Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 18:44 IST2026-05-07T18:41:24+5:302026-05-07T18:44:19+5:30

Suvendu Adhikari And Mamata Banerjee : भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचे पीएचंद्रनाथ रथ यांच्या हत्या प्रकरणावर मोठं विधान केलं आहे. चंद्रनाथ रथ यांच्या हत्येवरून त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.

i defeated Mamata Banerjee in bhabanipur which is why chandranath was murdered says Suvendu Adhikari speaks on murder of his | Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक

Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक

भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचे पीए चंद्रनाथ रथ यांच्या हत्या प्रकरणावर मोठं विधान केलं आहे. चंद्रनाथ रथ यांच्या हत्येवरून त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. सुवेंदू अधिकारी म्हणाले की, "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या करण्यात आली."

मध्यग्राममधील डोलतला जवळ रात्री साडेदहाच्या सुमारास बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. हल्लेखोरांनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या होत्या. आज चंद्रनाथ रथ यांचं पार्थिव मध्यग्राम येथील रुग्णालयातून त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं.

"सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र

"मी कुटुंबाच्या पाठीशी उभा"

हत्येबाबत बोलताना सुवेंदू अधिकारी म्हणाले, "या हत्येचा आम्ही जितका निषेध करू तितका थोडा आहे. ते माझे सहकारी होते आणि मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींना पराभव केला, म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येचे हेच मुख्य कारण असू शकतं. मी त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभा आहे. दोषींना लवकरात लवकर अटक करून त्यांना शिक्षा व्हावी अशी कुटुंबाची मागणी आहे. शवविच्छेदन अहवालातून समोर आलं आहे की त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या गेल्या, ही एक सुनियोजित हत्या होती."

विश्वासू राजकीय सहकारी

पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यात बुधवारी रात्री चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वायुसेनेत सेवा बजावल्यानंतर चंद्रनाथ हे भाजपा नेत्याचे सहकारी बनले होते. वायुसेनेतील सेवेपासून ते बंगालमधील सुवेंदू अधिकारी यांचे सर्वात विश्वासू राजकीय सहकारी बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास दोन दशकांहून अधिक जुना होता.

२०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई

पक्षीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ४१ वर्षीय चंद्रनाथ हे मूळचे पूर्वी मेदिनीपूर जिल्ह्यातील चांदीपूरचे रहिवासी होते. पूर्वी मेदिनीपूर हे सुवेंदू अधिकारी यांच्या राजकीय कारकिर्दीतील मुख्य केंद्र राहिलं आहे.

भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू

या हल्ल्यात सुवेंदू अधिकारींच्या कार चालकाची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, रथ यांची कार चालवणारे बुद्धदेव बेरा यांनाही गोळ्या लागल्या असून त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. बेरा यांची प्रकृती अद्याप गंभीर असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. 

Web Title : ममता बनर्जी की हार से जुड़ा चंद्रनाथ की हत्या: सुवेंदु अधिकारी

Web Summary : सुवेंदु अधिकारी ने चंद्रनाथ रथ की हत्या को ममता बनर्जी की भवानीपुर में हार से जोड़ा। रथ की पश्चिम बंगाल में गोली मारकर हत्या कर दी गई। अधिकारी ने न्याय की मांग की और हत्या के लिए राजनीतिक प्रतिद्वंद्विता को दोषी ठहराया। ड्राइवर गंभीर रूप से घायल है।

Web Title : Suvendu Adhikari alleges murder linked to Mamata Banerjee's defeat.

Web Summary : Suvendu Adhikari claims Chandranath Rath's murder is linked to Mamata Banerjee's defeat in Bhawanipore. Rath, Adhikari's aide, was shot dead in West Bengal. Adhikari demands justice and blames political rivalry for the killing. The driver is critically injured.