भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 06:11 IST2026-05-07T06:10:16+5:302026-05-07T06:11:07+5:30

एसआयटीने खरातच्या कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले. त्याशिवाय पीडितेची  भेटदेखील घेतली. त्यामुळे खरातच्या अडचणी अधिक वाढणार आहेत.

First chargesheet against fake bank fraud next week; Some evidence collected again from the office | भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले

भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले

नाशिक भोंदू अशोक खरात याच्याविरोधात विशेष तपास पथकाने (एसआयटी) दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. पुढील आठवड्यात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले जाण्याची शक्यता असून, एसआयटीने खरातच्या कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले. त्याशिवाय पीडितेची  भेटदेखील घेतली. त्यामुळे खरातच्या अडचणी अधिक वाढणार आहेत.

एसआयटीकडून दोषारोपपत्रात पीडितांचे जबाब, वैद्यकीय अहवाल, तांत्रिक पुरावे तसेच साक्षीदारांची विधाने यांचा समावेश केला जाणार आहे. तपासादरम्यान गोळा केलेले डिजिटल पुरावे आणि घटनास्थळाशी संबंधित माहितीही महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायालय त्याची छाननी करून आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करेल. त्यानंतर खटल्याच्या सुनावणीला प्रत्यक्ष सुरुवात होईल.

संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव

नाशिकमधील ‘त्या’ गुन्ह्यांप्रकरणी पत्र देणार

नाशिकमध्ये दाखल असलेल्या ज्या चार गुन्ह्यात अशोक खरातला अद्याप न्यायालयात हजर करायचे आहे. त्यासाठी स्थानिक पोलिस शिर्डी न्यायालयात पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

खरात सध्या शिर्डी पाेलिसांच्या ताब्यात असून, फसवणूक प्रकरणी त्यास चार दिवसांची कोठडी राहता न्यायालयाने दिली आहे. नाशिकमध्ये दाखल ९ गुन्ह्यांमध्ये खरातला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर तिकडील गुन्ह्यांप्रकरणी खरातला ताब्यात घेतले आहे.

नाशिकमधील सरकारवाडा व क्राइम ब्रॅण्चमध्ये दाखल असलेल्या चार गुन्ह्यांत खरातचा ताबा घेतला जाणार आहे. आतापर्यंत खरात एसआयटीच्याच ताब्यात होता.

Web Title : धोखेबाज खरात के खिलाफ अगले हफ्ते आरोप पत्र; फिर सबूत जुटाए।

Web Summary : धोखेबाज अशोक खरात के खिलाफ अगले हफ्ते आरोप पत्र दाखिल होगा। एसआईटी ने उसके कार्यालय से और सबूत जुटाए और पीड़ित से मुलाकात की, जिससे उसकी मुश्किलें बढ़ गईं। आरोप पत्र में पीड़ित के बयान, चिकित्सा रिपोर्ट, तकनीकी सबूत और गवाहों की गवाही शामिल हैं। डिजिटल सबूत और अपराध स्थल की जानकारी भी महत्वपूर्ण भूमिका निभाएंगे।

Web Title : Chargesheet against fraudster Kharat next week; evidence collected again.

Web Summary : A chargesheet against fraudster Ashok Kharat will be filed next week. SIT collected further evidence from his office and met with the victim, increasing his troubles. The chargesheet includes victim statements, medical reports, technical evidence, and witness testimonies. Digital evidence and crime scene information will also play a crucial role.