Ashok Kharat : झोप गेली, डोकंही दुखतंय... आलिशान जीवन जगणाऱ्या भोंदू अशोक खरातचं प्रकृतीविषयी रडगाणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 12:20 IST2026-04-23T12:20:34+5:302026-04-23T12:20:34+5:30

Ashok Kharat : आलिशान राहणीमान, स्वतःवर पैशांची उधळपट्टी असे आरामदायी जीवन जगणारा अशोक खरात आता एसआयटीच्या ताब्यात असताना रोजच वैद्यकीय तक्रारी करतोय.

I've lost sleep, my head hurts... Ashok Kharat, a fraud living a luxurious life, laments about his health | Ashok Kharat : झोप गेली, डोकंही दुखतंय... आलिशान जीवन जगणाऱ्या भोंदू अशोक खरातचं प्रकृतीविषयी रडगाणं

Ashok Kharat : झोप गेली, डोकंही दुखतंय... आलिशान जीवन जगणाऱ्या भोंदू अशोक खरातचं प्रकृतीविषयी रडगाणं

पीडित महिलांचे शोषण करणारा भोंदू अशोक खरात महागड्या कारशिवाय प्रवास करत नसे. आलिशान राहणीमान, स्वतःवर पैशांची उधळपट्टी असं आरामदायी जीवन जगणारा अशोक खरात आता एसआयटीच्या ताब्यात असताना रोजच वैद्यकीय तक्रारी करतोय. गेल्या पाच दिवसात दोन वेळेस खरातच्या छातीत कळा आल्याने त्याची तातडीने वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

खरातचं वजन मागच्या दहा दिवसात अजून दोन ते तीन किलोने कमी झालं असून, शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. जितेंद्र शेळके (५०) यांचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात मृत्यू झाल्यानंतर खरात अधिक तणावात असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दोन दिवसांपूर्वीच कार्डियाक अॅम्ब्युलन्समध्ये खरातची तपासणी करण्यात आली होती. बुधवारी सकाळी खरातची आरोग्य तपासणी करण्यात आली.

अशोक खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन; खरेदी-विक्रीत कोटींचा व्यवहार झाल्याचा संशय

भोंदू खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर, भक्तांची यादी ईडीच्या ताब्यात

आलिशान जीवन जगणारा खरात गेल्या एक महिन्यापासून पोलीस कोठडीत सरकारी जेवत आहे. रोज डोकेदुखीच्या गोळ्या खाऊनही खरातवरील ताण कमी झाला नाही. वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं दिली जात नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. सध्या वैद्यकीय पथकाकडून खरातचे नियमित निरीक्षण सुरू आहे.

"...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती

खरातची आज न्यायालयात हजेरी

भोंदू अशोक खरातला पाचव्या गुन्ह्यात गुरुवारी पुन्हा न्यायालयात हजर केलं जाईल. व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातूनच त्याला हजर केलं जाऊ शकतं. खरातला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. लैंगिक शोषण आणि फसवणूकप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी खरातची चौकशी एसआयटीने पाचव्या गुन्ह्यात पूर्ण केली असून त्याला आता न्यायालयीन कोठडी सुनावली जाऊ शकते.

 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक

एसआयटीने पाचव्या गुन्ह्यात खरातला चार दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. न्यायालयाने ही विनंती मान्य केली होती. पीडित महिलेवर अत्याचार व जादुटोणाची भीती दाखवणं हा पाचवा गुन्हा भोंदू अशोक खरातवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल आहे.
 

Web Title : शोषण के आरोपों के बीच धोखेबाज अशोक खरात ने बीमारी का बहाना बनाया

Web Summary : महिलाओं के शोषण के आरोपी, अशोक खरात, जो अपनी भव्य जीवनशैली के लिए जाने जाते हैं, अब हिरासत में स्वास्थ्य समस्याओं का दावा कर रहे हैं। एसआईटी जांच का सामना करते हुए, उन्होंने सीने में दर्द और तनाव का हवाला दिया, साथ ही वजन घटने की भी सूचना है। कानूनी कार्यवाही जारी रहने के साथ चिकित्सा जांच चल रही है।

Web Title : Fraudster Ashok Kharat Feigns Illness Amidst Exploitation Allegations

Web Summary : Accused of exploiting women, Ashok Kharat, known for his lavish lifestyle, now claims health issues in custody. Facing SIT investigation, he cites chest pains and stress, with weight loss reported. Medical checks are ongoing as legal proceedings continue.