“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 17:46 IST2026-05-07T17:46:40+5:302026-05-07T17:46:40+5:30

BJP Minister Chandrakant Patil News: भूलथापांना बळी न पडता अभ्यासक्रमाची मान्यता तपासून घ्यावी, खात्री करावी व नंतरच प्रवेश घ्यावा, असे आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

minister chandrakant patil directs that file criminal cases against institutions that cheat students | “विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील

“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील

BJP Minister Chandrakant Patil News: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचे संरक्षण करणे ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. विद्यार्थ्यांची फसवणूक आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान मुळीच खपवून घेतले जाणार नाही विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल कराअसे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला  दिले.

वांद्रे, मुंबई येथील डॉ. बळीराम हिरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या फसवणूक प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषी संस्थांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. वांद्रे येथील डॉ.बळीराम हिरे महाविद्यालयात १३२ हून अधिक विद्यार्थ्यांना बोगस अभ्यासक्रम आणि पदव्या देऊन फसविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा सविस्तर आढावा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला. यावेळी सदर मान्यताप्राप्त वास्तुशास्त्र अभ्यासक्रमाच्या संस्थेत विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता नसलेला अभ्यासक्रम सुरू करून विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याबद्दल या संस्थेच्या मान्यतेच्या अनुषंगाने विद्यापीठाच्या कायदयाअंतर्गत असलेल्या तरतूदी विचारात घेऊन त्यानुसार कारवाई करण्याचेही निर्देश मंत्री चंद्रकांत पाटील यांनी  दिले आहेत. 

खात्री करावी व नंतरच प्रवेश घ्यावा, चंद्रकांत पाटलांचे आवाहन

महाराष्ट्र राज्य कृषि, पशु व मत्स्य विज्ञान, आरोग्य विज्ञान, उच्च, तंत्र व व्यवसाय शिक्षण यांमधील अनधिकृत संस्था व अनधिकृत अभ्यास पाठ्यक्रम (प्रतिबंध) अधिनियम २०१३ मधील तरतूदीनुसार कारवाई करण्याचेही त्यांनी निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे सक्षम प्राधिकरणांची मान्यता नसलेल्या विद्यापीठ अथवा अनधिकृत संस्था प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांना खोटी आमिषे दाखवून अथवा संस्था मान्यताप्राप्त आहे, असे भासवून प्रवेश घेण्यास प्रवृत्त करतात व नंतर विद्यार्थ्यांना त्यांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे कोणत्याही अनधिकृत संस्थेच्या अथवा विद्यापीठाच्या भूलथापांना बळी न पडता अभ्यासक्रमाची मान्यता तपासून घ्यावी, उच्च शिक्षण संचालनालय तसेच तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर अथवा सक्षम प्राधिकरणांच्या संकेतस्थळावर संबंधित संस्थेचे नाव व अभ्यासक्रम असल्याची खात्री करावी व नंतरच प्रवेश घ्यावा, असेही आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी विभागाने एक विशेष कार्यप्रणाली (SOP) तयार करावी. त्याचप्रमाणे वांद्रे येथील डॉ. बळीराम हिरे महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या १३२ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीकोनातून नवीन शैक्षणिक धोरण २०२० मधील Recognition of Prior Learning तरतूदीनुसार या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जोपासले जाईल यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद (MahaSARC) ने अभ्यासून त्यानुसार कार्यवाही करावी अशा सूचनाही मंत्री उच्च व तंत्र शिक्षण चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीत दिल्या.

 

Web Title : छात्रों को धोखा देने वाले संस्थानों पर आपराधिक मामले दर्ज करें: चंद्रकांत पाटिल

Web Summary : मंत्री चंद्रकांत पाटिल ने अधिकारियों को छात्रों को धोखा देने वाले संस्थानों के खिलाफ आपराधिक मामले दर्ज करने का निर्देश दिया। यह कार्रवाई मुंबई के डॉ. बलिराम हीरे कॉलेज में हुए घोटाले के बाद की गई है, जहाँ छात्रों को फर्जी डिग्री दी गई थी। पाटिल ने छात्रों से नामांकन से पहले मान्यता सत्यापित करने का आग्रह किया।

Web Title : File criminal charges against institutions cheating students: Chandrakant Patil

Web Summary : Minister Chandrakant Patil directs officials to file criminal charges against institutions defrauding students. This action follows a scam at Dr. Baliram Hire College in Mumbai, where students were given bogus degrees. Patil urges students to verify accreditation before enrolling.