Top Marathi News Live: 'मी दुसऱ्या कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलवणार नाही", राज्यपालांचे विजय यांना आश्वासन

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 14:13 IST2026-05-07T09:26:18+5:302026-05-07T14:13:30+5:30

महाराष्ट्रासह देश - विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

Maharashtra Marathi News Live Updates 7 March 2026: West Bengal violence, TMC vs BJP, Mamata Banerjee, Thalapathi Vijay, Tamil Nadu Politics, PM Narendra Modi, CM Devendra Fadnavis, IPL 2026, Nasrapur Crime, US Iran clash over Hormuz, Donald Trump | Top Marathi News Live: 'मी दुसऱ्या कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलवणार नाही", राज्यपालांचे विजय यांना आश्वासन

Top Marathi News Live: 'मी दुसऱ्या कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलवणार नाही", राज्यपालांचे विजय यांना आश्वासन

महाराष्ट्रासह देश - विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

LIVE

Get Latest Updates

07 May, 26 : 04:15 PM

कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, बुचकळ्यात टाकणारा ब्लड रिपोर्ट

मुंबईतील पायधुनी भागात २६ एप्रिल रोजी एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. आतापर्यंतच्या तपासात पोलिसांना कोणत्याही प्रकारचे विषारी घटक आढळलेले नाहीत. पोलीस आता फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) च्या रिपोर्टची वाट पाहत आहेत. मुंबईतील एका सरकारी रुग्णालयाच्या ब्लड रिपोर्टनुसार, चौघांच्या रक्तात कोणतंही 'बॅक्टेरियल इन्फेक्शन' आढळलेलं नाही. वाचा सविस्तर

07 May, 26 : 02:13 PM

'मी दुसऱ्या कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलवणार नाही", राज्यपालांचे विजय यांना आश्वासन

विजय यांनी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची भेट घेतली. लोकभवनामध्ये झालेल्या या भेटीत राज्यपालांनी विजय यांना ११८ आमदारांचा पाठिंबा असल्याचे लेखी पत्र द्या असे सांगितले. 

टीव्हीकेचे प्रमुखचे विजय यांनी बहुमत असल्याचा सह्याचे पत्र घेऊन येतो, असे राज्यपालांना सांगितले. या भेटीत राज्यपालांनी विजय यांना आश्वस्त केले की, ते सत्ता स्थापनेसाठी इतर कोणत्याही पक्षाला बोलावणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

07 May, 26 : 02:07 PM

तामिळनाडूत AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट हॉटेल मुक्कामी

तामिळनाडूत निकालानंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यात विजय यांच्या टीव्हीके पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी सरकार बनवण्यासाठी आवश्यक संख्याबळ त्यांच्याकडे नाही. त्यामुळे सत्तास्थापन करण्यासाठी त्यांना इतरांची गरज भासणार आहे. त्यात विजय यांना पाठिंबा देण्याची AIADMK पक्षातील काही आमदारांनी मागणी करत वेगळी भूमिका घेतली आहे. यातील २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला हॉटेलमध्ये मुक्कामाला गेला आहे. 

सविस्तर वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

07 May, 26 : 02:07 PM

पुणे नसरापूर घटनेतील आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ

पुणे नसरापूर घटनेतील आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ, आरोपीला १२ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी भीमराव कांबळे याची जेलमध्ये रवानगी 

07 May, 26 : 01:14 PM

नितीश कुमारांचा मुलगा बनला मंत्री, निशांत कुमार यांनी घेतली शपथ

मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार मंत्रिमंडळ विस्तार आज झाला. पाटण्यात झालेल्या या शपथविधी सोहळ्यात माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मुलाने मंत्रि‍पदाची शपथ घेतली. 

राज्यपास सय्यद अता हसनैन यांनी विजय सिन्हा, दिलीप जायस्वाल, श्रवण कुमार, निशांत कुमार आणि लेसी सिंह यांना मंत्रि‍पदाची शपथ दिली. 

