"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 18:20 IST2026-05-07T18:17:05+5:302026-05-07T18:20:25+5:30

गजब भयो रामा, जुलम भयो रे' हे गाणे आजही लोकप्रिय आहे. या गाण्याचे संगित पश्चिम बंगालच्या यावेळच्या निवडणुकीत चांगलेच गाजले. या संगिताने पश्चिम बंगालच्या राजकारणाला एक वेगळेच वळण मिळाले. निकालापूर्वी ज्या संगितात मुर्शिद, काबा आणि मदीनेचा उल्लेख होता, आता निकालांनंतर तेथे मोदी, कृष्ण आणि अयोध्य्या ऐकू येऊ लागले आहे...

In Bengal electin Murshid to Modi and Madina to Krishna After the results, the same lyrics are new VIDEO | "गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 

"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 

१९६१ मध्ये वैजयंती माला आणि दिलीप कुमार यांचा 'गंगा-जमुना' नावाचा चित्रपट प्रसिद्ध झाला होता. हा चित्रपट त्यातील संगीतासाठी (धून) अजरामर ठरला. शकील बदायुनी यांचे शब्द, नौशाद यांचे संगीत आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील 'दो हंसों का जोडा... गजब भयो रामा, जुलम भयो रे' हे गाणे आजही लोकप्रिय आहे. या गाण्याचे संगित पश्चिम बंगालच्या यावेळच्या निवडणुकीत चांगलेच गाजले. या संगिताने पश्चिम बंगालच्या राजकारणाला एक वेगळेच वळण मिळाले. निकालापूर्वी ज्या संगितात मुर्शिद, काबा आणि मदीनेचा उल्लेख होता, आता निकालांनंतर तेथे मोदी, कृष्ण आणि अयोध्य्या ऐकू येऊ लागले आहे.

"आमार हृदोय माझे काबा, नोयोने मदीना" -
पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचारात या गाण्याच्या संगिताचा (धून) वापर एका 'सूफी' अंदाजात करण्यात आला होता. या गाण्यावरून मतांच्या ध्रुवीकरणाचेही आरोप झाले. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या सयोनी घोष यांनी एका व्यासपीठावरून या चालीवर काही ओळी गायल्या होत्या. "मुर्शिद जार सखा, तार किसेर भावना, आमार हृदोय माझे काबा, नोयोने मदीना". याचा अर्थ असा की, ज्याचा गुरु त्याच्या पाठीशी आहे, त्याला कशाची काळजी? माझ्या हृदयात काबा आणि डोळ्यांत मदीना आहे. हे जिंगल सोशल मीडियावर व्हायरल झाले, मात्र बंगालमधील हिंदू मतदारांनी याकडे 'मुस्लिम तुष्टीकरण' म्हणून बघितले आणि बंगालमधील राजकारण फिरले.

"आमार हृदोय माझे राधा, नोयोने कृष्णा" -
खरेतर, यावेळी पश्चिम बंगालची निवडणूक ऐतिहासिक ठरली. या निवडणुकीत तृणमूलला मुस्लीम मते मिळाली खरी, पण हिंदू मते दुरावली. हिंदू मतांच्या एकत्रीकरणामुळे बाजी उलटली. निकालानंतर आता याच गाण्याच्या संगितावरील शब्द बदलले आहेत. आता भाजपच्या एक महिला समर्थकाने गायले नवे जिंगल व्हायरल होत आहे. यात संबंधित महिला म्हणते, "मोदी जार नेता, तार किसेर भावना, आमार हृदोय माझे राधा, नोयोने कृष्णा". याचा अर्थ, ज्यांचे नेते मोदी आहेत त्यांना चिंता नाही; माझ्या हृदयात राधा आणि डोळ्यांत श्रीकृष्ण आहे.

खरेतर, हे संगित केवळ गाणे न राहता एक राजकीय संदेश बनली आहे. मूळ गाण्यात विरहाची वेदना होती, पण बंगालच्या राजकारणाने आपल्या गरजेनुसार 'मुर्शिद ते मोदी' आणि 'मदीना ते कृष्णा', असा बदल केला. यावून संगीताची काय ताकद असते, हे स्पष्ट होते.

 

Web Title : बंगाल चुनाव धुन: मुर्शिद से मोदी, मदीना से कृष्ण तक का सफर।

Web Summary : पश्चिम बंगाल चुनाव में एक लोकप्रिय गाने की धुन को धार्मिक और राजनीतिक बोलों के साथ रूपांतरित किया गया। पहले मुर्शिद और मदीना थे, चुनाव के बाद मोदी और कृष्ण ने उनकी जगह ली, जो बदलते मतदाताओं की भावनाओं को दर्शाते हैं।

Web Title : Bengal Election Tune: From Murshid to Modi, Madina to Krishna.

Web Summary : West Bengal election saw a popular song's tune adapted with religious and political lyrics. Initially featuring Murshid and Madina, post-election versions replaced them with Modi and Krishna, reflecting shifting voter sentiments.