NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 11:45 IST2026-04-23T11:43:30+5:302026-04-23T11:45:02+5:30

America Iran War: नाटो देशांचे वर्गीकरण करणारी 'नॉटी अँड नाईस' यादी तयार केली असून, इराण युद्धात मदत करणाऱ्या देशांना अमेरिका बक्षीस देणार आहे.

america big move regarding nato country and makes naughty and nice list and who did not help in iran war will face serious consequences | NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार

NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार

America Iran War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची मुदत वाढविल्याची घोषणा केली असली तरी त्यावर आपला विश्वास नसल्याची भूमिका इराणने कायम ठेवली आहे. इराणने आक्रमक धोरण कायम ठेवत होर्मुझच्या सामुद्रधुनीत तीन जहाजांवर गोळीबार केला. त्यातील दोन जहाजे जप्त केली असून, त्यातील जहाज भारताकडे येणार होते. यातच इराण युद्धात मदत न करणाऱ्या देशांवर आता अमेरिकेची वक्रदृष्टी पडणार आहे. अमेरिकेने इराण युद्धात मदत करणारे देश आणि मदत न करणारे देश अशी एक यादी केली आहे. 

इराण युद्धात ‘नाटो’ संघटनेतील सहकारी देश आणि द. कोरिया, जपान, ऑस्ट्रेलिया या अन्य दोस्त राष्ट्रांनी मदत न केल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या देशांवर अत्यंत तिखट हल्लाबोल केला होता. ‘नाटो’ला ‘कागदी वाघ’ असेही संबोधत, ‘नाटो’ने एकूण कारभारावरून माझ्या मनावर ओरखडा उमटवला असून, तो मी कधीही विसरू शकणार नाही. जेव्हा मी त्यांच्याकडे मदतीसाठी गेलो तेव्हा त्यांनी स्पष्टपणे नकार दिला, अशी नाराजी बोलून ट्रम्प यांनी बोलून दाखवली होती. अमेरिकेने 'नॉटी एंड नाइस' अशी एक यादी तयारी केल्याची माहिती मिळाली आहे. 

NATO देशांचे वर्गीकरण करणारी 'नॉटी ऑर नाईस' यादी तयार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे नाटो मित्र राष्ट्रांमध्ये नव्याने गदारोळ निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. ट्रम्प प्रशासनाने इराणसोबत सुरू असलेल्या युद्धातील भूमिका आणि संरक्षण खर्चाच्या आधारावर नाटो देशांचे वर्गीकरण करणारी 'नॉटी ऑर नाईस' यादी तयार केली आहे. अमेरिकेच्या लष्करी कारवायांना पाठिंबा देणाऱ्या किंवा त्यापासून दूर राहणाऱ्या देशांना थेट पुरस्कृत करण्याची किंवा शिक्षा देण्याची ही एक योजना आहे. एका रिपोर्टनुसार, नाटोचे महासचिव मार्क रुटे यांच्या अमेरिका भेटीच्या अगदी आधी ही यादी तयार करण्यात आली होती.

संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांची ही संकल्पना

ही कल्पना संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांच्याकडून पुढे आली असल्याचे मानले जाते. ज्यांनी यापूर्वी सूचित केले आहे की, आदर्श मित्र राष्ट्रांना अमेरिकेकडून विशेष सवलती मिळतील, तर सामूहिक संरक्षण राखण्यात अयशस्वी ठरणाऱ्या देशांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. शिक्षा म्हणून अमेरिका या देशांमधून आपले सैन्य मागे घेऊ शकते किंवा त्यांना अमेरिकन संरक्षण तंत्रज्ञानाच्या विक्रीवर बंदी घालू शकते. पोलंड आणि रोमानियासारख्या देशांना यादीतील 'चांगल्या' देशांच्या श्रेणीत ठेवले जाऊ शकते.

या यादीबद्दल राजनैतिक वर्तुळात चिंता

या यादीबद्दल राजनैतिक वर्तुळात चिंता व्यक्त केली जात आहे. काही युरोपीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, अमेरिकेने शिक्षा म्हणून आपले सैन्य मागे घेतले, तर त्यामुळे त्या देशांपेक्षा अमेरिकेचेच अधिक सामरिक नुकसान होईल. इराण युद्धानंतर व्हाइट हाऊस आणि नाटो यांच्यातील तणाव सर्वोच्च पातळीवर पोहोचला असून, त्यामुळे या ऐतिहासिक लष्करी युतीच्या भविष्यावर सावट पसरले आहे.

दरम्यान, व्हाइट हाऊसने या यादीच्या अस्तित्वाची पुष्टी केली नसली तरी, पोलंड आपल्या जीडीपीचा एक मोठा भाग संरक्षणावर खर्च करतो, तर रोमानियाने इराण युद्धादरम्यान अमेरिकी सैन्याला आपले हवाई तळ वापरण्याची परवानगी दिली होती. दुसरीकडे, बहुतेक युरोपीय नाटो देशांनी आखाती संघर्षात सामील होण्यास नकार दिला आहे, ज्यामुळे ट्रम्प संतप्त झाले आहेत. ट्रम्प यांचा असा विश्वास आहे की, अमेरिकेने आता परदेशांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःवरच अवलंबून राहिले पाहिजे.

 

Web Title : NATO को लेकर अमेरिका की बड़ी चाल: ईरान युद्ध में मदद न करने पर परिणाम

Web Summary : ईरान युद्ध में मदद न करने वाले देशों की अमेरिका द्वारा सूची बनाने की खबर है। नाटो सहयोगियों और अन्य को समर्थन की कमी के लिए संभावित परिणाम भुगतने होंगे, जिसमें सैन्य कमज़ोरी या तकनीक बिक्री पर प्रतिबंध शामिल हैं, जिससे बेचैनी है।

Web Title : US's NATO Strategy: Iran War Consequences, List Prepared for Non-Helpers

Web Summary : America is reportedly creating a list of countries that did or didn't help in the Iran war. NATO allies and others face potential consequences for lack of support, including military drawbacks or tech sale bans, causing unease.