Video - हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 12:50 IST2026-05-07T12:49:45+5:302026-05-07T12:50:17+5:30
पंजाबमधील मोहाली येथे नितीन गोहल याच्या घरावर ईडीने धाड टाकली. यावेळी एक धक्कादायक प्रकार समोर आला.

Video - हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा
पंजाबमधील मोहाली येथे नितीन गोहल याच्या घरावर ईडीने धाड टाकली. यावेळी एक धक्कादायक प्रकार समोर आला. ईडीचे अधिकारी मोहालीतील खरार भागातील गोहलच्या फ्लॅटवर पोहोचले असता, त्याने घाबरून आपल्या नवव्या मजल्यावरील फ्लॅटमधून नोटांनी भरलेल्या बॅगा थेट खाली फेकून दिल्या. ईडीच्या पथकाने जेव्हा या बॅगांची तपासणी केली, तेव्हा त्या नोटांनी गच्च भरलेल्या होत्या. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध आयटी व्यावसायिक नितीन गोहल याच्या फ्लॅट क्रमांक ९०६ ची झडती घेण्यासाठी ईडीचे अधिकारी पोहोचले होते. अधिकारी घरात शिरताच आतून रोख रकमेने भरलेल्या दोन बॅगा खाली फेकण्यात आल्या. उंचावरून पडल्यामुळे बॅगांमधील नोटा बाहेर पडल्या गेल्या.
#BreakingNews : पंजाब के मोहाली में IT कारोबारी पर ED की रेड:9वीं मंजिल से कैश भरे बैग फेंके, एक को ड्राइवर उठाकर भाग गया, दूसरा जब्त #punjab#ED#Mohali@dir_edpic.twitter.com/z0VDWrgOCt
— Journalist Ravendra kumar (@Chhotukingoffi1) May 7, 2026
मोहाली येथील 'वेस्टर्न टॉवर' मध्ये ही कारवाई करण्यात आली. यावेळी ईडीने व्यावसायिकाच्या घरातील कागदपत्रांचीही कसून चौकशी केली. गोहलवर एका बिल्डरला मदत केल्याचा आरोप आहे. संबंधित बिल्डरने 'ग्रेटर मोहाली एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी'ची (GMADA) फी भरली नसल्याचं समोर आलं आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बॅगा खाली पडताच ५०० रुपयांच्या नोटांचा सर्वत्र पडल्या. मात्र त्यानंतर लगेच ईडीचे अधिकारी खाली आले आणि त्यांनी त्या बॅगा आपल्या ताब्यात घेतल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बॅगांमधून सुमारे २१ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. मात्र ईडीने अद्याप या रकमेबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
व्हायरल व्हिडिओमध्ये सुरुवातीला बॅगा जमिनीवर पडलेल्या दिसत आहेत आणि त्या उघडल्यानंतर त्यात नोटांचे बंडल पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पंजाबमध्ये ईडीकडून सातत्याने छापे टाकले जात आहेत. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.