जेवणाआधी आल्याचा छोटासा तुकडा चावून खाणं म्हणजे 'या' त्रासापासून कायमची सुटका, वाचा २ मोठे फायदे
Updated:May 7, 2026 12:34 IST2026-05-07T12:26:54+5:302026-05-07T12:34:11+5:30

आलं पदार्थाला अतिशय खमंग चव देतं. म्हणूनच तर चायनिज पदार्थ असो किंवा मग आपले पारंपरिक वाटून केलेले पदार्थ असो.. आल्याची पेस्ट कित्येक पदार्थांमध्ये असतेच...
आल्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. थंडीच्या दिवसांत तर आलं सर्दी, खोकला, कफ यासारखे कित्येक त्रास कमी करण्यासाठीही मदत करतं. आल्यामध्ये भरपूर प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्सही असतात.. आता याच आल्याचा आणखी एक मोठा फायदा पाहुया...
बऱ्याच लोकांना पोटाचे वेगवेगळे त्रास असतात. काही जणांना नेहमीच अपचन होतं तर काही जणांना ॲसिडीटी, ब्लोटिंग, पोट जड होणं असे त्रास असतात. हे सगळे त्रास कमी करायचे असतील तर आल्याचा एक छोटासा तुकडा काही दिवस एका विशिष्ट पद्धतीने खाऊन पाहा. तुमच्या पचनाच्या कित्येक तक्रारी दूर होतील.
हा उपाय आयुर्वेद अभ्यासकांनी be_you_with_shraddha_s या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये त्या सांगतात की जेवणाच्या साधारण १५ मिनिटे आधी आल्याचा एक छोटासा तुकडा घ्या.
त्यावर थोडं मीठ आणि काही थेंब लिंबाचा रस घालून आलं अगदी बारीक चावून चावून खा. हा उपाय सगळ्यांसाठीच उत्तम आहे. वात, पित्त, कफ अशा तिन्ही प्रकृतीचे लोक हा उपाय करू शकतात.
यानंतर मग जेवण करा. तुमच्या पचनाच्या अनेक समस्या कमी होतील. कारण यामुळे शरीरात अनेक चांगले पाचक रस तयार होतात जे पचन क्रिया सुरळीत करण्यासाठी मदत करतात. जर या पद्धतीने आलं खाताना ते खूप तिखट लागत असेल तर तुम्ही सुंठही वापरू शकतात.