Ashok Kharat : भोंदू खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर, भक्तांची यादी ईडीच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 11:50 IST2026-04-22T11:50:32+5:302026-04-22T11:50:32+5:30
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातची नाशिक व सिन्नरमधील प्रत्येकी दोन बँक खाती ईडीने तपासली असून, त्यातील काही संशयित व्यवहार चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे.

Ashok Kharat : भोंदू खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर, भक्तांची यादी ईडीच्या ताब्यात
भोंदू अशोक खरातचीनाशिक व सिन्नरमधील प्रत्येकी दोन बँक खाती ईडीने तपासली असून, त्यातील काही संशयित व्यवहार चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे. खरातने जे बोगस खाते उघडले होते त्यातून खरात व त्याच्या पत्नीच्या चार खात्यांवर पैसे ट्रान्सफर झाल्याचे तपासात उघड झाल्याने ईडीने खरात व त्याच्या पत्नीच्या बँक खात्यांचे मागील दहा वर्षापासूनचे विश्लेषण सुरू केले आहे.
लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील तपासातून अनेक बाबी उघड झाल्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून खरातचे बेनामी आर्थिक व्यवहार बाहेर काढण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. काळा पैसा पांढरा करण्यासाठी तसेच दुसऱ्याच्या नावाने व्यवहार करून स्वतची ओळख लपविण्यासाठी खरातने बोगस खाते उघडले असल्याचे सांगण्यात येते.
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
सिन्नरमधील जगदंबा माता ग्रामीण पतसंस्थेत जी-३२ बोगस खाती खरातने उघडली होती त्या खात्याचे कनेक्शन खरातच्या चार बँक खात्यांशी तपासले जाणार आहे. याशिवाय ईडीने आता खरातच्या मुलाच्या बँक खात्याचीही चौकशी केली असून, त्यात संशयास्पद व्यवहार आढळून आले नसल्याचे समजते. मात्र चौकशीत बोगस खात्यांशी संबंधित काही महत्त्वाच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे.
"...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
भक्तांची यादी ईडीच्या ताब्यात
खरातच्या संशयित चारही खात्यातून मागील तीन वर्षात कोट्यवधीचे व्यवहार झाले असून, काही पैसे ईशान्येश्वर मंदिराला भक्तांनी दान केले होते, अशी माहिती खरातने एसआयटीला तपासात दिल्याचे समजते. त्यानंतर खरातच्या बँक खात्याशी कनेक्ट असलेल्या अशा अनेक भक्तांची यादी ईडीने ताब्यात घेत त्यांचे जबाब घेणे सुरू केल्याची माहिती तपास पथकातील सूत्रांनी दिली.