IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 12:15 IST2026-04-23T12:13:39+5:302026-04-23T12:15:33+5:30

Indian Railways: भारतीय रेल्वेच्या हेल्पलाइनवर प्रवाशांकडून पॅन्ट्री कार आणि मिनी-पॅन्ट्रीमधील कीटक व उंदरांच्या वाढत्या त्रासाबाबत सर्वाधिक तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.

IRCTC: Increasing pest and rat infestation in railway pantries; Administration takes note after passenger complaints | IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल

IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: भारतीय रेल्वेच्या हेल्पलाइनवर प्रवाशांकडून पॅन्ट्री कार आणि मिनी-पॅन्ट्रीमधील कीटक व उंदरांच्या वाढत्या त्रासाबाबत सर्वाधिक तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी १५ दिवसांची विशेष पेस्ट कंट्रोल मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासादरम्यान अन्नपदार्थांमध्ये झुरळे, मुंग्या आढळणे, उंदरांची वर्दळ, पॅन्ट्रीतील अस्वच्छता यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. 

‘पेस्ट कंट्रोल’साठी विशेष मोहीम...

काही प्रवाशांनी सोशल मीडियावर अशा प्रकारांचे व्हिडिओ आणि छायाचित्रे शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार, १५ एप्रिलपासून विशेष पेस्ट कंट्रोल मोहीम सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत सर्व पॅन्ट्री कार आणि मिनी-पॅन्ट्री असलेल्या डब्यांमध्ये धुरीकरण (फ्युमिगेशन) तसेच कीटकनाशक उपाययोजना करण्यात येत आहेत. पॅन्ट्री कार असलेल्या सर्व गाड्यांमध्ये ही मोहीम राबवली जात आहे.

‘अन्नपदार्थांचे बॉक्स, कंटेनर बाहेर काढा’ 

या मोहिमेदरम्यान यांत्रिक अभियांत्रिकी विभागासोबत समन्वय साधून प्रत्येक पॅन्ट्री कारमध्ये सखोल स्वच्छता आणि कीटक-उंदीर नियंत्रणाची कामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.धुरीकरण करताना पॅन्ट्रीतील सर्व उपकरणे रिकामी करणे तसेच अन्नपदार्थांचे बॉक्स, कंटेनर आदी बाहेर काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. पॅन्ट्री कारमधील अन्न साठवणूक, स्वयंपाक प्रक्रिया आणि कचरा व्यवस्थापनावरही विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश आहेत.

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनला (आयआरसीटीसी) बेस किचनमध्येही अशाचप्रकारे कीटक व उंदीर नियंत्रण उपाययोजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या स्वच्छता मोहिमेचा अहवाल सात दिवसांत रेल्वे बोर्डाकडे सादर करणे बंधनकारक आहे.

Web Title : आईआरसीटीसी: रेलवे पेंट्री में कीटों की शिकायतों पर 15 दिवसीय अभियान।

Web Summary : पेंट्री कारों में कीटों की यात्री शिकायतों के बाद, रेल मंत्रालय ने 15 दिवसीय कीट नियंत्रण अभियान शुरू किया है। सभी पेंट्री कारों और मिनी-पेंट्री में धूमन और कीटनाशक उपचार लागू किए जा रहे हैं। आईआरसीटीसी को बेस किचन में भी कीट नियंत्रण उपाय करने के निर्देश दिए गए हैं, जिसकी रिपोर्ट सात दिनों में रेलवे बोर्ड को देनी है।

Web Title : IRCTC addresses pest complaints in railway pantries with a 15-day drive.

Web Summary : Following passenger complaints about pests in pantry cars, the Railway Ministry has launched a 15-day pest control drive. Fumigation and insecticide treatments are being implemented in all pantry cars and mini-pantries. IRCTC has also been directed to conduct pest control measures in base kitchens, with a report due to the Railway Board in seven days.