मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 12:49 IST2026-05-07T12:48:38+5:302026-05-07T12:49:49+5:30

Suzuki Swift Hydrogen car: सुझुकीने व्हिएन्ना मोटर सिम्पोजियम २०२६ मध्ये हायड्रोजन इंजिनवर चालणारी स्विफ्ट कार सादर केली आहे.

Suzuki Swift Hydrogen car: Maruti's Swift will run on hydrogen, Suzuki presents new technology to the world | मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी 

मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी 

मारुती सुझुकीची सर्वात लोकप्रिय हॅचबॅक कार 'स्विफ्ट' आता एका नवीन अवतारात जगासमोर आली आहे. ऑस्ट्रियामध्ये सुरू असलेल्या 'व्हिएन्ना मोटर सिम्पोजियम २०२६' मध्ये सुझुकीने हायड्रोजन इंजिनवर चालणारी स्विफ्ट सादर केली आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे आता कारमधून धुराऐवजी फक्त पाण्याची वाफ बाहेर पडणार असून, प्रदूषणाची समस्या कायमची मिटणार आहे.

काय आहे ही नवीन टेक्नॉलॉजी? 
आतापर्यंत हायड्रोजन कारमध्ये 'फ्युएल सेल'चा वापर करून वीज निर्माण केली जात असे. मात्र, सुझुकीने AVL या कंपनीच्या सहकार्याने नवीन Hydrogen DI (Direct Injection) तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामध्ये हायड्रोजनचा वापर थेट इंधन म्हणून इंजिनमध्ये केला जातो.

इंजिन: १.४ लिटर, ४-सिलेंडर हायड्रोजन इंजिन.

पावर: १३५ hp शक्ती आणि २२० Nm टॉर्क.

प्रदूषण शून्य: या कारच्या एक्झॉस्ट पाईपमधून धुराऐवजी केवळ पाणी बाहेर येते.

भारतासाठी का महत्त्वाची?
भारतामध्ये लिथियमचे साठे मर्यादित असल्याने इलेक्ट्रिक वाहनांसाठी आपण इतर देशांवर अवलंबून आहोत. अशा वेळी हायड्रोजन हा भारतासाठी एक 'गेम चेंजर' पर्याय ठरू शकतो. रिलायन्ससारख्या मोठ्या कंपन्या आधीच 'ग्रीन हायड्रोजन' निर्मितीवर काम करत आहेत. त्यामुळे भविष्यात ही हायड्रोजन स्विफ्ट भारतीय रस्त्यांवर धावताना दिसू शकते.

फीचर्समध्ये कोणताही बदल नाही
इंजिनमध्ये मोठे बदल झाले असले तरी कारचे प्रीमियम लूक, एलईडी लाईट्स, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि वायरलेस फीचर्स पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आले आहेत. सुझुकी सध्या या कारच्या 'हायड्रोजन टँक'च्या सुरक्षिततेवर विशेष काम करत आहे.

Web Title : मारुति स्विफ्ट हाइड्रोजन पर दौड़ेगी, सुजुकी ने नई तकनीक का अनावरण किया।

Web Summary : सुजुकी ने वियना मोटर संगोष्ठी 2026 में हाइड्रोजन से चलने वाली स्विफ्ट का अनावरण किया। यह तकनीक सीधे हाइड्रोजन इंजेक्शन के साथ 1.4-लीटर इंजन का उपयोग करती है, जो केवल जल वाष्प का उत्सर्जन करती है। यह भारत के लिए गेम-चेंजर हो सकता है, ईवी के लिए लिथियम पर निर्भरता कम कर सकता है।

Web Title : Maruti Swift to run on hydrogen, Suzuki unveils new tech.

Web Summary : Suzuki unveiled a hydrogen-powered Swift at the Vienna Motor Symposium 2026. This technology uses a 1.4-liter engine with direct hydrogen injection, emitting only water vapor. This could be a game-changer for India, reducing reliance on lithium for EVs.