राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
राज्यातील २२ हजार ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्या आणि पाचव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनतर्फे क्रांतिदिनापासून शासनाविरोधात असहकार आंदोलन पुकारले आहे. ...
वडझिरे : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये सिन्नर तालुक्यातून वडझिरे गावाने तालुक्यातून प्रथम क्र मांकाचे दहा लाख रु पयांचे पारितोषिक पटकावले आहे. तर पाटोळे व हिवरे ही गावे अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्र मांकांचे मानकरी ठरले आहेत. ...
गोंदिया पंचायत समितीची वार्षिक आमसभा शुक्रवारी पं.स.च्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.आमसभेत दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना पंचायत समितीऐवजी ग्रामपंचायत मधून दाखले देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. ...
ग्रामसेवक हा जनता व शासन यामध्ये दुवा म्हणून काम करतो. परंतु शासन स्तरावर ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी संवर्गाची पाचव्या वेतन आयोगापासून वेतन तृटी दूर करण्यात आली नाही.ग्रामसेवकांच्या अनेक मागण्यां शासन स्तरावर प्रलबिंत आहे. ...
सिन्नर : केंद्रीय संसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत खासदार हेमंत गोडसे यांनी सिन्नर तालुक्यातील कीर्तांगळी गावाची निवड केली आहे. निवडणूक झाल्यानंतर पहिल्याच टप्प्यात खासदार गोडसे यांनी आदर्श ग्राम योजनेंतर्गत गावाची निवड केल्याने सिन्नर तालुक्यात विशेषत: ...