Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम

Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम

ऑफिसमध्ये अनेकदा खेळीमेळीचं वातावरण असतं. सीनियर्स आणि ज्युनिअर्स एकमेकांसोबत काम करतात. पण याच दरम्यान नेहमीच जनरेशन गॅपची चर्चा रंगते. असाच एक नवीन सर्व्हे समोर आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 16:29 IST2026-04-23T16:22:48+5:302026-04-23T16:29:56+5:30

ऑफिसमध्ये अनेकदा खेळीमेळीचं वातावरण असतं. सीनियर्स आणि ज्युनिअर्स एकमेकांसोबत काम करतात. पण याच दरम्यान नेहमीच जनरेशन गॅपची चर्चा रंगते. असाच एक नवीन सर्व्हे समोर आला आहे.

Gen Z return the favour, confess they do not trust the abilities of senior members at work | Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम

Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम

ऑफिसमध्ये अनेकदा खेळीमेळीचं वातावरण असतं. सीनियर्स आणि ज्युनिअर्स एकमेकांसोबत काम करतात. पण याच दरम्यान नेहमीच जनरेशन गॅपची चर्चा रंगते. असाच एक नवीन सर्व्हे समोर आला आहे. त्यानुसार 'जेन झी' (Gen Z) मधील तरुणांना त्यांचे वरिष्ठ सहकारी अकार्यक्षम वाटत असून, ते नवीन गोष्टी शिकण्यास किंवा वातावरणाशी जुळवून घेण्यास तयार नसल्याचं समोर आलं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँडच्या संशोधकांनी केलेल्या या संशोधनात असं दिसून आलं की, तरुण कर्मचारी केवळ त्यांच्या वरिष्ठांवर अविश्वासच दाखवत नाहीत, तर त्यांच्या एकंदरीत कार्यक्षमतेवर कडाडून टीकाही करत आहेत. ऑस्ट्रेलिया आणि तैवानमधील कर्मचाऱ्यांच्या सर्व्हेतून असं समोर आलं आहे की, वरिष्ठ सहकाऱ्यांनी काहीतरी नवीन शिकावं या बाबतीत तरुण पिढी कमी सहनशील आहे.

तरुण आणि ज्येष्ठ कर्मचारी एकत्र कसे काम करतात हे समजून घेण्यासाठी एकूण ४०० कर्मचाऱ्यांवर प्रयोग करण्यात आला. या अभ्यासाचे मुख्य लेखक डॉ. चॅड चिऊ म्हणाले, "कामाच्या ठिकाणची रचना आता अधिक 'हॉरिझॉन्टल' (समान पातळीवरील) होत चालली आहे, याचा अर्थ असा की, मोठ्या वयोगटातील तफावत असलेले लोक अनेकदा एकाच पदावर काम करताना दिसतात." यामुळे तरुण कर्मचारी अनेकदा असा विचार करतात की, ठराविक ज्येष्ठ लोक त्यांच्याच पातळीवर का काम करत आहेत आणि ते मोठ्या पदापर्यंत का पोहोचले नाहीत.

सोशल मीडियावर टीका

संशोधकांच्या मते, तरुण पिढी अनेकदा सोशल मीडियावर आपल्या वरिष्ठांवर टीका करते. डॉ. चिऊ म्हणाले, "जेव्हा तरुण कर्मचारी त्यांच्यासारख्याच पदावर काम करणाऱ्या वरिष्ठ सहकाऱ्यांसोबत काम करतात, तेव्हा ते अनेकदा चुकीचे तर्क लावतात की हे लोक करिअरमध्ये पुढे का गेले नाहीत." ही कार्यपद्धती आणि त्यांच्यातील संवाद नेमका कसा आहे, हे समजून घेण्यासाठी टीमने अभ्यास केला, ज्याचा निष्कर्ष फारसा समाधानकारक नव्हता.

पहिला प्रयोग - विश्वासार्हतेचं मोजमाप

हा अभ्यास दोन प्रयोगांमध्ये विभागला होता. पहिल्या प्रयोगात तैवानमधील कन्सल्टिंग आणि टेक कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या १९९ तरुण कर्मचाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांच्या विश्वासार्हतेबद्दल विचारण्यात आलं. संशोधकांना असं आढळलं की, बहुतेकांनी आपल्या वरिष्ठांना 'अविश्वासू' मानलं. धक्कादायक म्हणजे, हे मत त्यांच्या कौशल्य किंवा क्षमतेवर आधारित नसून केवळ त्यांच्या वयावरून बनवण्यात आलं होतं.

दुसरा प्रयोग - कार्यक्षमतेवर शंका

दुसऱ्या प्रयोगात २२ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या १७७ ऑस्ट्रेलियन लोकांचा समावेश होता. त्यांना एका ५५ वर्षीय इंजिनीअरबद्दल मत विचारण्यात आलं. तरुणांनी त्या इंजिनीअरच्या क्षमतेवर कमी विश्वास दाखवला. डॉ. चिऊ यांच्या मते, "तरुणांना कदाचित ते वरिष्ठ सहकारी प्रेमळ किंवा मदतीला धावणारे वाटले असतील, पण त्यांना ते 'उपयोगी' वाटले नाहीत."

सर्वसमावेशक कार्यसंस्कृतीची गरज

या सर्व्हेमधून असं स्पष्ट झालं की, केवळ वयाने मोठं असणं म्हणजे सर्व प्रक्रियांमध्ये निपुण असणं असं नाही. ज्येष्ठ कर्मचाऱ्यांनाही बदलत्या वातावरणात टिकून राहण्यासाठी मदतीची आणि पाठिंब्याची गरज असते. हा अहवाल अशा मॅनेजर्ससाठी महत्त्वाचा आहे ज्यांना तरुण आणि वरिष्ठ अशा दोन्ही पिढ्यांचा समावेश असलेल्या टीमचं नेतृत्व करायचं आहे.
 

Web Title : जेन Z को दफ्तर में सीनियर्स पर भरोसा नहीं, मानते हैं अक्षम।

Web Summary : एक सर्वेक्षण से पता चला है कि जेन Z अपने वरिष्ठ सहयोगियों की दक्षता पर संदेह करते हैं। उनका मानना है कि पुराने कर्मचारी नए कौशल और बदलावों का विरोध करते हैं। अध्ययन में पीढ़ीगत अंतर और समावेशी कार्यस्थल संस्कृति की आवश्यकता पर प्रकाश डाला गया है।

Web Title : Gen Z distrusts seniors at work, deems them inefficient.

Web Summary : Gen Z doubts senior colleagues' efficiency, a survey reveals. They perceive older workers as resistant to new skills and changes. The study highlights a generational gap and the need for inclusive workplace cultures where all employees are valued.