मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 15:56 IST2026-05-07T15:53:44+5:302026-05-07T15:56:24+5:30

नांदेडमध्ये ३५० तलवारी आणि ३,९५२ खंजीर असा ४३ लाखांचा शस्त्रसाठा जप्त; जसवंतसिंग सुखमणी आणि अभिजित सातपुतेवर गुन्हा.

Nanded Police Dismantle Massive Weapon Hub; Over 4,700 Swords and Daggers Seized Under 'Operation Flush Out' | मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त

मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त

नांदेड : गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी बुधवारी धडक कारवाई करीत तब्बल पाच हजारांवर घातक शस्त्रांचा साठा जप्त केला. एका आरोपीकडून सापडलेल्या शस्त्राच्या धाग्यादोऱ्यांवरून पोलिसांनी थेट शस्त्रसाठ्याचा गुप्त अड्डाच उघडकीस आणला. तलवारी, खंजीर, कुकरीसह विविध प्रकारची ४ हजार ७९६ शस्त्रे आणि शस्त्रनिर्मितीचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. या मुद्देमालाची किंमत ४३ लाख ५० हजार रुपये आहे. नांदेडच्या इतिहासातील शस्त्रजप्तीची ही सर्वांत मोठी कारवाई ठरली.

बुधवारी रात्री बळीरामपूर भागातील अभिजित गिरीधर सातपुते याच्याकडून पोलिसांनी घातक शस्त्र जप्त केले होते. त्यानंतर आरोपीची सखोल चौकशी करण्यात आली. या चौकशीतून शस्त्रसाठ्याचे मूळ समोर आले. त्याआधारे नांदेड ग्रामीणचे ठाणेदार ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकाने वजिराबाद पोलिसांच्या मदतीने गुरू रामदासनगर भागात एक ठिकाणी छापा टाकत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला. या कारवाईत ३५० तलवारी, ३ हजार ९५२ खंजिर, ३३८ गुत्या, २८ कुकरी आणि २८ फोरग्रीप खंजिर असा एकूण ४ हजार ७९६ घातक शस्त्रांचा समावेश आहे. याशिवाय अन्य साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस कारवाईसाठी आल्याचे पाहताच घटनास्थळावरून एका व्यक्तीने पळ काढला. हा शस्त्रसाठा जसवंतसिंग प्रकाशसिंग सुखमणी (रा. अबचलनगर) याने केला असल्याचे समोर आले. 

दोघांवर गुन्हा दाखल
या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात उपरोक्त दोघांविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कायद्यानुसार गुन्हा नोंद झाला आहे. एसपी अबिनाशकुमार यांनी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यास भेट देत जप्त शस्त्रसाठ्याची पाहणी केली. ही धडक कारवाई पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर आणि त्यांच्या पथकातील फौजदार व्यंकट कुसमे, ज्ञानेश्वर मटवाड, जमादार वसंत केंद्रे, समीर अहेमद, शंकर माळगे, संतोष पवार, चावरे, धम्मा कांबळे, गजेंद्र सिरसमवार, रुक्मिनी कानगुले यांनी पार पाडली.

शस्त्रप्रदर्शनाची अनुभूती देणारे दृश्य : एसपी
एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रे एकाच ठिकाणी आढळल्याने पोलिस यंत्रणाही सतर्क झाली आहे. प्राथमिक तपासांत संबंधित ठिकाणी शस्त्रनिर्मितीचा कारखानाच सुरू असल्याचे स्पष्ट होते. जप्त शस्त्रसाठा मोजणीसाठी पोलिस ठाणे परिसरात ठेवण्यात आला असता त्या ठिकाणचे दृश्य एखाद्या शस्त्रप्रदर्शनाची अनुभूती देणारे होते.
- अबिनाश कुमार, जिल्हा पोलिस अधीक्षक नांदेड

Web Title : नांदेड़ में हथियारों का जखीरा बरामद; 4,796 हथियार जब्त!

Web Summary : नांदेड़ पुलिस ने 'ऑपरेशन फ्लश आउट' के दौरान हथियारों का एक बड़ा जखीरा बरामद किया, जिसमें ₹43.5 लाख मूल्य के 4,796 हथियार जब्त किए गए। यह छापा एक व्यक्ति की गिरफ्तारी के बाद मारा गया, जिससे पुलिस को गुरु रामदासनगर में एक छिपी हुई हथियार फैक्ट्री का पता चला। दो लोगों पर शस्त्र अधिनियम के तहत आरोप लगाए गए हैं।

Web Title : Massive Arms Cache Busted in Nanded; 4,796 Weapons Seized!

Web Summary : Nanded police uncovered a massive arms stash during 'Operation Flush Out', seizing 4,796 weapons worth ₹43.5 lakhs. The raid followed the arrest of an individual, leading police to a hidden arms factory in Guru Ramdasnagar. Two individuals have been charged under the Arms Act.