत आहेत की ती मुलगी अल्पवयीन आहे याची त्यांना कल्पना नव्हती. मात्र आयोगाच्या तपास अहवालात याचा स्पष्ट उल्लेख आहे. मी तुम्हाला महेश्वर नगरपालिकेतून मिळालेला तिचा जन्म दाखला दाखवू शकतो, ज्याच्या आधारे तिची जुनी सर्व कागदपत्रं रद्द करण्यात आली आहेत."

ते पुढे म्हणाले की, "या तपास अहवालाची प्रत मध्य प्रदेशचे डीजीपी, खरगोनचे एसपी, महेश्वर नगरपालिका आणि केरळच्या डीजीपींना पाठवण्यात आली आहे. या प्रकरणात अनेक मोठ्या व्यक्तींचा हात असून त्याबाबतचे पुरावे आम्ही आयोगाकडे दिले आहेत. या प्रकरणातील दोषींवर कट रचणं आणि गुन्हेगारी कृत्य करण्याच्या कलमान्वये कडक कारवाई केली जाईल."

 "मला १० वेळा चुकीचा स्पर्श केला, अत्यंत घाणेरडा माणूस"; मोनालिसाचा सनोज मिश्रांवर गंभीर आरोप

"तो अभिनेता नाही..."; 'लव्ह जिहाद' म्हणणाऱ्या सनोज मिश्रांनी सांगितलं मोनालिसाच्या नवऱ्याचं सत्य

नेमकं प्रकरण काय?

महाकुंभमेळ्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेली 'व्हायरल गर्ल' मोनालिसा भोसले हिने ११ मार्च रोजी केरळमधील एका मंदिरात फरमान खान नावाच्या व्यक्तीशी लग्न केलं होतं. या लग्नामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. मोनालिसाच्या पालकांनी याप्रकरणी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांची भेट घेऊन मदतीची मागणी केली आहे.
 

Web Title : मोनालिसा के माता-पिता का रो-रोकर बुरा हाल, बेटी के विवाह पर मांगी मदद।

Web Summary : मोनालिसा के माता-पिता ने केरल में जबरन विवाह के बाद मदद की गुहार लगाई है। उनका दावा है कि उसे फिल्म के प्रस्तावों से बहकाया गया और वह नाबालिग है। वकीलों ने अपहरण और शोषण का आरोप लगाते हुए शिकायत दर्ज की है।

Web Title : Monalisa's parents weep, seek help after daughter's controversial marriage.

Web Summary : Monalisa's parents are pleading for help after she was allegedly lured into a forced marriage in Kerala. They claim she was misled with film offers and is underage. Lawyers have filed complaints, alleging abduction and exploitation.