रामकृपाल यादव, नितीश मिश्रा, दामोदर रावत, संजय सिंह टायगर, अशोक चौधरी, मदन साहनी, भगवान सिंह कुशवाह, अरुण शंकर प्रसाद, संतोष कुमार सुमन, रमा निषाद यांचाही मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. 

07 May, 26 : 01:02 PM

मंत्री बावनकुळे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी जात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमागचे कारण काय हे अद्याप स्पष्ट नाही. 

07 May, 26 : 12:59 PM

ईडीची धाड, ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा

पंजाबमधील मोहाली येथे नितीन गोहल याच्या घरावर ईडीने धाड टाकली. यावेळी एक धक्कादायक प्रकार समोर आला. ईडीचे अधिकारी मोहालीतील खरार भागातील गोहलच्या फ्लॅटवर पोहोचले असता, त्याने घाबरून आपल्या नवव्या मजल्यावरील फ्लॅटमधून नोटांनी भरलेल्या बॅगा थेट खाली फेकून दिल्या. ईडीच्या पथकाने जेव्हा या बॅगांची तपासणी केली, तेव्हा त्या नोटांनी गच्च भरलेल्या होत्या. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. वाचा सविस्तर

07 May, 26 : 12:57 PM

नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

07 May, 26 : 12:56 PM

"सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."

भाजपा नेते आणि खासदार मनोज तिवारी यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार निशाणा साधला. "ममता बॅनर्जी सही करतील किंवा नाही, जनतेने त्यांना आधीच सत्तेतून हटवलं आहे. जर राजीनामा दिल्यानंतरच मुख्यमंत्री पदावरून हटत असतील, तर अरविंद केजरीवाल सर्वात आधी हटले नसते का? यावरून ममता बॅनर्जी आपण संविधान आणि लोकशाहीला मानत नाही, हेच सिद्ध करत आहेत. राजीनाम्याची तरतूद यासाठी असते की, निवडणुकीत पराभव झाल्यानंतर कोणत्याही मुख्यमंत्र्याने लोकशाही आणि संविधानाचा आदर राखून सन्मानाने पदावरून बाजूला व्हावं" असं म्हटलं आहे. वाचा सविस्तर

07 May, 26 : 12:25 PM

बिहारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार, निशांत कुमारसह ३२ जणांचा शपथविधी

बिहारच्या गांधी मैदानावर नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार सोहळा पार पडत आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर दिग्गज नेते उपस्थित आहेत. या सोहळ्यात माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे चिरंजीव निशांत यांच्यासह ३२ जण मंत्रि‍पदाची शपथ घेत आहेत. 

07 May, 26 : 12:14 PM

विजय यांचे सीपीएमला पत्र, सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याचे आवाहन

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत सर्वात पक्ष ठरलेल्या टीव्हीकेकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. राज्यपालांनी बहुमतांच्या आकड्यासह सरकार स्थापनेचा दावा करण्यास सांगितले असून, विजय यांनी आता सीपीएम पक्षालाही पत्र पाठवले आहे. 

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) पक्षाचे नेते पी. शनमुगम म्हणाले की, विजय यांनी पाठिंबा देण्यासंदर्भात पत्र पाठवले आहे. पक्षाची तामिळनाडू समितीची उद्या बैठक होणार आहे. त्या बैठकीत सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याबद्दल अंतिम निर्णय घेतला जाईल. 

07 May, 26 : 12:14 PM

तामिळनाडूत AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट हॉटेल मुक्कामी

तामिळनाडूत निकालानंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यात विजय यांच्या टीव्हीके पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी सरकार बनवण्यासाठी आवश्यक संख्याबळ त्यांच्याकडे नाही. त्यामुळे सत्तास्थापन करण्यासाठी त्यांना इतरांची गरज भासणार आहे. त्यात विजय यांना पाठिंबा देण्याची AIADMK पक्षातील काही आमदारांनी मागणी करत वेगळी भूमिका घेतली आहे. यातील २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला हॉटेलमध्ये मुक्कामाला गेला आहे. 

