Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 11:35 IST2026-05-07T11:31:21+5:302026-05-07T11:35:32+5:30

Numerology: अंकशास्त्रानुसार (Numerology) प्रत्येक अंकाचा संबंध एका ठराविक ग्रहाशी असतो आणि प्रत्येक ग्रहाचा स्वतःचा एक प्रभाव आणि रंग असतो. जेव्हा आपण महत्त्वाच्या कामासाठी, करारासाठी किंवा मुलाखतीसाठी बाहेर पडतो, तेव्हा आपल्या कपड्यांचा रंग आपल्या उर्जेवर परिणाम करतो. काही रंग आपल्या प्रगतीत अडथळे आणू शकतात किंवा नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतात. म्हणून महत्त्वाच्या कामाला जाताना कोणत्या मुलांकाने कोणते रंग टाळायला (Avoid) हवेत ते जाणून घ्या.

स्वामी: सूर्य, टाळायचा रंग: काळा आणि गडद निळा : मुलांक १ चा स्वामी सूर्य आहे, जो प्रकाश आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. काळा रंग अंधाराचे आणि शनीचे प्रतीक मानला जातो. सूर्य आणि शनी यांच्यातील वैचारिक विरोधामुळे, महत्त्वाच्या कामाला जाताना काळ्या किंवा गडद निळ्या रंगाचे कपडे घातल्यास आत्मविश्वासात कमतरता जाणवू शकते आणि कामात विनाकारण अडथळे येऊ शकतात.

स्वामी: चंद्र | टाळायचा रंग: काळा आणि लाल : चंद्र हा मनाचा आणि शांततेचा कारक आहे. काळा रंग नैराश्य वाढवू शकतो, तर लाल रंग हा अग्नीचे प्रतीक असून तो चंद्राच्या शीतल स्वभावाशी जुळत नाही. जर तुम्ही महत्त्वाच्या निर्णयासाठी जात असाल, तर लाल रंगामुळे तुमच्या स्वभावात चिडचिड किंवा अस्वस्थता निर्माण होऊ शकते, ज्यामुळे कामावरचा लक्ष विचलित होईल.

स्वामी: गुरु | टाळायचा रंग: गडद हिरवा आणि काळा : गुरु हा ज्ञानाचा आणि विस्ताराचा ग्रह आहे. काळा रंग प्रगतीला खिळ घालतो, तर गडद हिरवा रंग गुरूच्या पिवळ्या (शुभाशिरवाद) ऊर्जेला दबवून टाकतो. महत्त्वाच्या आर्थिक व्यवहारांसाठी जाताना हे रंग टाळल्यास तुमची निर्णयक्षमता अधिक प्रबळ राहते.

स्वामी: राहू | टाळायचा रंग: काळा आणि निळा : राहू हा छाया ग्रह असून तो आधीच गूढता आणि गोंधळ निर्माण करतो. काळा आणि निळा रंग राहूची नकारात्मक बाजू सक्रिय करू शकतात, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी विनाकारण वादविवाद किंवा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते. या मुलांकाच्या व्यक्तींनी फिके किंवा नैसर्गिक रंग निवडणे अधिक श्रेयस्कर ठरते.

स्वामी: बुध | टाळायचा रंग: गडद लाल : बुध हा बुद्धी आणि संवादाचा ग्रह असून त्याला हिरवा रंग प्रिय आहे. लाल रंग हा मंगळाचा असून तो बुध ग्रहाच्या सौम्य आणि चपळ स्वभावाशी संघर्ष करतो. महत्त्वाच्या मीटिंगमध्ये किंवा सादरीकरणात गडद लाल रंग घातल्यास बोलण्यात अडथळे येणे किंवा समोरच्या व्यक्तीवर चुकीचा प्रभाव पडणे असे घडू शकते.

स्वामी: शुक्र | टाळायचा रंग: पिवळा आणि केशरी : शुक्र हा सौंदर्य आणि विलासाचा ग्रह आहे. पिवळा रंग हा गुरूचा असून शुक्र आणि गुरु यांच्यातील ऊर्जेमध्ये परस्पर विरोध असतो. महत्त्वाच्या रोमँटिक भेटीसाठी किंवा कलात्मक कामासाठी जाताना पिवळा किंवा केशरी रंग टाळल्यास तुमची मोहकता आणि प्रभाव अधिक चांगल्या प्रकारे टिकून राहतो.

स्वामी: केतू | टाळायचा रंग: गडद लाल आणि काळा : केतू हा आध्यात्मिक ग्रह आहे. गडद लाल रंगामुळे ७ मुलांकाच्या व्यक्तींमध्ये मानसिक गोंधळ किंवा विनाकारण भीती निर्माण होऊ शकते. काळा रंग तुमच्यातील सर्जनशीलतेला (Creativity) दाबून टाकतो. त्यामुळे महत्त्वाच्या मुलाखतीला जाताना या छटा टाळणे हिताचे ठरते.

स्वामी: शनी | टाळायचा रंग: लाल आणि पांढरा : शनी हा शिस्त आणि कष्टाचा ग्रह आहे. लाल रंग (मंगळ) शनीच्या धिम्या पण स्थिर गतीशी जुळत नाही, ज्यामुळे अपघाताची किंवा भांडणाची भीती निर्माण होऊ शकते. तसेच, पांढरा रंग (चंद्र) शनीच्या उर्जेला अस्थिर करतो. त्यामुळे आर्थिक करारांच्या वेळी हे रंग टाळल्यास यश मिळण्याची शक्यता वाढते.

स्वामी: मंगळ | टाळायचा रंग: काळा आणि गडद निळा : मंगळ हा अग्नी तत्व असलेला ग्रह आहे. काळा आणि निळा हे शनीचे रंग असून ते मंगळाची ऊर्जा विझवण्याचे किंवा ती नकारात्मक मार्गाकडे वळवण्याचे काम करतात. महत्त्वाच्या धाडसी कामासाठी किंवा नवीन प्रकल्पाच्या सुरुवातीला हे रंग घातल्यास कामात विलंब किंवा उत्साह कमी होण्याचा अनुभव येऊ शकतो.