जामखेड येथील खर्डा रस्त्यालगत असलेल्या साई ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रिक दुकानात मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. यात ३५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे मी पाणी प्रश्न पाठपुरावा केला आहे. त्यामुळे ६ जूनला कुकडीचे आवर्तन टेल टू हेड सुटणार आहे. तरीही पाणी प्रश्नी उपोषणाला बसायचे हा ज्यांचा, त्यांचा प्रश्न आहे. त्यांना मी कसे सांगणार? असा सवाल आमदार रोहित पवार यांनी ...
जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथील स्वस्त धान्य दुकानातील २४ टन तांदूळाचा ट्रक काळ्या बाजारात गुजरात राज्यात विक्री करण्यासाठी जात असताना चापडगाव शिवारात जामखेड पोलिसांनी गुरुवारी (दि.२८ मे) पकडला. ट्रक चालकासह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ...
दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश राळेभात यांच्या हत्याकांडातील अंतरिम जामिनावर फरार असलेला आरोपी काकासाहेब गर्जे यास पोलिसांनी ४० किलोमीटर पाठलाग करून जातेगाव येथे पकडले. जामखेड शहरात २८ एप्रिल २०१८ रोजी हे दुह ...
दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात अकोले तालुक्यातील एका शिक्षकासह त्याच्या भाऊ जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी २ वाजता जामखेड तालुक्यातील रत्नापूर फाटा येथे घडली. ...
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरले आहे. याप्रश्नी भाजपने राज्यभर पुकारलेल्या महाराष्ट्रात बचाव आंदोलनात माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांनी कुटुंबीयांसह चोंडी येथील घरासमोर शुक्रवारी (दि.२२ मे) सहभा ...
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि आरोग्य यंत्रणा करत असलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे चित्र दिसत आहे. जामखेड येथील ४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. ...
जामखेड शहर व तालुुक्यात रविवारी (दि.१० मे) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वादळी वा-यासह विजेच्या कडकडाटासह जोरदार गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले आहेत. फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. तर नाहुली येथे वादळी पावसात वीज पडून श ...