पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 14:38 IST2026-04-23T14:37:55+5:302026-04-23T14:38:26+5:30
West Bengal Election 2026:

पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील १५२ जागांसाठी आज मतदान होत आहे. दरम्यान, आज सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यापासून ठिकठिकाणाहून हिंसाचाराच्या बातम्या समोर येत आहेत. याचदरम्यान, मतदानापूर्वी सीपीएमच्या एजंटवर हल्ला करण्यात आल्याचा आरोप झाला असून, हल्लेखोरांनी त्यांची बोटे कापल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही बातमी पसरल्यानंतर गावात खळबळ उडाली. तसेच परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार डोमकल गावात सीपीएमच्या एका एजंटवर काही लोकांनी हल्ला केला. हा वाद एवढ्यावरच थांबला नाही र हल्लेखोरांनी सीपीएमच्या या नेत्याच्या हाताची बोटं कापली. एवढंच नाही तर मतदारांना धमकावण्यात आल्याचे प्रकारही घडले आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे सीपीएमचे कार्यकर्ते सुरक्षिततेबाबत चिंतीत आहेत. तसेच जेव्हा ही घटना घडली तेव्हा परिसरामध्ये पोलिसांचा काहीही ठावठिकाणा नव्हता, त्यामुळे परिसरात भीती आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालं. याबरोबरच सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते मतदारांना घाबरवण्याचे आणि धमकावण्याचे प्रयत्न कर आहे, असे आररोप केले जात आहेत. आता या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत तृणमूल काँग्रेसशी संबंधित असलेल्या आमीन मंडल याला ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला असून, सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याची मागणी केली जात आहे.