४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर

Updated:May 7, 2026 17:35 IST2026-05-07T17:16:05+5:302026-05-07T17:35:33+5:30

IPS B Sumathi : तेलंगणाच्या एका छोट्याशा गावातून येऊन पोलीस दलात नवा आदर्श निर्माण करणाऱ्या लेडी सिंघम IPS बी. सुमती यांनी धडाकेबाज कारवाई केली आहे. एक असं धाडसी पाऊल उचललं ज्याचं देशभर कौतुक होत आहे.

४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर

तेलंगणाच्या एका छोट्याशा गावातून येऊन पोलीस दलात नवा आदर्श निर्माण करणाऱ्या लेडी सिंघम IPS बी. सुमती यांनी धडाकेबाज कारवाई केली आहे. एक असं धाडसी पाऊल उचललं ज्याचं देशभर कौतुक होत आहे.

४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर

सुमती यांनी सिद्ध केलं आहे की, एका अधिकाऱ्याचं काम केवळ फाईल्स आणि कार्यालयापुरते मर्यादित नसतं, तर समाजातील कटू सत्य जाणून घेण्यासाठी स्वतः जमिनीवर उतरावं लागतं.

४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर

शेतातील कामापासून आयपीएसच्या खुर्चीपर्यंत आणि नंतर मध्यरात्री रोडरोमिओंना धडा शिकवण्यापर्यंतचा बी. सुमती यांचा हा प्रवास आहे. सिस्टिम बदलण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी एक मोठी शिकवण आहे.

४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर

रात्रीच्या वेळी महिलांना रस्त्यावरून चालताना किंवा बसची वाट पाहताना कोणत्या त्रासाला सामोरे जावे लागते, याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी त्या साध्या वेशात रस्त्यावर उतरल्या होत्या. याच दरम्यान त्यांनी ४० टवाळखोरांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं.

४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर

बी. सुमती यांचा जन्म तेलंगणातील जोगुलम्बा गडवाल जिल्ह्यातील 'कलुगोतला' या छोट्याशा गावात झाला. त्यांचे वडील गावचे सरपंच होते, ज्यांच्याकडून त्यांना बालपणापासूनच समाजसेवेची प्रेरणा मिळाली.

४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर

सुमती यांच्या करिअरची सुरुवातच धडाकेबाज राहिली. कार्यक्षमतेमुळेच २००६ मध्ये त्यांची भारतीय पोलीस सेवेसाठी (IPS) निवड झाली. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था प्रणालीत अनेक क्रांतिकारी बदल केले आहेत.

४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर

'स्पेशल इंटेलिजन्स ब्रांच' (SIB) च्या पहिल्या महिला IG असताना, त्यांनी आपल्या अचूक रणनीती आणि 'झिरो स्ट्रॅटेजी'च्या माध्यमातून ५९१ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण केलं. या ऑपरेशनमध्ये अनेक मोठ्या नक्षली कमांडर्सचा समावेश होता. त्यांचं हे मिशन त्यांच्या निर्भयतेचा आणि उत्तम संवाद कौशल्याचा सर्वात मोठा पुरावा मानला जातो.

४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर

दिलसुखनगर परिसरातून महिलांच्या छेडछाडीबाबत अनेक तक्रारी मिळत होत्या. १ मे रोजी पदभार स्वीकारलेल्या बी. सुमती यांनी या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वतः मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. त्या कोणत्याही सुरक्षेशिवाय आणि पोलीस ताफ्याशिवाय एका सामान्य महिलेप्रमाणे दिलसुखनगर येथील बस स्टॉपवर मध्यरात्री साडेबारा वाजता उभ्या राहिल्या.

४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर

पुढील तीन तासांत जे घडले ते अत्यंत धक्कादायक होते. त्या पोलीस अधिकारी आहेत याची पुसटशीही कल्पना नसलेले अनेक तरुण आणि नोकरदार पुरुष त्यांच्याजवळ आले. काही जणांनी बाईकवरून जाताना त्यांना पाहून शिट्ट्या वाजवल्या आणि अश्लील शेरेबाजी केली.

४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर

अनेक जण दारूच्या नशेत होते, तर काही जणांनी गांजा प्यायल्याचा संशय होता. काही जणांनी त्यांच्याजवळ येऊन अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानजनक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.

४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर

बी. सुमती जरी एकट्या दिसत होत्या, तरी काही अंतरावर साध्या वेशात त्यांचे पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. जसा छेडछाडीचा प्रकार वाढला, तसा आयुक्तांनी इशारा दिला आणि दबा धरून बसलेल्या पोलिसांनी ४० जणांना जाळ्यात पकडले.

४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर

सुमती यांचं असं मत आहे की, आजच्या काळात केवळ लाठी चालवून गुन्हेगारी थांबणार नाही. त्या मल्काजगिरीमध्ये AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आणि 'TG QUEST' सारख्या आधुनिक साधनांचा वापर करत आहेत.

४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर

सायबर गुन्हे आणि अंमली पदार्थांचं जाळं तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मोडून काढण्यावर त्यांचा भर आहे. त्या पोलीस दलाला पारदर्शक आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या मोहिमेवर काम करत आहेत.