अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 10:54 IST2026-05-07T10:52:41+5:302026-05-07T10:54:51+5:30

Tamil Nadu Assembly Election 2026: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेते विजय यांचा टीव्हीके पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असला तरी राज्यात कुठल्याही पक्षाला स्पष्ट  बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे तामिळनाडूमध्ये सत्तास्थापनेचा पेच निर्माण  झाला  आहे. या पार्श्वभूमीवर द्रमुकचे प्रमुख आणि तामिळनाडूचे मावळते मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी आपली भूमिका स्पष्ट  केली आहे.

Tamil Nadu Assembly Election 2026: Will Anna go with DMK, sit in opposition or...? Stalin makes a big announcement | अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 

अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेते विजय यांचा टीव्हीके पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असला तरी राज्यात कुठल्याही पक्षाला स्पष्ट  बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे तामिळनाडूमध्ये सत्तास्थापनेचा पेच निर्माण  झाला  आहे.  एकीकडे विजय हे राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी गेले असता पुरेसं संख्याबळ नसल्याने त्यांना राज्यपालांनी ११८ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र आणण्यास सांगितले. तर दुसरीकडे तामिळनाडूच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले द्रमुक आणि अण्णा द्रमुक हे सत्ता स्थापन करण्यासाठी एकत्र येतील,अशी चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर द्रमुकचे प्रमुख आणि तामिळनाडूचे मावळते मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी आपली भूमिका स्पष्ट  केली आहे.

एकीकडे द्रमुक आणि अण्णा द्रमुक हे एकमेकांसोबत येण्याची चर्चा सुरू असतानाच स्टॅलिन यांनी सांगितले की, आम्ही राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेला टीव्हीके सरकार स्थापन करतो का याची वाट पाहू. तसेच सहा महिन्यांपर्यंत राज्यातील राजकारणात कुठलाही हस्तक्षेप करणार नाही. केवळ परिस्थितीवर लक्ष ठेवू,  असे स्टॅलिन म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, राज्यात कुठलाही घटनात्मक पेच निर्माण व्हावा किंवा मध्यावधी निवडणुका व्हाव्यात अशी द्रमुकची इच्छा नाही. आता नव्या सरकारने आमच्या सरकारने सुरू केलेल्या योजना कायम ठेवाव्यात, तसेच टीव्हीकेने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, असेही स्टॅलिन यांनी सांगितले. 

Web Title : स्टालिन: डीएमके इंतजार करेगा, टीवीके सरकार गठन देखेगा, हस्तक्षेप नहीं।

Web Summary : तमिलनाडु में स्पष्ट बहुमत न होने पर, स्टालिन ने कहा कि डीएमके इंतजार करेगा और देखेगा कि टीवीके सरकार बनाती है या नहीं, छह महीने तक हस्तक्षेप से परहेज करेगा, उम्मीद है कि नई सरकार मौजूदा योजनाओं को जारी रखेगी।

Web Title : Stalin: DMK waits, watches TVK government formation, no interference.

Web Summary : With no clear majority in Tamil Nadu, Stalin says DMK will wait and observe if TVK forms the government, refraining from interference for six months, hoping the new government continues existing schemes.