'चकदा एक्स्प्रेस' रिलीज होणार की नाही? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "शूट..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 12:35 IST2026-05-07T12:33:59+5:302026-05-07T12:35:52+5:30

अनेक वर्षांपासून रखडलाय अनुष्का शर्माचा 'चकदका एक्सप्रेस'

chakda xpress release date unknown actor dibyendu bhattacharya says shoot is complete | 'चकदा एक्स्प्रेस' रिलीज होणार की नाही? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "शूट..."

'चकदा एक्स्प्रेस' रिलीज होणार की नाही? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "शूट..."

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. तिचे चाहते तिच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अनुष्का सध्या आपला बहुतेक वेळ लंडनमध्ये मुलांसोबत घालवत असून केवळ व्यावसायिक कारणांसाठीच ती भारतात येते. दरम्यान तिचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'चकदा एक्सप्रेस' गेल्या दोन वर्षांपासून रखडला असून तो कधी प्रदर्शित होणार याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता समोर आलेली नाही. दरम्यान सिनेमातील एका अभिनेत्याने यावर प्रतिक्रिया दिला आहे. 

भारतीय महिला क्रिकेटपटू झूलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित या बायोपिकचे शूटिंग २०२२ मध्येच पूर्ण झाले होते. अनुष्काने या भूमिकेसाठी क्रिकेटचे कडक प्रशिक्षणही घेतले होते. मात्र २०२३ मध्ये पोस्ट-प्रोडक्शन सुरू होऊनही हा सिनेमा अद्याप नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला नाही. या विलंबाबाबत आता चित्रपटातील महत्त्वाचे कलाकार दिब्येंदु भट्टाचार्य यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

दिब्येंदु भट्टाचार्य यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, "चित्रपटाचे काम पूर्ण झाले असून मी डबिंगदेखील पूर्ण केले आहे. चित्रपट सेन्सॉरमध्ये अडकलेला नाही, मात्र तो नक्की कधी प्रदर्शित होईल याबाबत आम्हाला कोणतीही कल्पना नाही. या गोष्टी आमच्या हातात नसतात." दिग्दर्शक प्रोसित रॉय यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनाही या प्रदर्शनाच्या तारखेबाबत सध्या तरी काहीच माहित नसल्याचे दिब्येंदु यांनी स्पष्ट केले आहे.

अनुष्का शर्मा शेवटची २०१८ मध्ये शाहरुख खानच्या 'झिरो' चित्रपटात दिसली होती, जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. त्यानंतर तिने केवळ 'कला' चित्रपटामध्ये पाहुणी कलाकार म्हणून हजेरी लावली होती. आता 'चकदा एक्सप्रेस'चे भविष्य टांगणीला लागल्यामुळे खुद्द झूलन गोस्वामी आणि अनुष्काचे चाहते या चित्रपटाच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करत आहेत. अनुष्काने स्वतः देखील या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अद्याप मौन पाळले आहे.

 

Web Title : 'चकदा एक्सप्रेस' की रिलीज़ अनिश्चित? अभिनेता की प्रतिक्रिया; शूटिंग पूरी, लेकिन...

Web Summary : अनुष्का शर्मा की 'चकदा एक्सप्रेस' की रिलीज़ अनिश्चित है, 2022 में शूटिंग पूरी होने के बावजूद। अभिनेता दिब्येंदु भट्टाचार्य ने डबिंग पूरी होने की पुष्टि की, लेकिन रिलीज़ की तारीख अज्ञात है। झूलन गोस्वामी के जीवन पर आधारित फिल्म, घोषणा का इंतजार है।

Web Title : 'Chakda Xpress' Release Uncertain? Actor's Reaction; Shooting Completed, But...

Web Summary : Anushka Sharma's 'Chakda Xpress' release remains uncertain despite completed shooting in 2022. Actor Dibyendu Bhattacharya confirms dubbing completion, but the release date is unknown. The film, based on Jhulan Goswami's life, awaits announcement.