Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 11:19 IST2026-05-07T11:16:21+5:302026-05-07T11:19:11+5:30

Manoj Tiwari And Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये भाजपाला मिळालेल्या मोठ्या विजयानंतरही तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे.

Mamata Banerjee denying resignation as cm of West Bengal after losing election Manoj Tiwari slams | Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र

Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र

पश्चिम बंगालमध्येभाजपाला मिळालेल्या मोठ्या विजयानंतरही तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे.  विधानसभा निवडणुकीत पराभव होऊनही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार देणाऱ्या ममता बॅनर्जी या कदाचित पहिल्याच मुख्यमंत्री ठरल्या आहेत.

निवडणुकीतील पराभवानंतर नवनिर्वाचित आमदारांसोबत घेतलेल्या पहिल्याच बैठकीत ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं की, त्या आपल्या पदाचा राजीनामा देणार नाहीत. या प्रकरणावरून आता भाजपाने ममता बॅनर्जींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'एनडीटीवी'शी बोलताना भाजपा नेते आणि खासदार मनोज तिवारी यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार निशाणा साधला. 

२०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई

"ममता बॅनर्जी सही करतील किंवा नाही, जनतेने त्यांना आधीच सत्तेतून हटवलं आहे. जर राजीनामा दिल्यानंतरच मुख्यमंत्री पदावरून हटत असतील, तर अरविंद केजरीवाल सर्वात आधी हटले नसते का? यावरून ममता बॅनर्जी आपण संविधान आणि लोकशाहीला मानत नाही, हेच सिद्ध करत आहेत. राजीनाम्याची तरतूद यासाठी असते की, निवडणुकीत पराभव झाल्यानंतर कोणत्याही मुख्यमंत्र्याने लोकशाही आणि संविधानाचा आदर राखून सन्मानाने पदावरून बाजूला व्हावं" असं म्हटलं आहे. 

भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू

Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला

ममता बॅनर्जींचं हे पाऊल असंवैधानिक असल्याचं सांगत मनोज तिवारी यांनी इशारा दिला की, "आता ममता बॅनर्जींनी ठरवायचं आहे की त्यांना सन्मानाने बाहेर पडायचं आहे की अपमानित होऊन. त्यांनी राजीनामा दिला तर असं मानले जाईल की त्यांनी रडत-रडत का होईना पायउतार होणं स्वीकारलं, पण जर त्यांनी राजीनामा दिला नाही, तर त्यांना अपमानास्पद रितीने बाहेर जावं लागेल."

Web Title : ममता बनर्जी का इस्तीफ़ा देने से इनकार; मनोज तिवारी ने की आलोचना।

Web Summary : पश्चिम बंगाल में भाजपा की जीत के बावजूद, ममता बनर्जी ने मुख्यमंत्री पद से इस्तीफा देने से इनकार कर दिया। मनोज तिवारी ने उनकी आलोचना करते हुए कहा कि वह लोकतंत्र का अनादर कर रही हैं और उन्हें सम्मानपूर्वक पद छोड़ देना चाहिए अन्यथा अपमान का सामना करना पड़ेगा।

Web Title : Mamata Banerjee refuses to resign; Manoj Tiwari criticizes her decision.

Web Summary : Despite BJP's victory in West Bengal, Mamata Banerjee refuses to resign as Chief Minister. Manoj Tiwari criticized her, stating she disrespects democracy and should step down gracefully or face humiliation.