अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 12:29 IST2026-05-07T12:29:08+5:302026-05-07T12:29:37+5:30

Glock 43X Pistol, Chandranath Rath Murder: सुवेंदु अधिकारींच्या पीएच्या हत्येत Glock 43X चा वापर. अमेरिकन सिक्रेट सर्विससारख्या सुरक्षा यंत्रणांकडील ही गन पश्चिम बंगालमध्ये कशी आली...

How did the 'Glock 43X' pistol, used for the security of the US President, used in Bengal Chandranath Rath Murder? Know the features of this high-tech pistol | अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये

पश्चिम बंगालमधील भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांच्या हत्येने केवळ राजकीय खळबळच उडवून दिली नाही, तर सुरक्षा यंत्रणांसमोरही मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. या हत्येत वापरण्यात आलेली 'ग्लॉक ४३X' (Glock 43X) ही ऑस्ट्रिया बनावटीची विदेशी पिस्तूल आता तपासाचा केंद्रबिंदू ठरली आहे. विशेष म्हणजे, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यावेळी त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी याच पिस्तूलचा वापर केला होता.

ग्लॉक ४३X ची 'खास' वैशिष्ट्ये
ही पिस्तूल जगातील अनेक देशांच्या स्पेशल फोर्स आणि गुप्तचर संस्था वापरतात. तिची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

डिझाइन: ही पिस्तूल अत्यंत स्लिम आणि हलकी आहे, ज्यामुळे ती कपड्यांखाली लपवून नेणे सोपे असते.

क्षमता: पूर्वी १० राउंडची क्षमता असणाऱ्या या मॉडेलमध्ये आता १५ राउंडची मेटल मॅगझीन वापरली जाते.

अ‍ॅडव्हान्स ऑप्टिक्स: या पिस्तूलवर Holosun EPS Carry रेड डॉट साईट लावलेली असते, ज्यामुळे अत्यंत अचूक निशाणा साधता येतो.

पॉलीमर बॉडी: ९ एमएमची ही कॉम्पैक्ट पिस्तूल आपल्या वेगाने गोळीबार करण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे.

भारतात बंदी असताना गुन्हेगारांकडे कशी पोहोचली?
भारतात सामान्य नागरिकांसाठी किंवा गुन्हेगारांसाठी ग्लॉक ४३X ची विक्री पूर्णपणे प्रतिबंधित आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत ४० हजार रुपयांच्या आसपास असली, तरी भारतातील बेकायदेशीर बाजारात ती लाखोंमध्येै विकली जाते. ड्रोन तस्करी, सीमापार नेटवर्क किंवा आंतरराज्यीय टोळ्यांमार्फत ही शस्त्रे भारतात पोहोचत असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

तपास यंत्रणांसमोर आव्हान
एका राजकीय नेत्याच्या पीएच्या हत्येसाठी इतक्या हायटेक शस्त्राचा वापर होणे, हे यामागे एखादा प्रोफेशनल किलर किंवा मोठे संघटित नेटवर्क असल्याचा संकेत देते. या पिस्तूलचा सप्लाय चेन शोधणे आता पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.

Web Title : अमेरिकी राष्ट्रपति की सुरक्षा में इस्तेमाल ग्लॉक 43X बंगाल में मिली।

Web Summary : बंगाल में एक राजनीतिक हत्या में इस्तेमाल हुई 'ग्लॉक 43X' पिस्तौल ने सुरक्षा चिंताएं बढ़ा दी हैं। अमेरिकी राष्ट्रपति सुरक्षा द्वारा पसंद की जाने वाली यह पिस्तौल भारत में प्रतिबंधित है, जिसके कारण इसकी अवैध खरीद और आपूर्ति श्रृंखला की जांच हो रही है।

Web Title : Glock 43X pistol used for US president's security found in Bengal.

Web Summary : A 'Glock 43X' pistol, used in a political murder in Bengal, raises security concerns. The pistol, favored by US presidential security, is banned in India, prompting investigation into its illegal acquisition and supply chain.