सविस्तर वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

07 May, 26 : 11:51 AM

पाटणा - बिहार सरकारच्या मंत्रिमंडळाचा थोड्याच वेळात विस्तार, अमित शाह यांची विशेष उपस्थित

बिहार सरकारच्या मंत्रिमंडळाचा थोड्याच वेळात विस्तार होणार असून, अमित शाह शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहे.

07 May, 26 : 11:27 AM

राज्यसभेत सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा; येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाणार?

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आता खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय असून, घेतला त्यांच्या जागी कोण, याची पक्षात चर्चा असताना नाशिकमध्ये मात्र अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची चर्चा सुरू आहे. असे झाल्यास येवला मतदारसंघाची सुत्रे सांभाळण्याची माजी खासदार समीर भुजबळ यांची तयारी असून, त्यामुळेच गेल्या वर्षभरापासून ते या मतदारसंघात तळ ठोकून असल्याचे दिसते आहे.

सविस्तर वाचा 

07 May, 26 : 11:21 AM

तामिळनाडूत AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट हॉटेल मुक्कामी

तामिळनाडूत निकालानंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यात विजय यांच्या टीव्हीके पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी सरकार बनवण्यासाठी आवश्यक संख्याबळ त्यांच्याकडे नाही. त्यामुळे सत्तास्थापन करण्यासाठी त्यांना इतरांची गरज भासणार आहे. त्यात विजय यांना पाठिंबा देण्याची AIADMK पक्षातील काही आमदारांनी मागणी करत वेगळी भूमिका घेतली आहे. यातील २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला हॉटेलमध्ये मुक्कामाला गेला आहे. 

सविस्तर वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

07 May, 26 : 10:16 AM

ममता बॅनर्जींनी घेतली बैठक, दहा आमदार गैरहजर

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेतली. या बैठकीला दहा आमदार गैरहजर होते. तृणमूल काँग्रेसचे ८० आमदार निवडून आले आहेत. मात्र बैठकीला ७० आमदाराच उपस्थित होते. ममता बॅनर्जी यांच्या कालीघाट निवासस्थानी ही बैठक झाली. 

07 May, 26 : 10:14 AM

वंदे मातरम गीताला राष्टगीताचा दर्जा देणार; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

स्वातंत्र्य लढ्यातील प्रेरणा गीत असलेल्या वंदे मातरम या गीताला राष्ट्रगीताचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

केंद्रीय मंत्रिमंडळाने कायद्यात दुरुस्ती करण्यास मंजुरी दिली आहे. घटनादुरुस्तीनंतर घटनेच्या अनुच्छेद ३ अंतर्गत वंदे मातरम गीताला राष्ट्रगीताप्रमाणेच संरक्षण प्राप्त होईल. 

07 May, 26 : 09:49 AM

तामिळनाडूत AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट हॉटेल मुक्कामी

तामिळनाडूत निकालानंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यात विजय यांच्या टीव्हीके पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी सरकार बनवण्यासाठी आवश्यक संख्याबळ त्यांच्याकडे नाही. त्यामुळे सत्तास्थापन करण्यासाठी त्यांना इतरांची गरज भासणार आहे. त्यात विजय यांना पाठिंबा देण्याची AIADMK पक्षातील काही आमदारांनी मागणी करत वेगळी भूमिका घेतली आहे. यातील २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला हॉटेलमध्ये मुक्कामाला गेला आहे. 

सविस्तर वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Web Title: Maharashtra Marathi News Live Updates 7 March 2026: West Bengal violence, TMC vs BJP, Mamata Banerjee, Thalapathi Vijay, Tamil Nadu Politics, PM Narendra Modi, CM Devendra Fadnavis, IPL 2026, Nasrapur Crime, US Iran clash over Hormuz, Donald Trump