IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका

Nandre Burger fined LSG vs RR IPL 2026: नेमका काय घडला प्रकार? कुणाचं काय चुकलं? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 15:45 IST2026-04-23T15:44:23+5:302026-04-23T15:45:17+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ipl-2026-nandre-burger-fined-for-send-off-gesture-to-rishabh-pant-in-lsg-vs-rr | IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका

IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका

Nandre Burger fined LSG vs RR IPL 2026: राजस्थान रॉयल्सनेलखनौ सुपर जायंट्स संघाविरूद्ध ४० धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांचे आघाडीचे फलंदाज लवकरच तंबूत परतले. मात्र, मधल्या फळीत रवींद्र जडेजाने २९ चेंडूंमध्ये नाबाद ४३ धावा करून राजस्थानचा डाव सावरला. त्यामुळे राजस्थानने २० षटकांत ६ गडी गमावून १५९ धावा केल्या. १६० धावांचे लक्ष्य गाठताना लखनौ सुपर जायंट्स केवळ ११९ धावाच करू शकले. अवघ्या १८ षटकांतच त्यांचा संघ सर्वबाद झाला आणि त्यांनी सामना गमावला. या सामन्यात राजस्थानच्या संघातील वेगवान गोलंदाज नांद्रे बर्गर याच्यावर कारवाई करण्यात आली.

नांद्रे बर्गरचे काय चुकले?

नांद्रे बर्गरने या सामन्यात ४ षटकांत २७ धावा देऊन २ बळी घेतले. लखनौ सुपर जायंट्सच्या डावाच्या दुसऱ्या षटकात कर्णधार ऋषभ पंत खेळत होता. त्यावेळी बर्गरने टाकलेल्या चेंडूवर पंत बाद झाला. पंतची विकेट घेतल्याचा आनंद साजरा करताना बर्गरकडून एक चूक झाली. त्याने पंतची विकेट घेतल्यानंतर त्याने त्याला मैदानाबाहेर जा, असा इशारा केला. हा इशारा करणे क्रिकेटच्या नियमांच्या विरुद्ध आहे. यासाठीच नांद्रे बर्गर दोषी आढळला आणि त्याला दंड ठोठवण्यात आला.

नांद्रे बर्गरला कोणती शिक्षा मिळाली?

नांद्रे बर्गरला विनाकारण दंड ठोठावण्यात आला नाही; लखनौचा कर्णधार ऋषभ पंतसमोर त्याने केलेली कृती आयपीएलच्या आचारसंहितेच्या विरोधात मानली गेली. त्याला सामनाधिकाऱ्यासमोर हजर करण्यात आले. तिथे त्याने आपली चूक कबूल केली आणि त्याला दंड ठोठवण्यात आला. त्याला त्याच्या सामना शुल्काच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला आणि एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला. राजस्थान रॉयल्सचा हा डावखुरा गोलंदाज आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.५ अंतर्गत लेव्हल १ च्या गुन्ह्यासाठी दोषी आढळला. त्याने सामनाधिकाऱ्यासमोर आपली चूक कबूल केल्याने त्याच्यावर केवळ दंड लावण्यात आला.

Web Title : आईपीएल 2026: पंत से दुर्व्यवहार पर बर्गर पर जुर्माना; आरआर खिलाड़ी दंडित।

Web Summary : आरआर बनाम एलएसजी मैच के दौरान ऋषभ पंत को अनुचित विदाई देने पर नांद्रे बर्गर पर मैच फीस का 10% जुर्माना लगाया गया। राजस्थान रॉयल्स ने 40 रनों से मैच जीता। बर्गर ने आईपीएल की आचार संहिता का उल्लंघन किया, गलती स्वीकार की।

Web Title : IPL 2026: Burger fined for misconduct with Pant; RR player penalized.

Web Summary : Nandre Burger fined 10% of match fee for inappropriate send-off to Rishabh Pant during RR vs LSG match. Rajasthan Royals won the match by 40 runs. Burger violated IPL's code of conduct, admitting fault.