तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 15:09 IST2026-04-23T15:06:37+5:302026-04-23T15:09:05+5:30
चीनने या आफ्रिकन देशांवर आर्थिक दबाव आणला असा आरोप तैवानच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनीही केला आहे

तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
तैवानचे राष्ट्रपती लाई चिंग ते का यांना त्यांचा परदेश दौरा रद्द करावा लागला आहे आणि यामागचे कारण हैराण करणारे आहे. ज्या देशांच्या एअर स्पेसमधून तैवानच्या राष्ट्रपतींचे विमान जाणार होते, त्यांनी अचानक त्यांच्या विमानाला एअरस्पेस क्लियरन्स देण्यास नकार दिला. यामागे अमेरिकेने थेटपणे चीनवर दबाव बनवल्याचा आरोप केला आहे.
तैवाननं दिलेल्या माहितीनुसार, सेशेल्स, मॉरिशस आणि मेडागास्कर यांनी आधी परवानगी दिली होती परंतु त्यानंतर ही परवानगी मागे घेण्यात आली. तैवानच्या राष्ट्रपतींना काही मोजक्या मित्र राष्ट्रांपैकी एक असलेल्या इस्वातीनीला पोहोचण्यासाठी या देशांच्या हवाई क्षेत्रातून प्रवास करावा लागणार होता. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलं आहे. इंटरनॅशनल एअरस्पेसचा वापर केवळ सुरक्षेच्या दृष्टीने व्हायला हवा. ना कुठल्याही देशावर दबाव आणण्यासाठी नव्हे. जगात तैवानला एकाकी पाडण्याचा आणि तेथील नेत्यांच्या हालचालींवर निर्बंध घालण्याचा हा चीनचा स्पष्ट प्रयत्न आहे असं अमेरिकी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
चीनवर आफ्रिकन देशांवर दबाव टाकल्याचा आरोप
चीनने या आफ्रिकन देशांवर आर्थिक दबाव आणला असा आरोप तैवानच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनीही केला आहे. त्यात कर्ज माफी रोखणे आणि दुसऱ्या आर्थिक नुकसानीची धमकी देणे यांचा समावेश आहे. परंतु चीनने त्यांच्यावरील आरोप फेटाळले. त्याशिवाय या देशांनी घेतलेल्या निर्णयाचेही कौतुक करत वन चायना पॉलिसीचा हवाला दिला.
युरोप ब्रिटननेही केली चीनवर धोरणात्मक टीका
दरम्यान, या प्रकरणात ब्रिटन आणि युरोप यांनीही चिंता व्यक्त केली आहे. एअरस्पेसची निगडित निर्णय पारदर्शक असले पाहिजे, कुठल्याही राजनैतिक फायद्यासाठी त्याचा वापर होता कामा नये असं युरोपियन यूनियनही म्हटलं आहे. अशा निर्णयात सुरक्षा आणि स्थिरतेला प्राधान्य द्यायला हवे असं ब्रिटनने सांगितले. चीन तैवानला त्यांचा भाग असल्याचं मानतो. परंतु तैवान स्वत:ला वेगळा देश असल्याचे सांगते. चीन कायम इतर देशांवर दबाव आणून त्यांना तैवानपासून दूर राहण्यास सांगते. परंतु तैवानच्या राष्ट्रपतींना एअरस्पेस न मिळाल्याने परदेश दौरा रद्द करावा लागला ही पहिलीच वेळ आहे.